IPL Auction 2022 Live Streaming : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2022) मेगा ऑक्शनसाठी ५९० खेळाडूंची नावं निश्चित झालेली आहेत. त्यात २०३ गोलंदाज, १०२ फलंदाज, २२७ अष्टपैलू आणि ५८ यष्टिरक्षकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये आता १० संघ खेळणार आहेत आणि त्या प्रत्येकासाठी नव्यानं संघबांधणी करण्याची ही मोठी संधी आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार आधीच्या ८ फ्रँचायझींनी प्रत्येकी चार खेळाडूंना रिटेन करता आले आणि अहमदाबाद व लखनौ या नव्या फ्रँचायझींना प्रत्येकी तीन खेळाडूंना लिलावाआधी करारबद्ध करता आले आहे. त्यामुळे आता १० फ्रँचायझी तगडे खेळाडू आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रचंड पैसा ओतण्यास तयार आहेत.
१२ व १३ फेब्रुवारीला होणाऱ्या या लिलावातून सर्व संघांना पुढील ३-४ वर्षांचे भविष्य सुरक्षित करण्याची संधी आहे. या लिलावात पंजाब किंग्सकडे सर्वाधिक ७२ कोटी शिक्कक आहेत, तर रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वात कमी ४७.५ कोटीच शिल्लक आहेत. पण, लिलावाआधी प्रत्येकी फ्रँचायझीबाबत आतापर्यंत पसरलेल्या अफवा जाणून घेऊयात..
- मुंबई इंडियन्स - मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून कोणतीच अफवा पसरली नाही, परंतु ते यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनला पुन्हा आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत, हे नक्की.
- चेन्नई सुपर किंग्स - २०१८च्या ऑक्शनप्रमाणे चेन्नई सुपर किंग्स पुन्हा आर अश्विनला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी आतुर आहेत. गतविजेता CSK भारताच्या फिरकीपटूंना प्राधान्य देणार आहे.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - PTI च्या वृत्तानुसार RCB जेसन होल्डर, अंबाती रायुडू आणि रियान पगार यांच्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. RCBने होल्डरसाठी १२ कोटी, रायुडूसाठी ८ आणि परागसाठी ७ कोटींचा बजेट ठेवला आहे.
- सनरायझर्स हैदराबाद - सनरायधर्स हैदराबादने आयपीएल २०२२ साठी केन विलियम्स, उम्रान मलिक आणि अब्दुल समद यांना कायम राखले आहे. त्यांना ऑक्शनसाठी भरपूर अभ्यास करावा लागणार आहे.
- दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील हा संघ अंडर १९ वर्ल्ड कप विजेत्या यश धुलसाठी प्रयत्नशील असणार आहेत.
- कोलकाता नाइट रायडर्स - कोलकाता नाइट रायडर्स नव्या कर्णधाराच्या शोधात आहेत आणि त्यामुळे ते श्रेयस अय्यर, डेव्हिड वॉर्नर किंवा पुन्हा इयॉन मॉर्गन यांच्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
- पंजाब किंग्स - कोलकाताप्रमाणे पंजाब किंग्सलाही कर्णधार हवा आहे आणि तेही माजी खेळाडूला करारबद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत.
- राजस्थान रॉयल्स - राजस्थान रॉयल्स युवा खेळाडूंवर गुंतवणुक करण्याचा विचारात आहे.