IPL Auction 2022: ५,५१,७०,००,००० रुपयांची उलाढाल... २०४ शिलेदारांची खरेदी; मेगा लिलावात उगवत्या ताऱ्यांची चांदी

LIVE

IPL Auction 2022: यंदाच्या लिलावात विदेशी खेळाडूंपेक्षाही भारतीय खेळाडूंवर महागडी बोली लागल्या. त्यातही भारतीय क्रिकेटचं भविष्य समजल्या जाणाऱ्या नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संघमालकांची मोठी पसंती दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 10:48 PM2022-02-11T22:48:19+5:302022-02-13T21:51:06+5:30

whatsapp join usJoin us
ipl auction 2022 live updates ipl auction news 2022 live streaming marathi | IPL Auction 2022: ५,५१,७०,००,००० रुपयांची उलाढाल... २०४ शिलेदारांची खरेदी; मेगा लिलावात उगवत्या ताऱ्यांची चांदी

IPL Auction 2022: ५,५१,७०,००,००० रुपयांची उलाढाल... २०४ शिलेदारांची खरेदी; मेगा लिलावात उगवत्या ताऱ्यांची चांदी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Auction 2022: इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) १५ व्या पर्वासाठीचा दोन दिवसीय 'मेगा लिलावा'त तब्बल ५५१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल पाहायला मिळाली. ५९० खेळाडूंसाठी घेण्यात आलेल्या आयपीएल लिलावातील एकूण २०४ खेळाडूंचं नशीब चमकलं. महत्त्वाची बाब म्हणजे यंदाच्या हंगामासाठी झालेल्या लिलावात भारतीय खेळाडू आणि विशेषत: युवा क्रिकेटपटूंना संघांनी पसंती दाखवली. यंदाच्या वर्षापासून ८ ऐवजी १० संघ खेळणार असल्याने जास्त खेळाडूंना संधी मिळाली. भारताचा डावखुरा फलंदाज-यष्टीरक्षक इशान किशन याच्यावर सर्वाधिक म्हणजेच १५ कोटी २५ लाखांची बोली लागली. मुंबई इंडियन्सच्या संघाने संपूर्ण जोर लावत त्याला आपल्या संघात कायम राखलं. तर अष्टपैलू दीपक चहर हा १४ कोटींच्या बोलीसह लिलावातील दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला. त्याला महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या ताफ्यात राखण्यासाठी मोठी किंमत मोजली. याशिवाय, भारतीय संघातून अद्याप पदार्पणाची संधी मिळाली नसलेल्या अनेक नव्या युवा खेळाडूंवर तगडी बोली लावण्यात आली.

LIVE

Get Latest Updates

09:03 PM

मुंबई इंडियन्सने घेतला वेस्ट इंडिजचा दमदार खेळाडू फॅबियन अँलन

मुंबई इंडियन्सने वेस्ट इंडिजचा दमदार खेळाडू फॅबियन अँलन याला आपल्या ताफ्यात ७५ लाखांच्या किमतीत दाखल करून घेतला होता.

08:58 PM

सिद्धार्थ कौलवर लागली ७५ लाखांची बोली

IPL चा अनुभव असलेल्या सिद्धार्थ कौलवर RCB ने ७५ लाखांची बोली लावली.

08:57 PM

U19 स्टार विकी ओस्तवाल दिल्लीच्या संघात

U19 विश्वविजेत्या भारतीय संघातील स्टार खेळाडू विकी ओस्तवाल याला २० लाखांत दिल्लीच्या संघाने विकत घेतलं.

08:54 PM

मोहम्मद नबी, उमेश यादव दोघेही कोलकाताच्या संघात दाखल

अफगाणिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नबीला कोलकाताने १ कोटीच्या मूळ किमतीत तर उमेश यादवला २ कोटींच्या मूळ किमतीत संघात दाखल करून घेतलं.

08:30 PM

अर्जुन तेंडुलकर पुन्हा झाला 'मुंबईकर'; हार्दिकच्या गुजरातनेही लावली होती बोली

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला. २० लाखांच्या मूळ किमतीवर ५ लाख बोली वाढवत हार्दिकच्या गुजरात टायटन्सनेही त्याच्यावर बोली लावली होती. पण मुंबईने ३० लाखांत अर्जुनला विकत घेतलं.

08:24 PM

टाळ्यांच्या कडकडाटात ह्यूज एडमीड्स पुन्हा 'ऑक्शनर' म्हणून हजर! साऱ्यांनी उभं राहत केलं स्वागत

ह्यूज एडमीड्स यांना काल भोवळ आल्याने त्यांना विश्रांती देण्यात आली होती. पण आज शेवटच्या टप्प्यात ते पुन्हा 'ऑक्शनर' म्हणून हजर झाले. त्यावेळी साऱ्यांनी उभं राहत त्यांचं स्वागत केलं.

08:15 PM

ऋतिक शौकीन आला मुंबईच्या संघात

ऋतिक शौकीन ला मुंबई इंडियन्सच्या संघाने २० लाखांत घेतलं ताफ्यात

08:11 PM

मुंबई इंडियन्सने २० लाखांत राहुल बुद्धीला घेतलं संघात

मुंबई इंडियन्सने नवख्या राहुल बुद्धीला २० लाखांच्या मूळ किमतीत संघात सामील करून घेतलं.

08:07 PM

न्यूझीलंडचा टीम साऊदी कोलकाताच्या संघात

न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी याला कोलकाताच्या संघाने दीड कोटींच्या मूळ किमतीवर संघात दाखल करून घेतलं.

08:00 PM

मुंबईच्या संघाने रमणदीप सिंगला मूळ किमतीत घेतलं संघात

मुंबई इंडियन्सच्या संघाने रमणदीप सिंग याला मूळ २० लाखांच्या किमतीत संघात सामील करून घेतलं.

07:56 PM

ग्लेन फिलिपला हैदराबादने घेतलं विकत

ग्लेन फिलिपवर हैदराबादच्या संघाने बोली लावत १.५० कोटींना विकत घेतलं.

