Join us  

IPL Auction 2022 Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिस RCBकडे जाताच चेन्नई सुपर किंग्सने केलं भावनिक ट्विट; मॅच विनर खेळाडू गमावल्याची खंत

Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) त्यांच्या जुन्याच खेळाडूंसाठी प्रयत्नशील असतील असे संकेत मिळत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 1:18 PM

Open in App

Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) त्यांच्या जुन्याच खेळाडूंसाठी प्रयत्नशील असतील असे संकेत मिळत होते. त्यामुळेच जेव्हा फॅफ ड्यू प्लेसिसचे ( Faf du Plessis) नाव समोर आले तेव्हा सर्वांच्या नजरा CSKच्या टेबलकडे वळल्या, परंतु CSKनं फॅफ साठी बोली लावलीच नाही. RCB ने अनपेक्षित बोली लावताना फॅफला आपल्या ताफ्यात करून घेतले, या मॅचविनर ओपनरसाठी ७ कोटी रुपये मोजले. Faf du Plessis विराट कोहलीच्या संघात गेल्यानंतर CSK ने माजी खेळाडूसाठी भावनिक ट्विट केले. IPL Auction 2022 Live Updates

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२२साठी रवींद्र जडेजा ( १६ कोटी), महेंद्रसिंग धोनी ( १२ कोटी), ऋतुराज गायकवाड( ६ कोटी) , मोईन अली (८ कोटी) यांना संघात कायम राखले आहे. फॅफने २०२१च्या आयपीएलमध्ये CSKसाठी १६ सामन्यांत ६३३ धावा कुटल्या होत्या आणि जेतेपदात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने एकूण १०० सामन्यांत २९३५ धावा केल्या आहेत आणि त्यात २२ अर्धशतकांचा समावेश आहे.  आतापर्यंत कुणावर किती बोली?शिखर धवन- ८.२५ कोटी (पंजाब किंग्ज)आर. अश्विन- ५ कोटी (राजस्थान)पॅट कमिन्स- ७.२५ कोटी (केकेआर)कगिसो रबाडा- ९.२५ कोटी (पंजाब)शिखर धवन- ८.२५ कोटी (पंजाब किंग्ज)आर. अश्विन- ५ कोटी (राजस्थान)पॅट कमिन्स- ७.२५ कोटी (केकेआर)कगिसो रबाडा- ९.२५ कोटी (पंजाब)ट्रेंट बोल्ट- ८ कोटी (राजस्थान)श्रेयस अय्यर- १२.२५ कोटी (कोलकाता)मोहम्मद शमी- ६.२५ कोटी (गुजरात टायटन्स)फॅफ ड्यू प्लेसिस- ७ कोटी (बंगळुरू)क्विंटन डी कॉक- ६.७५ कोटी (लखनौ सुपरजाएंट्स )डेव्हिड वॉर्नर- ६.२५ कोटी (दिल्ली कॅपिटल्स) 

टॅग्स :आयपीएल लिलावएफ ड्यु प्लेसीसचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App