Ipl Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठी होणाऱ्या ऑक्शनसाठीची अंतिम २९२ खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. आता आयपीएल २०२१च्या मिनी ऑक्शनसाठीच्या ( IPL Auction 2021) ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये १९६.६ कोटी आहेत. आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनसाठी ( IPL 2021 Auction) १११४ खेळाडूंनी नाव नोंदवली होती. IPL Auction 2021 Live Today
IPL Auction 2021 Live Updates
8.17pm
अर्जुन तेंडुलकर २० लाखांच्या बोलीसह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल
7.55pm
केदार जाधव २ कोटींच्या बोलीसह सनरायझर्स हैदराबाद संघात, तर हरभजन सिंग कोलकाता नाइट रायडर्स संघात दाखल
7.53pm
बेन कटिंग ७५ लाखांच्या बोलीसह कोलकाता नाइट रायडर्स संघात दाखल
7.50pm
मार्को जेसन २० लाखांच्या बोलीसह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल, करुण नायर ५० लाखांच्या बोलीसह कोलकाताच्या संघात
7.48pm
के भगत वर्मा २० लाखांच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्ज संघात दाखल
7.46pm
श्रीलंकेचा इसरू उडाना, जॉर्ड लिंडा. चेतन्य बिश्नोई, अजय देव गौड, टीम डेव्हीड अनसोल्ड
7.45pm
न्यूझीलंडचा जिमी निशम ५० लाखांच्या बोलीसह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल
7.40pm
के.एस.भरत २० लाखांच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात दाखल, जॉश एंग्लिश अनसोल्ड
7.31pm
न्यूझीलंडचा डॅनियल ख्रिश्चन ४ कोटी ८० लाखांच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात दाखल
7.22pm
करण शर्मा अनसोल्ड, तर उत्कर्ष सिंह २० लाखांच्या बोलीसह पंजाब किंग्जच्या संघात
6.28pm
वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनेघन अनसोल्ड
6.23pm
मोजेस ऑनरिकेज ४ कोटी २० लाखांच्या बोलीसह पंजाब किंग्ज संघात दाखल
6.20pm
टॉम करन ५ कोटी २५ लाखांच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल, मार्कस लाबुशेन राहिला अनसोल्ड
6.16pm
न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सनवर तब्बल १५ कोटींची बोली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात दाखल
6.03pm
चेतेश्वर पुजारा ५० लाखांच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्ज संघात दाखल
5.36pm
ऑस्ट्रेलियाचा युवा गोलंदाज रायली मेरिडिथ तब्बल ८ कोटींच्या बोलीसह पंजाब किंग्ज संघात दाखल
5.32pm
युवा गोलंदाज चेतन सकरियावर १ कोटी २० लाखांची बोली, राजस्थान रॉयल्स संघात दाखल
5.29pm
अंकित राजपूत, कुलदीप सेन अनसोल्ड
5.27pm
भारताचा युवा फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन २० लाखांच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात दाखल, अवि बारोट अनसोल्ड
5.26pm
विष्णू विनोद २० लाखांच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल, तर शेल्डन जॅक्सन २० लाखांच्या बोलीसह कोलकाता नाइट रायडर्स संघात दाखल
5.19pm
केवळ २० लाखांची बेस प्राइज असलेल्या के.गौतमवर ९.२५ कोटींची बोली, चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात दाखल
5.18pm
तामिळनाडूचा युवा फलंदाज शाहरुख खानवर तब्बल ५.२५ कोटींची बोली, केवळ २० लाखांची होती बेस प्राइज; प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्जच्या संघात दाखल
5.17pm
रिपल पटेल २० लाखांच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल
5.07pm
सचिन बेबी, रजत पाटीदार २० लाखांच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात दाखल; राहुल गेहलोत, हिंमत सिंग, विष्णू सोलंकी अनसोल्ड
4.58pm
पियुष चावला २.४० कोटींच्या बोलीसह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल
4.53pm
हरभजन सिंग पहिल्या फेरीत अनसोल्ड
4.50pm
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव १ कोटींच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल, इंग्लंडचा आदिल रशीद आणि भारताचा राहुल शर्मा अनसोल्ड
4.48pm
नेथन कुल्टर नाइल ५ कोटींच्या बोलीसह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल, वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉट्रेल अनसोल्ड
4.40pm
बिग बॅश लीगमध्ये फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनला संघात दाखल करुन घेण्यासाठी संघांमध्ये जोरदार चढाओढ, अखेर तब्बल १४ कोटींच्या बोलीसह पंजाब किंग्ज संघात दाखल
4.36pm
बांगलादेशच्या मिस्तफिजूर रेहमान १ कोटींच्या बोलीसह राजस्थान रॉयल्सच्या संघात दाखल
4.35pm
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज एडम मिल्न ३.२० कोटींच्या बोलीसह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल
4.32pm
कुसल परेरा- अनसोल्ड
अॅलेक्स कॅरी- अनसोल्ड
सॅम बिलिंग्ज- अनसोल्ड
4.28pm
ब्रेकनंतर लिलाव प्रक्रियेला पुन्हा सुरुवात
4.15pm
आतापर्यंत काय काय घडलं?
