IPL Auction 2021 : RCBच्या ताफ्यात मोहम्मद अझरुद्दीन, सचिन अन् विराट; पाहा काय आहे नक्की भानगड!

IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वासाठी गुरुवारी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पाण्यासारखा पैसा ओतला...

By स्वदेश घाणेकर | Published: February 19, 2021 01:27 PM2021-02-19T13:27:24+5:302021-02-19T13:27:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2021 : Mohammed Azharrudeen, Sachin and Virat Kohli in RCB in IPL 2021 | IPL Auction 2021 : RCBच्या ताफ्यात मोहम्मद अझरुद्दीन, सचिन अन् विराट; पाहा काय आहे नक्की भानगड!

IPL Auction 2021 : RCBच्या ताफ्यात मोहम्मद अझरुद्दीन, सचिन अन् विराट; पाहा काय आहे नक्की भानगड!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वासाठी गुरुवारी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं ( Royal Challengers Bangalore) ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) याच्यासाठी तब्बल १४.२५ कोटी आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कायले जेमिइसन ( Kyle Jamieson) याच्यासाठी १५ कोटी रुपये मोजले. RCBच्या या बोलीनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आता RCBच्या पर्समध्ये फक्त ३५ लाख शिल्लक राहिले आहेत. या लिलावात RCBनं काही स्थानिक खेळाडूंनाही आपल्या ताफ्यात घेतले आहे. आयपीएलच्या १४व्या पर्वात RCBकडून अझरुद्दीन, सचिन आणि विराट खेळताना दिसणार आहेत. ( Mohammed Azharrudeen, Sachin and Virat Kohli in RCB )  इंग्लंडच्या फलंदाजाला गर्लफ्रेंडनं केलं ट्रोल; लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर विचारला खोचक प्रश्न

काय आहे नेमकं हे प्रकरण?
RCB नं लिलावात ( Players bought at Auction)  ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) १४.२५ कोटी, सचिन बेबी ( Sachin Baby) २० लाख, रजत पाटीदार ( Rajat Patidar) २० लाख, मोहम्मद अझरुद्दीन ( Mohammed Azharrudeen) २० लाख, कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson) १५ कोटी, डॅनिएल ख्रिस्टियन ( Daniel Christian) ४.८ कोटी, के एस भारत (KS Bharat) २० लाख, सूयश प्रभुदेसाई ( Suyash Prabhudesai) २० लाख या खेळाडूंना आपल्या ताफ्यात करून घेतले. यामध्ये सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दीन या स्थानिक स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंना घेतले आहे. त्यामुळे आयपीएल २०२१मध्ये RCBकडून अझरुद्दीन, सचिन व विराट खेळताना दिसतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. IPL Auction 2021 : तुझा अभिमान वाटतो भावा; अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, सारानं लिहिली पोस्ट...

मोहम्मद अझरुद्दीन ( Mohammed Azharuddeen)  - केरळचा फलंदाज मोहम्मद अझरुद्दीननं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईच्या गोलंदाजांचा पाळापाचोळा करताना १३७ धावांची विक्रमी खेळी केली. त्यानं या स्पर्धेत पाच डावांमध्ये २१४ धावा कुटल्या. त्याला २० लाखांच्या बेस प्राईजमध्ये RCBनं घेतलं. 


सचिन बेबी ( Sachin Baby) यालाही RCBनं २० लाख या मुळ किमतीत केरळच्या ३२ वर्षीय खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतले. २०१३च्या आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचा सदस्य होता, परंतु त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी दिली. त्यानंतर २०१६मध्ये RCBनं त्याला संघात घेतले. २०१८मध्ये तो सनरायझर्स हैदराबादचा सदस्य होता आणि आता पुन्हा RCBनं त्याला आपल्या संघात घेतले आहे.  


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) रिटेन खेळाडू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे; 

Web Title: IPL Auction 2021 : Mohammed Azharrudeen, Sachin and Virat Kohli in RCB in IPL 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.