07:53 PM

भारतीय कसोटी त्रिशतकवीर करूण नायर राजस्थानच्या ताफ्यात दाखल

भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकणाऱ्या करूण नायरवर राजस्थानच्या संघाने १ कोटी ४० लाखांची बोली लावली.

07:50 PM

मुंबई इंडियन्सकडून खेळलेला एव्हिन लुईस आता दिसणार लखनौच्या संघात

मुंबई इंडियन्सकडून खेळलेला वेस्ट इंडिजचा सलामीवीर एव्हिन लुईस आता केएल राहुलच्या लखनौ संघाकडून खेळताना दिसणार. त्याला २ कोटींच्या मूळ किमतीवर विकत घेण्यात आलं.

07:47 PM

अलेक्स हेल्सवर अखेर कोलकाताने लावली बोली

इंग्लंडचा दमदार फलंदाज अलेक्स हेल्स याला दुसऱ्या फेरीत अखेर कोलकाताने दीड कोटींच्या बोलीवर संघात सामील करून घेतलं.

07:45 PM

इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन चेन्नईच्या संघात दाखल

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस जॉर्डन याला चेन्नईच्या संघाने ३ कोटी ६० लाखांच्या बोलीवर संघात सामील करून घेतलं.

07:35 PM

धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर गुजरातच्या संघात

आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर याची मूळ किंमत १ कोटींची होती. त्याच्यावर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये झुंज पाहायला मिळाली. अखेर गुजरातच्या संघाने ३ कोटींना त्याला विकत घेतलं.

07:35 PM

धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर गुजरातच्या संघात

आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर याची मूळ किंमत १ कोटींची होती. त्याच्यावर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये झुंज पाहायला मिळाली. अखेर गुजरातच्या संघाने ३ कोटींना त्याला विकत घेतलं.

07:35 PM

अनमोलप्रीत सिंह मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

अनमोलप्रीत सिंहला मूळ २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स ने आपल्या ताफ्यात घेतलं.

07:33 PM

पाकिस्तानला टी२० वर्ल्डकप मध्ये बाहेरचा रस्ता दाखवणारा मॅथ्यू वेड गुजरातच्या संघात

पाकिस्तानला टी२० वर्ल्डकप मध्ये बाहेरचा रस्ता दाखवणारा ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड गुजरातच्या संघात सामील झाला. त्याच्यावर २ कोटी ४० लाखांची बोली लागली.

07:31 PM

वृद्धिमान साहा गुजरातच्या संघात सामील

अनुभवी वृद्धिमान साहा १ कोटी ९० लाखांच्या बोलीवर गुजरातच्या संघात सामील झाला. तो गेल्या वर्षीपर्यंत हैदराबादच्या संघातून खेळत होता.

07:29 PM

सॅम बिलिंग्स २ कोटींना कोलकाताच्या संघात

इंग्लंडचा फलंदाज सॅम बिलिंग्स याच्यावर कोलकाताने २ कोटींच्या मूळ किमतीवर बोली लावली. आणि त्याच किमतीत त्याला संघात घेण्यात आलं.

07:27 PM

धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर गुजरातच्या संघात

आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर याची मूळ किंमत १ कोटींची होती. त्याच्यावर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये झुंज पाहायला मिळाली. अखेर गुजरातच्या संघाने ३ कोटींना त्याला विकत घेतलं.

06:17 PM

अनुनय सिंह राजस्थान रॉयल्सच्या संघात

अनुनय सिंह २० लाखांच्या बोलीसह राजस्थान रॉयल्सच्या संघात दाखल

06:15 PM

अशोक शर्मावर ५५ लाखांची बोली

अशोक शर्मावर ५५ लाखांची बोली लावत कोलकाता नाइट रायडर्सन युवा खेळाडूला संघात दिलं स्थान

06:13 PM

अंश पटेल पंजाबच्या ताफ्यात 

अंश पटेल या युवा खेळाडूला २० लाखांच्या बोलीसह मिळालं पंजाब किंग्ज संघात स्थान
 

06:11 PM

मोहम्मद अशरफ खान मुंबईच्या ताफ्यात

मोहम्मद अशरफ खान २० लाखांच्या बोलीसह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल

06:10 PM

सौरव दुबे सनरायझर्स हैदराबाद संघात

२० लाखांच्या बोलीसह सौरव दुबे सनरायझर्स हैदराबादच्या संघात दाखल

05:55 PM

बाबा इंद्रजीत २० लाखांच्या बोलीसह केकेआरमध्ये

युवा खेळाडू बाबा इंद्रजीत २० लाखांच्या बोलीसह कोलकाता नाइट रायडर्स संघात दाखल

05:48 PM

रायली मेरिडिथ मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

१ कोटींची बोली लावत मुंबई इंडियन्स संघानं गोलंदाज रायली मेरिडिथला संघात दाखल करुन घेतलं. 
 

05:45 PM

अल्जारी जोसेफवर २.४० कोटींची बोली

अल्जारी जोसेफवर २.४० कोटींची बोली लावत गुजरात टायटन्सची बाजी

05:41 PM

शॉन एबटवर २.४० कोटींची बोली

वेगवान गोलंदाज शॉन एबटवर २.४० कोटींची बोली लावत संघानं मारली बाजी

05:34 PM

मार्टिन गप्टिल अनसोल्ड

न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल ठरला अनसोल्ड

05:21 PM

प्रशांत सोलंकी चेन्नईच्या संघात

प्रशांत सोलंकीवर १.२० कोटींची बोली, चेन्नई सुपरकिंग्जनं संघात दाखल करुन घेतलं

05:13 PM

मोहसीन खान लखनौ सुपरजाएंट्सच्या ताफ्यात

युवा खेळाडू मोहसीन खान २० लाखांच्या बोलीसह लखनौ सुपरजाएंट्सच्या संघात दाखल

05:10 PM

युवा वेगवान गोलंदाज रसिक डारवर कोलकाताची बोली

युवा वेगवान गोलंदाज रसिक डार याच्यावर २० लाखांची बोली लावत कोलकाताच्या संघात दाखल

05:08 PM

युवा खेळाडू वैभव अरोडावर २ कोटींची बोली

वैभव अरोडावर २ कोटींची बोली लावत पंजाब किंग्ज संघानं मारली बाजी

04:43 PM

अॅडम मिल्न चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात

वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नवर १.९० कोटींची बोली लावत चेन्नई सुपरकिंग्ज संघानं त्याला संघात दाखल करुन घेतलं आहे. 

