IPL Auction 2022 Live Updates: डेव्हिड वॉर्नरची घरवापसी! पृथ्वी शॉसोबत सुसाट पळणार 'दिल्ली एक्सप्रेस'

वॉर्नरचा गेल्या हंगामात SRH संघाने अपमान केल्याची चाहत्यांमध्ये भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 01:27 PM2022-02-12T13:27:46+5:302022-02-12T13:27:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2022 Live Updates David Warner sold to Delhi Capitals as Replacement to Opener Shikhar Dhawan Mumbaikar Prithvi Shaw | IPL Auction 2022 Live Updates: डेव्हिड वॉर्नरची घरवापसी! पृथ्वी शॉसोबत सुसाट पळणार 'दिल्ली एक्सप्रेस'

IPL Auction 2022 Live Updates: डेव्हिड वॉर्नरची घरवापसी! पृथ्वी शॉसोबत सुसाट पळणार 'दिल्ली एक्सप्रेस'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Auction 2022 Live Updates: ऑस्ट्रेलियाचा दमदार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला दिल्लीच्या संघाने ६ कोटी २५ लाखांच्या बोलीवर विकत घेतलं. डेव्हिड वॉर्नरला गेल्या वर्षी हैदराबादच्या संघाने अपमानास्पद वागणूक दिल्याचा चाहत्यांनी आरोप केला होता. त्यानंतर हैदराबाद आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात काहीतरी वाद असल्याचं स्पष्ट झालं होतं. SRH संघानेही लिलावाआधी वॉर्नरला संघातून करारमुक्त केलं. त्यामुळे वॉर्नरला कोणता संघ विकत घेणार आणि त्याच्यावर किती बोली लागणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं होतं. अखेर या बोलीयुद्धात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. डेव्हिड वॉर्नरने IPL ची सुरूवात दिल्ली संघाकडूनच केली होती. त्यानंतर बरेच वर्षांनी त्याची घरवापसी झाली. IPL Auction 2022 News in Marathi

पृथ्वी शॉ सोबत आता वॉर्नर करणार सलामी; धवनला मिळाला पर्याय

भारतीय संघाचा दमदार ओपनर शिखर धवन हा दिल्लीच्या संघाकडे होता. त्याला दिल्लीने करारमुक्त केलं. त्यानंतर आजच्या लिलावादरम्यान दिल्लीच्या संघाने धवनवर बोली लावली होती. पण पंजाबने ८ कोटी २५ लाखांची बोली लावत धवनला संघात घेतलं. त्यामुळे दिल्लीच्या संघात पृथ्वी शॉ ला ओपनिंग जोडीदार कोण मिळेल असा सवाल उपस्थित होत होता. पण पहिल्याच टप्प्यात त्याचंही उत्तर मिळालं. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हि़ड वॉर्नर याला संघात घेत दिल्लीने धवनला पर्याय शोधला.

हैदराबादशी वॉर्नरचा झाला होता वाद

गेल्या हंगामात डेव्हिड वॉर्नर SRH चा कर्णधार होता. पण संघ सातत्याने पराभूत होत असल्याने त्याला संघाच्या कर्णधारपदावरून दूर करण्यात आले. इतकंच नव्हे तर त्याला संघातूनही बाहेर बसवण्यात आले. त्यामुळे वॉर्नरसारख्या बड्या खेळाडूचा अपमान करण्यात आल्याची भावना चाहत्यांमध्ये होती. यंदाच्या लिलावात वॉर्नरवर बोली दाखवण्यातही SRH ने रस दाखवला नाही. त्यामुळे यंदाच्या SRH विरूद्ध डेव्हिड वॉर्नर सामन्यात नक्कीच मजा येणार अशी चर्चा रंगली आहे.

Web Title: IPL Auction 2022 Live Updates David Warner sold to Delhi Capitals as Replacement to Opener Shikhar Dhawan Mumbaikar Prithvi Shaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.