ख्रिस मॉरिस- १६.२५ कोटी (राजस्थान रॉयल्स)
डेविड मलान- १.५० कोटी (पंजाब किंग्स)
शिवम दुबे- ४.४० कोटी (राजस्थान रॉयल्स)
मोईन अली- ७ कोटी (चेन्नई सुपरकिंग्ज)
शाकिब अल हसन - ३.२० कोटी (कोलकाता नाइट रायडर्स)
केदार जाधव- अनसोल्ड
ग्लेन मॅक्सवेल- १४.२५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
हनुमा विहारी- अनसोल्ड
अॅरॉन फिन्च- अनसोल्ड
एविड लुईस- अनसोल्ड
स्टीव्ह स्मिथ- २.२० कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
जेसन रॉय- अनसोल्ड
एलेक्स हेल्स- अनसोल्ड
करुण नायर- अनसोल्ड
4.04pm
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसनं केला रेकॉर्ड, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली; तब्बल १६.२५ कोटींच्या बोलीसह राजस्थान रॉयल्स संघात दाखल
IPL Auction 2021 : ग्लेन मॅक्सवेलसाठी CSK vs RCB सामना; ठरला आयपीएल इतिहासातील तिसरा महागडा खेळाडू
3.53pm
शिवम दुबे ४.४ कोटींच्या बोलीसह राजस्थान रॉयल्स संघात दाखल
3.44pm
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोइन अली ७ कोटींच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्ज संघात दाखल
3.42pm
शाकिब अल हसन ३ कोटी २० लाखांच्या बोलीसह कोलकाता नाइट रायडर्स संघात दाखल
3.37pm
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल तब्बल १४.२५ कोटींच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात दाखल
3.32pm
ग्लेन मॅक्सवेलवर बोली लावण्यात चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये चढाओढ
3.19pm
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ २.२० कोटींच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल
3.17pm
करुण नायरनंतर अॅलेक्स हेल्स आणि जेसन रॉयही राहिले अनसोल्ड
3.16pm
करुण नायर राहिला 'अनसोल्ड', कोणत्याही संघाकडून बोली नाही
3.10pm
आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात, यंदाच्या आयपीएलचं (IPL 2021) प्रायोजकत्व VIVO कडेच राहणार, ब्रिजेश पटेल यांनी केलं स्पष्ट
2.55pm
सर्वाधिक कांगारु!
या लिलवामध्ये ऑस्ट्रेलिया चे सर्वाधिक ३५ खेळाडूंचा समावेश आहे. त्यानंतर न्यूझीलंड (२०), वेस्ट इंडिज (१९), इंग्लंड (१७), दक्षिण आफ्रिका (१४) आणि श्रीलंका (९) यांचा समावेश आहे. यासोबतच अफगाणिस्तान (७), बांगलादेश (४) आणि अमेरिका, यूएई व नेपाळ येथील प्रत्येकी एका खेळाडूचाही समावेश आहे.
2.50pm
या भारतीयांकडे असेल लक्ष
लिलावामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या केवळ तीन भारतीय खेळाडूंवर बोली लागेल. यामध्ये केदार जाधव, अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून केदारला अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, वाढते वय पाहता अनुभवी हरभजनला कितपत पसंती मिळते हेही पहावे लागेल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उमेशची कामगिरी फारशी चांगली नाही. त्यामुळे त्याच्यावर फार मोठी बोली लागण्याची शक्यता दिसत नाही.
2.45pm
पंजाबच्या संघानं नाव का बदललं? केएल राहुलनं केला खुलासा
-
Web Title: IPL Auction 2021 Live Updates: IPL Auction 2021 Live Streaming, marathi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.