04:43 PM

मुंबई इंडियन्सच्या खेळीनं सारेच चितपट, टीम डेव्हिडवर ८.२५ कोटींची बोली

मुंबई इंडियन्सनं धिप्पाड टीम डेव्हिडवर तब्बल ८.२५ कोटींची बोली लावत संघात दाखल केलं आहे. टीम डेव्हिडकडे हार्दिक पंड्याच्या जागी पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.

04:40 PM

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आणखी एक गोलंदाज

टायमल मिल्सवर १.५० कोटींची बोली लावत मुंबईत इंडियन्स संघात आणखी एक वेगवान गोलंदाज दाखल केला

04:37 PM

ओबेद मेकॉय राजस्थानमध्ये दाखल

ओबेद मेकॉय ७५ लाखांच्या बोलीसह राजस्थान रॉयल्समध्ये दाखल

04:34 PM

मिचेल सँटनर चेन्नईच्या संघात

फिरकीपटू मिचेल सँटनर १ कोटी ९० लाखांच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात

04:33 PM

रोमारिओ शेफर्डवर ७.७५ कोटींची बोली

रोमारिओ शेफर्डसाठी राजस्थान आणि हैदराबादमध्ये चुरस, अखेर ७.७५ कोटींच्या बोलीसह हैदराबादनं मारली बाजी

04:25 PM

बिग बॅश लीगचा गोलंदाज मुंबईनं उचलला

मुंबई इंडियन्सनं डॅनियल सॅम्सवर २.६० कोटींची बोली लावत संघात दाखल केलं. मुंबईला डावखुरा वेगवान गोलंदाज मिळाला. 

04:18 PM

मुंबई इंडियन्सच्या गळाला मोठा मासा, जोफ्रा आर्चर संघात दाखल

हातचं राखून खर्च केलेल्या मुंबई इंडियन्स संघानं अखेर सर्वांनाच मोठा धक्का देत वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरसाठी खिसा रिकामा केला आहे. ८ कोटींच्या बोलीसह मुंबईनं जोफ्रा आर्चरला संघात दाखल केलं आहे. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे यंदाचं सीझन खेळणार नसला तरी दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून मुंबईनं 'स्मार्ट खेळी' केली आहे. 

04:07 PM

रोवमन पॉवेलवर २ कोटी ८० लाखांची बोली

रोवमन पॉवेल २.८० कोटींच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल

04:01 PM

डेविन कॉनवेवर १ कोटींची बोली

डेविन कॉनवे १ कोटीच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात दाखल झाला आहे.

03:57 PM

आता केवळ १०६ खेळाडूंची यादी शिल्लक

सर्व संघांकडून देण्यात आलेल्या १०६ खेळाडूंवर आता अखेरची बोली लागण्यास सुरुवात होत आहे. या यादीतील खेळाडूंची नावं संघांनीच दिली आहेत.

03:45 PM

यश दयालवर तब्बल ३.२० कोटींची बोली

युवा क्रिकेटपटू यश दयाल याची बेस प्राइज २० लाख होती. त्यावर तब्बल ३.२० कोटींपर्यंत बोली लागली. यात गुजरात टायटन्सनं बाजी मारली.

03:35 PM

अंडर-१९ वर्ल्डकपमधील हिरोवर २ कोटींची बोली

बेस प्राइज २० लाख असलेल्या अंडर-१९ विश्वविजेत्या भारतीय संघातील राज अंगद बावा याच्यावर लागली २ कोटींपर्यंत बोली, पंजाब किंग्जच्या ताफ्यात दाखल

03:27 PM

संजय यादव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

अष्टपैलू संजय यादव ५० लाखांच्या बोलीसह मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे.

03:24 PM

मुंबई इंडियन्सनं अंडर-१९ खेळाडूसाठी मोजले १.७० कोटी!

मुंबई इंडियन्सनं १९ वर्षाखालील क्रिकेटमधील युवा खेळाडू तिलक वर्मा याच्यासाठी १.७० कोटींची बोली लगावत संघात दाखल करुन घेतलं आहे.

03:19 PM

ललीत यादव दिल्लीच्या संघात

अष्टपैलू ललीत यादव ६५ लाखांच्या बोलीसह दिल्लीच्या संघात दाखल
 

03:19 PM

अंडर-१९ विश्वविजेत्या टीम इंडियाचा कर्णधार दिल्लीच्या ताफ्यात

अंडर-१९ वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा युवा कर्णधार यश धूल ५० लाखांच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल.

02:16 PM

मनन वोहरा खेळणार लखनौ संघातून

फलंदाज मनन वोहरावर ५० लाखांची बोली लावत लखनौ संघानं केलं संघात दाखल

02:15 PM

रिंकू सिंहवर ५५ लाखांची बोली

युवा फलंदाज रिंकू सिंहवर ५५ लाखांची बोली लावत कोलकाता संघानं संघात दाखल करुन घेतलं

02:10 PM

पियूष चावला अनसोल्ड

१ कोटींची बेस प्राइज असलेला फिरकीपटू पियूष चावला ठरला अनसोल्ड

02:07 PM

शाहबाज नदीम लखनौच्या संघात

शाहबाज नदीम याला लखनौ सुपरजाएंट्सनं ५० लाखांच्या बोलीसह संघात दाखल करुन घेतलं आहे. 

