Join us  

IPL Auction 2022: आयपीएल लिलावात मुंबई नव्हे,  'या' संघानं मारली बाजी; माजी क्रिकेटपटूचं 'स्मार्ट' मत

आयपीएलच्या नव्या सीझनसाठीचा लिलाव नुकताच पार पडला. यात १० संघांनी आपले खिसे रिकामे करत खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावत आपले संघ मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 1:51 PM

Open in App

मुंबई-

आयपीएलच्या नव्या सीझनसाठीचा लिलाव नुकताच पार पडला. यात १० संघांनी आपले खिसे रिकामे करत खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावत आपले संघ मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. यात नेमकं कोणत्या संघानं बाजी मारली असं विचारण्यात आलं असता माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी व्यक्त केलेलं मत इतरांपेक्षा खूप वेगळं म्हटलं जात आहे. 

आयपीएल लिलावात चेन्नई सुपरकिंग्ज संघानं बाजी मारली असल्याचं आकाश चोप्रानं म्हटलं आहे. सीएसकेनं पुन्हा एकदा लिलावात सर्वोत्तम खेळाडू संघात दाखल करत सर्वांना चितपट केलं असल्याचं आकाश चोप्रा म्हणाला. 

चेन्नई सुपरकिंग्ज संघानं आयपीएल लिलावात त्यांच्याकडील रक्कम उत्तम प्रकारे खर्च केली. अनुभव आणि युवा अशा दोन्ही पातळीवर उत्तम गुंतवणूक करत सर्वोत्तम खेळाडू चेन्नईच्या संघानं दाखल करुन घेतले असल्याचं आकाश म्हणाला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह चार खेळाडू संघानं रिटेन केले होते. त्यांच्यासह आता संघ पूर्णपणे पुन्हा सज्ज झाला आहे. 

लिलावाच्या पहिल्या दिवशी चेन्नई सुपरकिंग्ज संघानं काही मोठ्या खेळाडूंना संघात दाखल करुन घेतलं. यात दीपक चहरसाठी चेन्नईनं मोठी बोली लावली. दुसऱ्या दिवशी काही छोट्या आणि मध्यम स्वरुपाच्या बोली लावत चेन्नईनं आपलं संघ बांधला. यात ख्रिस जॉर्डन, माहीश तीक्ष्णा, ड्वेन प्रिटोरियससारख्या नावांचा समावेश आहे. 

चेन्नई सुपर किंग्जनं संघात दाखल केलेल्या खेळाडूंबाबत आकाश चोप्रा खूप प्रभावीत झाला आहे. यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत त्यानं याबाबतची माहिती दिली. 

"चेन्नई सुपरकिंग्ज संघाला मी सर्वाधिक गुण दिले आहेत. चेन्नईला मी १० पैकी ९ गुण दिलेत. म्हणजेच या संघानं पुन्हा एकदा लिलावात बाजी मारली आहे. चेन्नई सुपरकिंग्ज ही फ्रँचायझी खूप वेगळीच आहे. चेन्नईला त्यांचे २५ खेळाडू देखील मिळाले आणि त्यानंतरही त्यांच्याकडे पैसे शिल्लक आहेत. दीपक चहरवर तब्बल १४ कोटी रुपये खर्च करुनही संघाकडे बरेच पैसे शिल्लक राहिले आहेत", असं आकाश चोप्रा म्हणाला. 

चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ-

महेंद्रसिंग धोनी, दीपक चहर, मोइन अली, रविंद्र जडेजा, अंबाती रायुडू, ऋतूराज गायकवाड, ड्वेन ब्रावो, शिवम दुबे, रॉबिन उथप्पा, तुषार देशपांडे, केएम आसिफ, राजवर्धन हंगारगेरकर, सिमरजीत सिंह, ड्वेन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, एडम मिल्ने, सुभ्रांशु सेनापती, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीशन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा आणि माहीश तीक्ष्णा. 

टॅग्स :आयपीएल २०२२आयपीएल लिलावचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स
Open in App