Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या मेगा ऑक्शनची प्रतीक्षा आता संपली आहे. २४ तासांहून कमी कालावधीत आयपीएल 2022 ऑक्शनला सुरुवात होणार आहे. ५९० खेळाडूंनी आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत. त्यात २०३ गोलंदाज, १०२ फलंदाज, २२७ अष्टपैलू आणि ५८ यष्टिरक्षकांचा समावेश आहे. पण, यापैकी पहिल्या दिवशी केवळ १६१ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे आणि तुम्हाला माहित्येक का कोणत्या खेळाडूंपासून लिलावाला सुरुवात होणार आहे.
आयपीएल लिलावासाठीच्या अंतिम ५९० खेळाडूंची नावे जाहीर करताना बीसीसीआयनं १० Marquee खेळाडूंची नावही जाहीर केली होती. शिखर धवन, मोहम्मद शमी, फॅफ ड्यू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर, आर अश्विन, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा आणि ट्रेंट बोल्ट यांना Marquee खेळाडूंचा मान दिला गेला आहे. त्यांच्यापासूनच आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात होणार आहे. त्यामुळे लिलावाच्या सुरुवातीलाच पैशांचा पाऊस पडलेला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक फ्रँचायझींना हवे असलेले हे खेळाडू आहेत.
खेळाडूंच्या लिलावाचा क्रम कसा आहे आणि लिलावाची प्रक्रिया कशी आहे?
- १० Marquee खेळाडूंपासून लिलावाला सुरुवात केली जाईल
- त्यानंतर खेळाडूंची त्यांच्या स्पेशालिटीनुसार वर्गवारी केली गेली आहे...
- Marquee खेळाडूंव्यतिरिक्त ६२ खेळाडूंचा एक सेट तयार करण्यात आला आहे
- Marquee खेळाडूंपाठोपाठ कॅप्ड ( राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले) खेळाडूंची फलंदाज, अष्टपैलू, यष्टिरक्षक-फलंदाज, जलदगती गोलंदाज आणि फिरकीपटू अशा वर्गवारीनुसार बोली लावण्यात येईल
- आयपीएल ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी अनकॅप्ड खेळाडूंची आणि पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंवर बोली लावली जाईल.
१० संघ, ५९० खेळाडू मैदानात पण, केवळ २१७ जणांसाठी पडणार ५५६.३ कोटींचा पाऊस
- पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( १४ कोटी), अर्षदीप सिंग (४ कोटी) ; शिल्लक रक्कम - ७२ कोटी
- सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( १४ कोटी), अब्दुल समद ( ४ कोटी), उम्रान मलिक ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ६८ कोटी
- राजस्थान रॉयल्स - सजू सॅमसन ( १४ कोटी), जोस बटलर ( १० कोटी), यशस्वी जैस्वाल ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ६२ कोटी
- लखनौ सुपर जायंट्स- लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) व रवी बिश्नोई ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ५८ कोटी
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी), मोहम्मद सिराज ( ७ कोटी); शिल्लक रक्कम - ५७ कोटी
- गुजरात टायटन्स - हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी); शिल्लक रक्कम - ५२ कोटी
- चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( १६ कोटी), महेंद्रसिंग धोनी ( १२ कोटी), ऋतुराज गायकवाड( ६ कोटी) , मोईन अली (८ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
- मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( १६ कोटी), जसप्रीत बुमराह ( १४ कोटी), किरॉन पोलार्ड ( ६ कोटी), सूर्यकुमार यादव ( ८ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
- कोलकाता नाइट रायडर्स - आंद्रे रसेल ( १२ कोटी), वरुण चक्रवर्थी ( ८ कोटी), वेंकटेश अय्यर ( ८ कोटी) , सुनील नरीन ( ६ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
- दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( १६ कोटी), अक्षर पटेल ( १२ कोटी), पृथ्वी शॉ ( ८ कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे ( ६ कोटी); शिल्लक रक्कम - ४७ कोटी
कोणत्या संघाला किती खेळाडू करता येतील करारबद्ध
- चेन्नई सुपर किंग्स - २१ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)
- दिल्ली कॅपिटल्स - २१ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)
- कोलकाता नाइट रायडर्स - २१ खेळाडू ( त्यापैकी ६ परदेशी )
- लखनौ सुपर जायंट्स - २२ खेळाडू ( त्यापैकी ७ पदेशी)
- मुंबई इंडियन्स - २१ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)
- पंजाब किंग्स - २३ खेळाडू ( त्यापैकी ८ परदेशी)
- राजस्थान रॉयल्स - २२ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २२ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)
- सनरायझर्स हैदराबाद - २२ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)
- गुजरात टायटन्स - २२ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)