02:06 PM

मयंक मार्केंडेय मुंबईच्या ताफ्यात

फिरकीपटू मयंक मार्केंडेय ६५ लाखांच्या बोलीसह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल

01:58 PM

नेथन कुल्टर-नाइल अनसोल्ड

२ कोटींची बेस प्राइज असलेला वेगवान गोलंदाज नेथन कुल्टर नाइल ठरला अनसोल्ड

01:53 PM

नवदीप सैनीवर २.६० कोटींची बोली, राजस्थानच्या संघात दाखल

वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यंदा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार, राजस्थाननं मोजले २.६० कोटी

01:53 PM

मुंबईला अखेर वेगवान गोलंदाज मिळाला, जयदेव उनाडकट संघात दाखल

मुंबई इंडियन्सला अखेर डावखुरा वेगवान गोलंदाज मिळाला, १.३० कोटींच्या बोलीसह जयदेव उनाडकटला केलं संघात दाखल

01:48 PM

चेतन साकरियावर ४.२० कोटींची बोली

भारतीय युवा गोलंदाज चेतन साकरियाला मिळाली ४.२० कोटींची बोली, यंदा दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून खेळणार

01:36 PM

दुष्मंता चमीरावर २ कोटींची बोली

वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरावर २ कोटींची बोली लावत लखनौ सुपरजाएंट्सनं मारली बाजी

01:26 PM

इशांत शर्मा अनसोल्ड

वेनवान गोलंदाज इशांत शर्मा ठरला अनसोल्ड

01:26 PM

खलील अहमद दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात

डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद ५.२५ कोटींच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल

01:14 PM

के. गौतमवर यावेळी फक्त ९० लाखांची बोली

गेल्या आयपीएलमध्ये ९.२५ कोटींची बोली लागलेला के. गौतम यंदा मात्र ९० लाखांच्या बोलीसह लखनौ सुपरजाएंट्समध्ये दाखल 

01:10 PM

शिवम दुबे धोनीच्या संघात

शिवम दुबे यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसणार, ४ कोटींच्या बोलीसत धोनीच्या संघात दाखल

01:05 PM

मार्को जेसनसाठी मुंबई, हैदराबादमध्ये चढाओढ

मार्को जेसनसाठी मुंबई, हैदराबादमध्ये चढाओढ ,अखेर हैदराबादनं ४.२ कोटींची बोली लावली आणि संघात दाखल करून घेतलं

12:57 PM

ओडियन स्मिथ पंजाब किंग्जच्या संघात

ओडियन स्मिथ ६ कोटींच्या बोलीसह पंजाब किंग्जच्या संघात दाखल  

12:19 PM

इऑन मॉर्गन अनसोल्ड!

गेल्या आयपीएलमध्ये उपविजेता संघ ठरलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार इऑन मॉर्गन चक्क अनसोल्ड राहिला. कोणत्याच संघानं त्याच्यात रस दाखवला नाही.

12:19 PM

लियाम लिव्हिंगस्टोनसाठी पंजाब आणि गुजरातमध्ये चढाओढ

अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन याला संघात दाखल करुन घेण्यासाठी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्या चुरस पाहायला मिळाली. अखेर पंजाब किंग्जनं ११.५० कोटींच्या बोलीसह संघात दाखल करुन घेतलं आहे.

12:17 PM

मनदीप सिंग दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात

मनदीप सिंग याच्यावर १.१० कोटींची बोली लावत दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं त्याला संघात दाखल करुन घेतलं आहे.

12:17 PM

डेविड मलान अनसोल्ड

डावखुरा आक्रमक फलंदाज डेविड मलान ठरला अनसोल्ड

12:15 PM

आयपीएल लिलावाला सुरुवात, आजचा पहिला खेळाडू एडन मार्करम

एडन मार्करम २ कोटी ६० लाखांच्या बोलीसह सनरायझर्स हैदराबादच्या संघात दाखल

12:15 PM

अजिंक्य रहाणे आता कोलकाताच्या संघात

अजिंक्य रहाणे १ कोटींच्या बेस प्राइजमध्येच कोलकाता नाइट रायडर्स संघात दाखल झाला. इतर कोणत्याही संघानं त्यात रस दाखवला नाही. 

12:14 PM

व्ह्यूज एडमीड्स अखेर आज दिसले!

आयपीएल लिलावावेळी भर कार्यक्रमात जागीच कोसळलेले 'ऑक्शनर' व्ह्यूज एडमीड्स अखेर आज समोर आले. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं. तसंच इतक्या महत्वाच्या कार्यक्रमात आपण पूर्ण कामगिरी करू शकलो नाही याबद्दल वाईट वाटत असल्याचंही ते म्हणाले. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं कळाल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. 

11:49 AM

थोड्याच वेळात आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्राला सुरुवात होणार

संघ मालक आणि व्यवस्थापक आयपीएल लिलावाच्या कार्यक्रम स्थळी पोहोचले असून थोड्याच वेळात लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

11:29 AM

आज लिलावासाठी कोणाच्या बटव्यात किती रक्कम आहे ते पाहूया...

चेन्नई सुपर किंग्स - २०. ४५ कोटी
दिल्ली कॅपिटल्स - १६.५० कोटी
गुजरात टायटन्स - १८.८५ कोटी
कोलकाता नाइट रायडर्स - १२.६५ कोटी
लखनौ सुपर जायंट्स - ६.९० कोटी
मुंबई इंडियन्स - २७. ८५ कोटी
पंजाब किंग्स - २८.६५ कोटी
राजस्थान रॉयल्स - १२.१५ कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ९.२५ कोटी
सनरायझर्स हैदराबाद - २०.१५ कोटी
 

11:13 AM

पहिल्या दोन सेट्समध्ये कोणकोणत्या खेळाडूंवर बोली लागणार?

आरोन फिंच, मार्नस लाबुशेन, डेव्हिड मलान, एडन मार्कराम, इयॉन मॉर्गन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, सौरभ तिवारी, शिवम दुबे, केसी गौथम, मार्को येनसेन , ख्रिस जॉर्डन, लिएम लिव्हिंगस्टोन, जिमी निशॅम,  ओडीन स्मिथ. यांच्यावर दुपारी १२ वाजल्यापासून बोली सुरू होणार आहे.
 

09:39 PM

संपूर्ण लिलावावर एक नजर..

आज दिवसभरात १० संघांकडून एकूण ७४ खेळाडूंची खरेदी करण्यात आली. यात २० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. एकूण ३८८ कोटी १० लाखांचा व्यवहार आज झाला आहे.

