इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वाच्या तयारीला वेग आला आहे. IPL 2021 कुठे खेळवली जाणार इथपासून ते लिलाव ( Auction) होणार की नाही, या प्रश्नांचा हळुहळू उलगडा होत चालला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या ११ फेब्रुवारीला IPL 2021 auction होण्याची शक्यता आहे. तर सर्व फ्रँचायझींना २० जानेवारीपर्यंत त्यांच्या संघात कायम राहणाऱ्या ( Retained Players) आणि मुक्त करण्यात येणाऱ्या ( Released Players) खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलसमोर सादर करायची मुदत देण्यात आली आहे. आयपीएलचे सामने कुठे खेळवण्यात येतील, याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. इंग्लंड-भारत मालिके दरम्यान याबाबत निर्णय घेतला जाईल. रिषभनं कॅच सोडले, बुमराहनं रन आऊटची संधी; विल पुकोव्हस्कीनं मोडला ६९ वर्षांपूर्वीचा विक्रम
दरम्यान, IPL 2022 साठी दोन नवीन संघाचा समावेश करण्याकरिती BCCI एप्रिल महिन्यात टेंडर काढणार आहे. आयपीएल २०२२मध्ये दोन नवीन संघांचा समावेश केला जाईल, याची घोषणा BCCIकडून मागील महिन्यातच करण्यात आली. नव्या संघासाठी BCCIनं १५०० कोटी ही रक्कम ठरवली आहे. त्यापेक्षा कमी किमतीची बोली स्वीकारली जाणार नाही. रिषभ पंतची चूक टीम इंडियाला महागात पडणार?; आर अश्विन, मोहम्मद सिराज वैतागले
- आयपीएल २०२१साठी लिलाव कधी होणार? - ११ फेब्रुवारी २०२१
- आयपीएल २०२१साठी लिलावाची वेळ काय असेल? - दुपारी ३.३० वाजल्यापासून
- थेट प्रक्षेपण कुठे? - स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
मेगा की मिनी ऑक्शन? आयपीएल २०२१साठी मेगा ऑक्शन होणार नाही, हे बीसीसीआयकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. २०२२मध्ये दोन नवीन संघ जोडले जातील तेव्हा मेगा ऑक्शन घेण्यात येईल. त्यामुळे यंदा मिनी ऑक्शन होईल. याचा सर्वाधिक फटका चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) बसण्याची शक्यता आहे. यूएईत झालेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात चेन्नईला साजेशी कामगिरी करता आली नाही. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईला प्ले ऑफमध्ये पात्र ठरता आले नाही. त्यामुळे चेन्नई बऱ्याच खेळाडूंना संघातून डच्चू देणार होते. पण, मिनी ऑक्शनमुळे त्यांच्यासह चेन्नईला खेळावे लागेल. १० ते ३१ जानेवारी या कालावधीत सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धा होणार आहे आणि त्यानंतर मिनी ऑक्शन होईल.