Harshal Patel, IPL Auction 2022 : पोरानं नाव काढलं...! एका वर्षात २० लाखांहून थेट १० कोटींवर झेप; जाणून घ्या कोणत्या संघाकडून खेळणार

Indian Premier League Players Mega Auction 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील पर्वात सर्वाधिक ३२ विकेट्स घेत पर्पल कॅप कमावणाऱ्या हर्षल पटेलने ( Harshal Patel) नशीब काढले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 02:30 PM2022-02-12T14:30:02+5:302022-02-12T14:30:57+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2022 : From 20 Lakh to 10.75 crore, the story of Harshal Patel in the space of one year,He was the Purple Cap holder in IPL 2021 | Harshal Patel, IPL Auction 2022 : पोरानं नाव काढलं...! एका वर्षात २० लाखांहून थेट १० कोटींवर झेप; जाणून घ्या कोणत्या संघाकडून खेळणार

Harshal Patel, IPL Auction 2022 : पोरानं नाव काढलं...! एका वर्षात २० लाखांहून थेट १० कोटींवर झेप; जाणून घ्या कोणत्या संघाकडून खेळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Players Mega Auction 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील पर्वात सर्वाधिक ३२ विकेट्स घेत पर्पल कॅप कमावणाऱ्या हर्षल पटेलने ( Harshal Patel) नशीब काढले. सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) यांच्यात हर्षल पटेलसाठी कमालीची चुरस पाहायला मिळेल. श्रेयस अय्यरनंतर आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनमध्ये कोटींचा दुहेरी आकडा गाठणारा तो दुसरा खेळाडू ठरला. मागच्या वर्षी २० लाखांत RCBने त्याला ताफ्यात घेतले होते आणि त्या किमतीपेक्षा कैऐक पटीने त्यानं योगदान दिले. तरीही त्याला RCB ने रिलिज केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण, 
RCBचा हा निर्णय हर्षल पटेलसाठी फायद्याचा ठरला..

हर्षल पटेलनं इतिहास रचला... 
आयपीएलच्या एकाच पर्वात सर्वाधिक ३२ विकेट्स घेणारा हर्षल पटेल हा सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला. त्यानं जसप्रीत बुमराहनं मागील पर्वात नोंदवलेला २७ विकेट्सचा विक्रम मोडला. भुवनेश्वर कुमारनं ( SRH) २०१७मध्ये २६ , जयदेव उनाडकटनं २०१७ मध्ये ( RPS) २४ व हरभजन सिंग २०१३मध्ये ( MI) २४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने या कामगिरीसह एकाच पर्वात सर्वाधिक ३२ विकेट्सच्या ड्वेन ब्राव्होच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.

हर्षल पटेलने २००८-०९च्या अंडर १९ वर्षांखालील विनू मंकड ट्रॉफीत सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला गुजरात संघातून पदार्पणाची संधी मिळाली. हर्षल पटेलचे कुटुंब अमेरिकेत स्थाईक होण्याचा निर्णय घेत होते, परंतु त्याचा भाऊ तापन पटेल यानं भावाची प्रतिभा ओळखली आणि त्याचा हा निर्णय सार्थ ठरला. RCB ने त्याला १०.७५ कोटी मोजून संघात कायम राखले. 

Web Title: IPL Auction 2022 : From 20 Lakh to 10.75 crore, the story of Harshal Patel in the space of one year,He was the Purple Cap holder in IPL 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.