IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावात परदेशी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस ( Chris Morris) १६.२५ कोटी घेऊ सर्वात महागडा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यालाही १४.२५ कोटी मिळाले. पण, ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंचं नशीब फुटकं निघालं. त्यांच्यावर बोली लागलीच नाही. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शॉन अबॉट ( Sean Abbott) याचाही त्यात समावेश आहे. फ्रँचायझींनी बोली न लावल्यानं अबॉटनं सर्व राग मैदानावर काढला आणि षटकारांचा पाऊस पाडला. ख्रिस मॉरिसला १६.२५ कोटी, तरीही सर्वाधिक पगार घेणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानी
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अबॉटची बेस प्राईज ही ५० लाख रुपये होती. अबॉट त्याच्या जलदगती गोलंदाजीमुळे ओळखला जातो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं १५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत आणि १ शतकही झळकावलं आहे. त्यानं ९४ ट्वेंटी-20 सामन्यांत ११५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी ८पेक्षा अधिक आहे. पण, फलंदाजीतही तो योगदान देऊ शकतो. तरिही आयपीएल फ्रँचायझींनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तुझा अभिमान वाटतो भावा; अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, सारानं लिहिली पोस्ट...
अबॉटनं याचा राग शेफिल्ड शील्ड स्पर्धेत काढला. न्यू साऊथ वेल्सकडून खेळणाऱ्या अबॉटनं दुसऱ्या डावात फलंदाजीला आला तेव्हा संघाची ६ बाद ६८ अशी अवस्था होती. स्टीव्ह स्मिथ १३ धावांवर माघारी परता होता. त्यानंतर अबॉटनं फटकेबाजी केली. अबॉटच्या फटकेबाजीनं न्यू साऊथ वेल्सडनं १७५ धावांपर्यंत मजल मारली.