09:34 PM

आर.साई.किशोरला ताफ्यात घेण्यासाठी धोनीच्या पायघड्या, पण गुजरातनं मारली बाजी

आर.साई.किशोरला ताफ्यात घेण्यासाठी धोनीच्या पायघड्या, पण अखेरीस गुजरातनं मारली बाजी, ३ कोटींची बोली! 

09:28 PM

जगदीश सुचित हैदराबादमध्ये

जगदीश सुचित २० लाखांच्या बेस प्राइजमध्येच सनरायझर्स हैदराबादमध्ये दाखल

09:27 PM

श्रेयस गोपाल सनरायझर्स हैदराबादच्या संघात

श्रेयस गोपाल याला ७५ लाखांच्या बोलीसह सनरायझर्स हैदराबादनं संघात दाखल करून घेतलं आहे.

09:20 PM

मुरूगन अश्विन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

२० लाखांची बेस प्राइज असलेल्या मुरुगन अश्विनवर १.६० कोटींची बोली, मुंबई इंडियन्सला मिळाला फिरकीपटू

09:17 PM

नूर अहमद गुजरात टायटन्समध्ये

नूर अहमद ३० लाखांच्या बोलीसह गुजरात टायटन्सच्या संघात दाखल

09:15 PM

अंकित राजपूत लखनौच्या ताफ्यात

अंकित राजपूत ५० लाखांच्या बोलीसह लखनौ सुपर जाएंट्सच्या संघात दाखल

09:10 PM

आवेश खान ठरला सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू

२० लाखांची बेस प्राइज असलेल्या गोलंदाज आवेश खानवर तब्बल १० कोटींची बोली लावत लखनौ सुपरजाएंट्स संघानं मारली बाजी

09:02 PM

आकाश दीप आरसीबीकडे

आकाश दीप २० लाखांच्या बेस प्राइजमध्येच आरसीबीच्या संघात दाखल

08:47 PM

अनुज रावतवर आरसीबीकडून ३.४० कोटींची बोली

अनुज रावतवर ३.४० कोटींची बोली लावत आरसीबीनं दाखवला युवा क्रिकेटपटूवर विश्वास

08:47 PM

कार्तिक त्यागीवर ४ कोटींची बोली

२० लाख बेस प्राइज असलेल्या कार्तिक त्यागीवर तब्बल ४ कोटींची बोली, सनरायजर्स हैदराबादच्या संघात दाखल

08:41 PM

केएस भरत दिल्ली कॅपिटल्सच्या संघात

केएस भरत २ कोटींच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघात

08:24 PM

शाहबाज अहमद आरसीबीच्या संघात

शाहबाज अहमद याच्यावर २.४० कोटींची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं बाजी मारली आहे

08:19 PM

हरप्रीत ब्रार पुन्हा एकदा पंजाबच्या ताफ्यात

हरप्रीत ब्रारवर ३.४० कोटींची बोली, पंजाब किंग्जच्या संघात दाखल

08:15 PM

कमलेश नागरकोटीला मिळाले १.१० कोटी

गोलंदाज कमलेश नागरकोटीवर तब्बल १.१० कोटींची बोली लागली. दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल

07:58 PM

शिवम मावी ७ कोटी २५ लाखांच्या बोलीसह कोलकाताच्या संघात

४० लाख बेस प्राइज असलेल्या शिवम मावीवर ७ कोटी २५ लाखांची बोली लावत कोलकाता नाइट रायडर्सनं मारली बाजी

07:58 PM

राहुल तेवतिया तब्बल ९ कोटींच्या बोलीसह गुजरातच्या संघात

राहुल तेवतिया तब्बल ९ कोटींच्या बोलीसह गुजरात टायटन्सच्या संघात दाखल झाला आहे.

07:54 PM

शाहरुख खानवर तब्बल ९ कोटींची बोली

गेल्या आयपीएलमध्ये ५.२५ कोटींची बोली मिळालेल्या शाहरुख खानवर आज तब्बल ९ कोटींची बोली लागली, पंजाब किंग्जच्या संघात दाखल

07:41 PM

अभिषेक शर्मावर तब्बल ६.५० कोटींची बोली

बेस प्राइज २० लाख असलेल्या अभिषेक शर्मावर दौलत जादा! तब्बल ६.५० कोटींची बोली लावत सनरायझर्स हैदराबाद संघात दाखल

07:32 PM

रियान परागसाठी चढाओढ, अखेर राजस्थानच्या संघात दाखल

रियान परागला संघात घेण्यासाठी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये चढाओढ; ३० लाखांची बेस प्राइज असलेल्या रियानला मिळाले ३.८० कोटी

07:18 PM

प्रियम गर्ग हैदराबादकडून खेळणार

प्रियम गर्ग २० लाखांच्या बेस प्राइजमध्येच सनरायझर्स हैदराबादच्या संघात दाखल

07:16 PM

डिवॉल्ड ब्रेविसवर ३ कोटींची बोली, मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल

२० लाखांची बेस प्राइज असलेल्या डिवॉल्ड ब्रेविसवर मुंबई इंडियन्सनं लावली ३ कोटींची बोली; फक्त दोन ट्वेन्टी-२० सामने खेळलेल्या ब्रेविसनं केल्या १६७ धावा.

06:41 PM

फिरकीपटू युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्सकडून खेळणार

यजुवेंद्र चहलला संघात घेण्यासाठी मुंबईची धडपड, पण मारली राजस्थाननं बाजी!; ६.५० कोटींच्या बोलीसह राजस्थान रॉयल्सकडून खेळणार

06:32 PM

फिरकीपटू राहुल चहरवर ५.२५ कोटींची बोली

७५ लाख बेस प्राइज असलेल्या फिरकीपटू राहुल चहरवर ५.२५ कोटींची बोली; पंजाब किंग्जच्या संघात दाखल   

06:21 PM

कुलदीप यादववर २ कोटींची बोली

फिरकीपटू कुलदीप यादव २ कोटींच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल

06:18 PM

फिरकीपटू इम्रान ताहिर अनसोल्ड

फिरकीपटू इम्रान ताहिर पहिल्या फेरी अखेरीस अनसोल्ड राहिला आहे. गेल्या वर्षी ताहिर चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळला होता. 

