Join us  

IPL Auction 2022 Live Updates : BCCI ने केलेला नियम 'दादा'नेच मोडला; सौरव गांगुली मास्कविनाच मेगा ऑक्शनसाठी प्रकटला!

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या मेगा ऑक्शनची प्रतीक्षा संपली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 12:02 PM

Open in App

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या मेगा ऑक्शनची प्रतीक्षा संपली आहे.  आयपीएल २०२२ ऑक्शनला सुरुवात झाली आहे. ५९० खेळाडूंनी आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत. त्यात २०३ गोलंदाज, १०२ फलंदाज, २२७ अष्टपैलू आणि ५८ यष्टिरक्षकांचा समावेश आहे. त्यात काल १० खेळाडूंची भर पडल्याने आता १० संघ ६०० खेळाडूंवर बोली लावणार आहेत. यापैकी आज ९८ खेळाडूंवर बोली लावली जाईल आणि Marquee खेळाडूंपासून सुरुवात झाली. दोन दिवसांच्या या लिलावात ६०० पैकी २१७ खेळाडूंचे नशीब चमकणार आहे. पण, ऑक्शनसाठी बीसीसीआयनं फ्रँचायझीसाठी काही नियम आखले होते आणि त्याची एैशी तैशी झाल्याचे पाहायला मिळाले. IPL Auction 2022 Live Updatesजाणून घ्या नियम 

  • आयपीएल २०२२ ऑक्शन हे पूर्णपणे बायो-बबलमध्ये पार पडणार आहे
  •  मेगा ऑक्शनमध्ये सहभाग घेणाऱ्या फ्रँचायझींच्या प्रतिनिधिंची कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असायला हवा आणि ९, १० , ११ तारखेला त्यांची RT-PCR टेस्ट निगेटीव्ह यायला हवी. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमकडून ती चाचणी केली जाईल
  • यंदाच्या ऑक्शनमध्ये Right to Match (RTM) हा पर्याय नसणार आहे.  
  • मुदत संपल्यानंतर कोणताही  संघ त्यांच्या जुन्या खेळाडूला रिटेन करू शकत नाही. याचा सर्वाधिक फटका मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या मोठ्या संघाना बसलेला पाहायला मिळतोय.  
  • प्रत्येक फ्रँचायझीला या ऑक्शनसाठी प्रत्येकी ९० कोटी बजेट दिले गेले आहेत आणि त्यापैकी ८० कोटी हे खेळाडूंवर खर्च करायला हवेत.
  •  मागील १५ दिवसांत परदेश दौरा करून आयपीएलसाठी भारतात आलेल्या खेळाडूंना ७ दिवस सक्तीच्या विलगिकरणात रहावं लागेल आणि दोन वेळा त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह यायला हवा.  
  •  मेगा ऑक्शनसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बीसीसीआयचे लक्ष आहे आणि त्यांच्यात कोरोना लक्षणं दिसतात का याकडे त्यांची बारीक नजर आहे.  
  •  कोरोना चाचणी पहाटे १२ ते सकाळी ७ या कालावधीत केली जाईल. जेणेकरून आयपीएल ऑक्शनमध्ये काही अडथळा येणार नाही. कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह येईपर्यंत त्या सदस्याला रुममध्येच रहावे लागणार आहे.  
  • कोरोना चाचणी निगेटीव्ह आलेल्या आणि विलगिकरणाचे नियम पाळणाऱ्या व्यक्तिलाच लिलावात सहभाग घेता येणार आहे.  
  • लिलावात सहभागी होणाऱ्या प्रत्येकानं कोरोना लसीसंदर्भाची सर्व माहिती द्यायला हवी आणि सर्व सदस्यांनी माक्स घालणे अनिवार्य आहे.  

 

कोणता नियम मोडलानियमानुसार आयपीएल ऑक्शनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक होते, परंतु बीसीसीआय अध्य़क्ष सौरव गांगुलीसह अनेकांच्या तोंडावर माक्स नसल्याचे दिसले. 

 

टॅग्स :आयपीएल लिलावसौरभ गांगुलीआयपीएल २०२२कोरोना वायरस बातम्या
Open in App