IPL Auction 2021 : महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन ( Arjun Tendulkar) आता इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १४व्या पर्वात मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians) खेळणार आहे. गुरुवारी चेन्नईत पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात MIनं अर्जुनला २० लाखांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. अनकॅप खेळाडूंमध्ये अर्जुनचं नाव न आल्यानं सर्व बुचकळ्यात पडले होते, परंतु मुंबई इंडियन्सनं त्याला शॉर्ट लिस्ट करून अखेरच्या फेरीसाठी राखून ठेवले आणि लिलावातील शेवटचं नाव हे अर्जुनचेच होते. मुंबई इंडियन्स या एकमेव संघानं त्याच्यासाठी बोली लावली. , IPL Auction 2021 News in Marathi लिलावाचा शेवट अर्जुन तेंडुलकरनं, एकमेव मुंबई इंडियन्सनं लावली बोली!
अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होताच बहीण सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar) हीनं सोशल मीडियावरून त्याचे अभिनंदन केलं. सारानं इंस्टा अकाऊंटवरील स्टोरीत अर्जुनसोबतचा फोटो पोस्ट केला आणि लिहिलं की,''हे यश तुझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हे तुझंच आहे. मला तुझा अभिमान वाटतो.'' २१ वर्षीय अर्जुन तेंडुलकरनं मुंबईच्या सीनियर संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेत हरयाणाविरुद्ध पदार्पण केलं. या स्पर्धेत दोन सामन्यांत त्यानं दोन विकेट्स घेतल्या. पण, लिलावाच्या ३-४ दिवस आधी त्यानं मुंबईत सुरू असलेल्या पोलिस ढाल क्रिकेट स्पर्धेत ( Police Shield Cricket Tournament ) एमआयजी क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करताना २६ चेंडूंत ७७ धावा चोपल्या आणि त्यात ८ षटकार व ५ चौकारांचा समावेश होता. २१ वर्षीय अर्जुननं गोलंदाजीतही कमाल दाखवली आणि ४० धावा देत ३ विकेट्सही घेतल्या.
अर्जुनने मानले मुंबई इंडियन्सचे आभार
मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Full Squad)
रिटेन खेळाडू : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग
लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- नॅथन कोल्टर नायर ( Nathan Coulter-Nile) ५ कोटी, अॅडम मिल्ने ( Adam Milne) ३.२ कोटी, पीयूष चावला ( Piyush Chawla) २.४ कोटी, जेम्स निशम ( James Neesham) Rs 50 lakh, युधवीर चरक ( Yudhvir Charak) २० लाख, मार्को जॅन्सेन ( Marco Jansen) २० लाख, अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) २० लाख