06:14 PM

मुस्तफिजुर रेहमान राजस्थान रॉयल्सच्या संघात

वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रेहमान २ कोटींच्या बोलीसह राजस्थान रॉयल्सच्या संघात दाखल

06:12 PM

शार्दुल ठाकूर आता दिल्लीकडून खेळणार

शार्दुल ठाकूर आता चेन्नई नव्हे, दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार; १०.७५ कोटींच्या बोलीसह दिल्लीनं विकत घेतलं

06:05 PM

भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादत्या ताफ्यात

भुवनेश्वर कुमार ४.२० कोटींच्या बोलीसह सनरायझर्स हैदराबादच्या संघात दाखल झाला आहे

05:59 PM

मार्क वुड ७.७५ कोटींच्या बोलीसह लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यात

गोलंदाज मार्क वुड ७.७५ कोटींच्या बोलीसह लखनौ सुपर जाएंट्सच्या संघात दाखल

05:54 PM

जोश हेजलवुड विराट कोहलीच्या ताफ्यात

वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड ७.७५ कोटींच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघात दाखल

05:49 PM

लॉकी फर्ग्युसन गुजरात टायटन्सच्या ताफ्यात

अष्टपैलू लॉकी फर्ग्युसन १० कोटींच्या बोलीसह गुजरात टायटन्सच्या संघात दाखल

05:42 PM

युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा मालामाल!

भारताचा युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा १० कोटींच्या बोलीसह राजस्थान रॉयल्स संघात दाखल
 

05:33 PM

उमेश यादव ठरला अनसोल्ड

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्यावर एकाही संघाकडून बोली लावण्यात आली नाही

05:21 PM

टी नटराजन पुन्हा सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात

टी नटराजन पुन्हा सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात. ४ कोटींची बोली.

05:21 PM

दीपक चहरचा 'कहर'

गोलंदाज दीपक चाहरवर तब्बल १४ कोटींची बोली, चेन्नई सुपर किंग्जची आयपीएलच्या इतिहासातील आजवरची सर्वाधिक बोली

05:02 PM

निकोलस पुरन सनरायझर्सच्या ताफ्यात

वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक निकोलस पुरन याच्यावर १०.७५ कोटींची बोली लावत सनरायझर्स हैदराबादनं संघात दाखल केलं आहे.

04:52 PM

वृद्धीमान साहा ठरला अनसोल्ड

यष्टीरक्षक वृद्धीमान साहा याला संघात दाखल करुन घेण्यास कोणत्याही संघान रस दाखवला नाही.

04:50 PM

दिनेश कार्तिक आता विराटच्या संघात दिसणार

दिनेश कार्तिकवर ५.५० कोटींची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं त्याला आपल्या ताफ्यात दाखल केलं आहे. दिनेश कार्तिकच्या रुपात विराटच्या संघाला यष्टीरक्षक आणि एक फिनिशर मिळाला आहे.

04:44 PM

अंबाती रायुडू पुन्हा चेन्नई सुपरकिंग्ज संघात

अंबाती रायुडूवर ६.७५ कोटींची बोली लावत चेन्नई सुपरकिंग्ज संघानं संघात दाखल केलं आहे

04:41 PM

जॉनी बेअरस्ट्रो पंजाब किंग्जच्या संघात

जॉनी बेअरस्ट्रो ६.७५ कोटींच्या बोलीसह पंजाब किंग्जच्या संघात दाखल

04:33 PM

ईशान किशनसाठी मुंबईकडून दौलत जादा!

ईशान किशनसाठी मुंबई इंडियन्स संघाकडून तब्बल १५.२५ कोटींची बोली. आयपीएलच्या इतिहासात भारतीय यष्टीरक्षकाला आजवर मिळालेली सर्वोत्तम बोली. 

04:17 PM

मॅथ्यू वेड अनसोल्ड

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज मॅथ्यू वेड अनसोल्ड ठरला. एकाही संघानं लिलावात रस दाखवला नाही.

04:12 PM

मिचेल मार्श ६.५० कोटींच्या बोलीसह दिल्लीच्या संघात

मिचेल मार्श तब्बल ६.५० कोटींच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल झाला आहे.

03:58 PM

वॉशिंग्टन सुंदर ८.७५ कोटी रुपयांत सनरायझर्स हैदराबाद संघात

१.५० कोटींची बेस प्राइज असलेल्या वॉशिंग्टन सुंदर याला ८.७५ कोटी रुपयांत सनरायझर्स हैदराबाद संघात दाखल केलं.

03:58 PM

कृणाल पंड्यासाठी चुरस, अखेर लखनौच्या संघात दाखल

अष्टपैलू कृणाल पंड्या लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यात, ८.२५ कोटींची बोली

03:56 PM

ह्यूज एडमीड्स यांची प्रकृती उत्तम, लिलावाला पुन्हा सुरुवात

आयपीएल लिलावाचे सुत्रसंचालक व्ह्यूज एडमीडस लिलाव सुरू असताना जागीच कोसळले होते. त्यांची तब्येत उत्तम असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जागी आता प्रो-कबड्डी लीगच्या लिलावाचे सुत्रसंचालक चारू शर्मा आयपीएल लिलावाचं सुत्रसंचालन करत आहेत.

03:51 PM

वानिंदु हसरंगा आरसीबीच्या ताफ्यात

वानिंदु हसरंगा १०.७५ कोटींच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ताफ्यात दाखल

03:30 PM

एडमीट्स यांच्याऐवजी चारू शर्मा करणार ऑक्शन

ऑक्शनर ह्युज एडमीट्स हे लिलाव सुरू असतानाच जागीच कोसळले होते. त्यामुळे काही वेळासाठी लिलाव थांबवण्यात आला होता. त्यांच्या ऐवजी आता चारू शर्मा हे पुढील ऑक्शन करणार आहेत.

03:28 PM

ऑक्शनर ह्यूज एडमीड्स यांची प्रकृती स्थिर, थोड्याच वेळात पुन्हा ऑक्शन सुरु होणार

ऑक्शनर ह्यूज एडमीड्स यांची प्रकृती स्थिर असून साडेतीन वाजता पुन्हा ऑक्शन सुरू होणार आहे.

