Indian Premier League Players Mega Auction 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी हार्दिक पांड्याकडे ( Hardik Pandya) नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्यानंतर कृणाल पांड्या ( Krunal Pandya) हाही गुजरात संघाकडून खेळेल असे वाटले होते, पण सगळं विचित्रत समिकरण झाले. भावाने नाकारल्यानंतर कृणाल पांड्याला आता कट्टर शत्रूसोबत खेळावे लागणार आहे. लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super giants ) संघाने खरेदी केले. त्यामुळे ज्या खेळाडूसोबत कृणालने राडा केला होता आणि त्याच्याच खांद्याला खांदा लावून त्याला खेळावे लागणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाकडून हार्दिक-कृणाल या जोडीनं कमाल केली होती आणि तिच कमाल गुजरात लायन्स या घरच्या संघासोबत करताना दिसेल असे वाटले होते. आयपीएलमध्ये ८४ सामन्यांत त्यानं ११४३ धावा केल्या आहेत आणि ५१ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे या अष्टपैलू खेळाडूसाठी चेन्नई सुपर किंग्सनं बोली लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स यांची एन्ट्री झाली. कृणालची किंमत ७.५० कोटीपर्यंत गेल्यानंतर गुजरात टायटन्सने बोली लावली, परंतु ८.२५ कोटीवर किंमत जाताच त्यांनी माघार घेतली आणि लखनौ सुपर जायंट्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतले.
त्यामुळे कृणाल पांड्या विरुद्ध दीपक हुडा हे कट्टर शत्रू एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत. या दोघांमधील वाद जगजाहीर आहे आणि कृणालने हुडाला करियर संपवण्याची धमकी दिली होती.
कृणाल VS दीपक नेमकं काय आहे भांडण?
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२०त बडोदा संघ वादामुळे चर्चेत आला होता. संघातील टॉप खेळाडू दीपक हुडानं या स्पर्धेतून माघार घेतली होती आणि त्यानं कर्णधार कृणाल पांड्या ( Krunal Pandya) यानं सहकाऱ्यांसमोर शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. उप कर्णधार दीपक हुडानं बडोदा क्रिकेट असोसिएशनकडे लेखी तक्रार केली होती. वडोदरा येथील रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना दीपक आणि कृणाल यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दीपकनं बडोदा क्रिकेट असोसिएशनला मेल करून कृणालनं शिवीगाळ केल्याचा आरोप केला. शिवाय त्यानं या स्पर्धेतून माघार घेत असल्याचेही सांगितले.
Web Title: IPL Auction 2022 : Krunal Pandya and Deepak Hooda will play in the same IPL team, Krunal Pandya to Lucknow Supergiants for Rs 8.25 crore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.