IPL Auction 2021 : टेम्पो चालकाच्या मुलावर १.२० कोटींची बोली; गेल्याच महिन्यात लहान भावानं केली आत्महत्या

IPL Auction 2021 Chetan Sakariya दोन वर्ष त्याच्या वडीलांची टेम्पो चालवला, पाच वर्षांपूर्वी त्याच्या घरी टीव्हीपण नव्हता आणि मॅच पाहण्यासाठी तो शेजाऱ्यांकडे किंवा बाजारातील दुकानात जायचा.

By स्वदेश घाणेकर | Published: February 19, 2021 05:36 PM2021-02-19T17:36:13+5:302021-02-19T17:47:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2021 : Tempo driver’s son Chetan Sakariya misses late brother on the day he bags Rs 1.20 crore IPL contract | IPL Auction 2021 : टेम्पो चालकाच्या मुलावर १.२० कोटींची बोली; गेल्याच महिन्यात लहान भावानं केली आत्महत्या

IPL Auction 2021 : टेम्पो चालकाच्या मुलावर १.२० कोटींची बोली; गेल्याच महिन्यात लहान भावानं केली आत्महत्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Auction 2021 :  इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) लिलावात गुजरातच्या चेतन साकरिया ( Chetan Sakariya) याला राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) १.२० कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. सौराष्ट्र संघाकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या चेतनचा हा प्रवास खाचखळग्यांचा आहे. डाव्याखुऱ्या जलदगती गोलंदाज सामान्य कुटुंबात जन्माला आला. दोन वर्ष त्याच्या वडीलांची टेम्पो चालवला, पाच वर्षांपूर्वी त्याच्या घरी टीव्हीपण नव्हता आणि मॅच पाहण्यासाठी तो शेजाऱ्यांकडे किंवा बाजारातील दुकानात जायचा. अशात चेतननं अभ्यास करावा आणि चांगली नोकरी करावी अशी त्याच्या वडीलांची इच्छा होती. मात्र, काकांनी चेतनला त्यांच्या दुकानात कामासाठी ठेवलं आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला. त्यांचा हा विश्वास चेतननं सार्थ ठरवला आणि कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्र क्रिकेटमध्ये प्रवेश केला. मागील वर्षी सौराष्ट्रला रणजी करंडक जिंकून देण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. १८ शतकं नावावर असलेल्या उपुल थरंगासह श्रीलंकेचे १५ खेळाडू देश सोडणार, अमेरिकेकडून खेळणार!

चेतनला आयपीएल लिलावात मोठी रक्कम मिळाली, परंतु त्याच्या मनाला एक दुःख सतावत होतं. मागील महिन्यात त्याच्या लहान भावानं आत्महत्या केली. चेतननं इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की,''माझ्या भावानं जानेवारीत आत्महत्या केली. मी तेव्हा घरी नव्हतो. मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळत होतो. मी घरी आलो तेव्हा मला हे सर्व समजलं. कुटुंबीयांनी सुरुवातीला मला काहीच सांगितलं नाही. राहुलबद्दल मी जेव्हा विचारायचो, तेव्हा तो बाहेर गेलाय, हेच उत्तर मला मिळालं. पण, अखेर मला समजलंच. त्याच्या नसण्यानं आयुष्यात रितेपणा आला आहे. तो आज असता तर माझ्यापेक्षा त्यालाच अधिक आनंद झाला असता.'' IPL Auction 2021 : आठ फ्रँचायझींनी ५७ खेळाडूंसाठी मोजले १४५.३० कोटी; एका क्लिकवर समजून घ्या हे गणित!

२८ वर्षीय चेतन हा भावनगर जिल्ह्यात राहतो. त्याचे वडिल कांजीभाई घराचा आर्थिक गाढा हाकण्यासाठी टॅम्पो चालवायचे. चेतननं क्रिकेटपटू व्हावं असं त्यांची इच्छा नव्हती. पण, चेतनच्या काकांनी त्याला मदत केली.  कूच बिहार ट्रॉफीत त्यानं सौराष्ट्रच्या १९ वर्षांखालील संघाकडून सहा सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या. त्यला एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये पाठवलं गेलं. पण, त्याच्याकडे बुटं नव्हती आणि शेल्डन जॅक्सननं त्याला बुटं दिली. नेट प्रॅक्टीसमध्ये मला बाद केलंस, तर बुटे देईन अशी पैज जॅक्सननं लावली आणि चेतननं ती जिंकली. 

राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) - 
 

रिटेन खेळाडू : संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवितया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, ॲन्ड्रयू टाय जयदेव उनादकट, मयंक मारकंडे, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा आणि रॉबिन उथप्पा

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- ख्रिस मॉरिस ( Chris Morris) १६.२५ कोटी, शिबम दुबे ( Shivam Dube) ४.४ कोटी, मुश्तफिजून रहमान ( Mustafizur Rahman) १ कोटी, चेतन साकरिया ( Chetan Sakariya) १.२० कोटी), केसी करिअप्पा ( KC Kariappa ) २० लाख, लायम लिव्हींगस्टोन (Liam Livingstone) ७५ लाख, कुलदीप यादव ( Kuldip Yadav) २० लाख, आकाश सिंग (Aakash Singh) २० लाख 

 

Web Title: IPL Auction 2021 : Tempo driver’s son Chetan Sakariya misses late brother on the day he bags Rs 1.20 crore IPL contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.