02:21 PM

मोठी घडामोड! आयपीएल ऑक्शनर जागीच कोसळले, कार्यक्रम थांबला

आयपीएलचे 'ऑक्शनर' ह्यूज एडमीड्स लिलाव सुरू असतानाच जागीच कोसळले. त्यामुळे लिलाव कार्यक्रम थांबला असून लंच टाइम घोषीत करण्यात आला आहे.

02:04 PM

दिपक हुडावर ५.७५ कोटींची बोली!

दिपक हुडावर ५.७५ कोटींची बोली लावत लखनौ सुपरजाएंट्स संघानं मारली बाजी. 

01:51 PM

शाकीब अल हसन अनसोल्ड

अष्टपैलू शाकीब अल हसन अनसोल्ड ठरला आहे. एकाही संघानं उत्सुकता दाखवली नाही.

01:51 PM

हर्षल पटेलसाठी हैदराबाद आणि आरसीबीमध्ये चुरस

गेल्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या हर्षल पटेल याच्यावर तब्बल १०.७५ कोटींची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं त्याला संघात दाखल करून घेतलं आहे.

01:50 PM

जेसन होल्डरला संघात घेण्यासाठी चुरस, लखनौची बाजी

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डर याला संघात दाखल करुन घेण्यासाठी दिल्ली, मुंबई, रॉयल्स आणि लखनौमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. अखेर ८.७५ कोटींच्या बोलीसह लखनौ सुपरजाएंट्स संघानं त्याला संघात दाखल करुन घेतलं.

01:45 PM

नितेश राणा मालामाल!

१ कोटींची बेस प्राइज असलेला नितेश राणा ८ कोटींच्या बोलीसह कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात दाखल

01:43 PM

ड्वेन ब्रावो चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात

ड्वेन ब्रावो ४.४० कोटींच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात दाखल 

01:38 PM

सुरेश रैना आणि स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड

'मिस्टर आयपीएल'वर बोलीच नाही! सुरेश रैनाला संघात दाखल करुन घेण्यास कुणीच इच्छुक नव्हतं त्यामुळे अनसोल्ड राहिला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ देखील अनसोल्ड राहिला आहे.

01:36 PM

देवदत्त पडिक्कलचं नाव येताच...संघांमध्ये चुरस अखेरीस राजस्थाननं मारली बाजी

आयपीएलच्या गेल्या सीझनमध्ये जोरदार कामगिरी केलेल्या देवदत्त पडिक्कल याच्यावर ७.७५ कोटींची बोली, राजस्थान रॉयल्सच्या संघात दाखल

01:30 PM

आयपीएलच्या मेगा लिलावात पहिला अनसोल्ड खेळाडू ठरला डेव्हिड मिलर

डेव्हिड मिलरला संघात दाखल करुन घेण्यासाठी कुणीही इच्छुक नाही. ठरला अनसोल्ड.

01:29 PM

जेसन रॉय गुजरात टायटन्सच्या संघात..

जेसन रॉयच्या रुपात गुजरात टायटन्सला मिळाला ओपनर, २ कोटींच्या बोलीसह गुजरातच्या संघात दाखल

01:28 PM

रॉबीन उथप्पा बेस प्राइजमध्ये चेन्नईच्या संघात

रॉबीन उथप्पा २ कोटींच्या बेस प्राइजमध्येच चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात दाखल झाला. उथप्पावर इतर कोणत्याही संघानं स्वारस्य दाखवलं नाही.

01:26 PM

शिमरन हेटमायरसाठी चढाओढ, अखेर राजस्थान रॉयल्सच्या संघात दाखल

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू शिमरन हेटमायर याला संघात दाखल करुन घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चढाओढ, दीड कोटींची बेस प्राईजवरुन सुरू झालेली बोली पोहोचली ८.५० कोटींवर; राजस्थान रॉयल्स संघात झाला दाखल

01:20 PM

मनीष पांडे लखनौ सुपर जाएंट्सच्या संघात

भारतीय युवा फलंदाज मनीष पांडे याला संघात दाखल करुन घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात चढाओढ, १ कोटी बेस प्राइजवरुन सुरू झालेली बोली ४.६० कोटींवर पोहोचली अन् अखेरच्या क्षणाला लखनौ सुपरजाएंट्सनं मारली बाजी

01:04 PM

आतापर्यंत कुणावर किती बोली?

शिखर धवन- ८.२५ कोटी (पंजाब किंग्ज)
आर. अश्विन- ५ कोटी (राजस्थान)
पॅट कमिन्स- ७.२५ कोटी (केकेआर)
कगिसो रबाडा- ९.२५ कोटी (पंजाब)
शिखर धवन- ८.२५ कोटी (पंजाब किंग्ज)
आर. अश्विन- ५ कोटी (राजस्थान)
पॅट कमिन्स- ७.२५ कोटी (केकेआर)
कगिसो रबाडा- ९.२५ कोटी (पंजाब)
ट्रेंट बोल्ट- ८ कोटी (राजस्थान)
श्रेयस अय्यर- १२.२५ कोटी (कोलकाता)
मोहम्मद शमी- ६.२५ कोटी (गुजरात टायटन्स)
फॅफ ड्यू प्लेसिस- ७ कोटी (बंगळुरू)
क्विंटन डी कॉक- ६.७५ कोटी (लखनौ सुपरजाएंट्स )
डेव्हिड वॉर्नर- ६.२५ कोटी (दिल्ली कॅपिटल्स)

12:55 PM

डेव्हिड वॉर्नर दिल्लीच्या संघात...

डेव्हिड वॉर्नरला संघात दाखल करुन घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्लीच्या संघात चुरस पाहायला मिळाली. अखेर वॉर्नर ६.२५ कोटींच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल झाला आहे. 

12:50 PM

क्विंटन डी कॉक लखनौच्या संघात दाखल, गौतम गंभीर खूश

यष्टीरक्षक आणि फलंदाज क्विंटन डी कॉक ६.७५ कोटींच्या बोलीसह लखनौच्या संघात दाखल 

12:47 PM

फॅफ ड्यू प्लेसिस बंगलोरच्या संघात...

द.आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस आता विराट कोहलीसोबत खेळणार, ७ कोटींच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्सच्या संघात दाखल

12:43 PM

गुजरात टायटन्सला पहिला वेगवान गोलंदाज मिळाला

मोहम्मद शमीच्या स्वरुपात गुजरात टायटन्सला पहिला वेगवान गोलंदाज मिळाला आहे. ६.२५ कोटींच्या बोलीसह गुजरातच्या संघात दाखल

12:38 PM

कोलकाता नाइट रायडर्स संघाला कर्णधार मिळाला...

श्रेयस अय्यरवर तब्बल १२.२५ कोटींची बोली लावत कोलकाता नाइट रायडर्स संघानं त्याला संघात दाखल करुन घेतलं आहे. श्रेयस अय्यरच्या स्वरुपात कोलकाता नाइट रायडर्स संघाला आता नवा कर्णधार मिळाला आहे.

12:34 PM

ट्रेंट बोल्टवर ८ कोटींची बोली

वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघात चढाओढ; अखेरच्या क्षणी मुंबई इंडियन्सनं एन्ट्री पण अखेरीस राजस्थान रॉयल्सनं ८ कोटींच्या बोलीसह संघात दाखल करुन घेतलं आहे.

12:23 PM

पॅट कमिन्सचा भाव घसरला...

वेगवान गोलंदाज ७.२५ कोटींच्या बोलीसह कोलकाताच्या संघात दाखल झाला आहे. गेल्या आयपीएलमध्ये पॅट कमिन्सवर तब्बल १५ कोटींची बोली लागली होती.

12:23 PM

कगिसो रबाडा पंजाब किंग्जच्या ताफ्यात

कगिसो रबाडा तब्बल ९.२५ कोटींच्या बोलीसह पंजाब किंग्जच्या संघात दाखल झाला आहे.

12:20 PM

आर. अश्विन पुन्हा राजस्थान रॉयल्समध्ये परतला

फिरकीपटू आर.अश्विन ५ कोटींच्या बोलीसह राजस्थान रॉयल्स संघात दाखल झाला आहे.

12:16 PM

आयपीएल मेगा लिलावात पहिला खेळाडू शिखर धवन

शिखर धवनवर संघात दाखल करुन घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघात चढाओढ पाहायला मिळाली. २ कोटी बेस प्राइज असलेल्या शिखर धवनवर ८.२५ कोटींची बोली लावत पंजाब किंग्जनं त्याला संघात दाखल करुन घेतलं आहे. 

12:08 PM

आयपीएल लिलावाला सुरुवात...

टाटा आयपीएलच्या मेगा लिलावाला बंगळुरूत सुरुवात.  

11:32 AM

व्यासपीठ सज्ज...आता उत्सुकता लिलावाची...

11:26 AM

मुंबई इंडियन्सचे शिलेदार...

बिनीचे शिलेदार– रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमरा (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी)

बटव्यातली शिल्लक– 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7

11:07 AM

रोहित शर्मा लिलाव पाहणार का?

आयपीएल लिलावावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा काय करणार? रोहितनं दिलं मजेशीर उत्तर क्लिक करा आणि वाचा...

10:44 AM

संघ व्यवस्थापक कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास सुरुवात...

आयपीएलच्या लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून संघ व्यवस्थापक आता कार्यक्रमस्थळी पोहचण्यास सुरुवात झाली आहे.

10:39 AM

'लखनौ सुपर जायंटस'चे शिलेदार..

बिनीचे शिलेदार– लोकेश राहुल (17 कोटी), मार्कस स्टॉईनिस (9.2 कोटी), रवी बिष्णोई (4 कोटी)

बटव्यातली शिल्लक– 59 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7 

10:25 AM

कोलकाता नाईट रायडर्सचे शिलेदार...

बिनीचे शिलेदार– आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी).
बटव्यातली शिल्लक – 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 6

10:25 AM

दीपक हुडाला ऑक्शनपूर्वी लागली ३५ लाखांची लॉटरी

मेगा ऑक्शनआधीच दीपक हुडाला ३५ लाखांची लॉटरी लागली. क्लिक करा आणि वाचा सविस्तर वृत्त...

10:15 AM

खेळाडूंना बोली नुसार रक्कम मिळते का? जाणून घ्या...

10:09 AM

दिल्ली कॅपिटल्सचे शिलेदार...

बिनीचे शिलेदार– रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी) आणि एनरिच नॉकिया (6.5 कोटी)

बटव्यातली शिल्लक– 47.5 कोटी रुपये, 

संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7

09:57 AM

कसा होतो आयपीएल लिलाव...

09:53 AM

चेन्नईच्या ताफ्यातील शिलेदार...

रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी)

बटव्यातील शिल्लक – ४८ कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा- २१, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा- ७

09:26 AM

लिलावाच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी

टाटा आयपीएल लिलावाच्या पूर्वतयारीची शुक्रवारी संध्याकाळी बैठक पार पडली

09:22 AM

अर्जुनचेही आकर्षण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याचे लिलाव प्रक्रियेत आकर्षण ठरेल. गेल्यावेळी मुंबई इंडियन्सने त्याला २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात घेतले होते. अर्जुन अद्याप एकही आयपीएल सामना खेळलेला नाही. मात्र, त्याने मुंबईच्या वरिष्ठ संघातून आपली छाप पाडली असून विविध वयोगटातील स्पर्धांमध्येही प्रभावी अष्टपैलू खेळ केला नाही. यंदाही त्याची मूळ किंमत २० लाख रुपये आहे.

08:24 AM

अय्यर ठरणार महागडा?

श्रेयस अय्यर या लिलाव प्रक्रियेत सर्वाधिक महागडा ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, इशान किशन आणि शार्दुल ठाकूर यांनाही मोठी किंमत मिळू शकते. अनेक फ्रेंचाइजी या खेळाडूंसाठी बोली लावण्यास उत्सुक असल्याने तिघांच्या किमतीत कमालीची वाढ होईल. त्याचप्रमाणे, दीपक चहर आणि युजवेंद्र चहल यांच्यासाठीही मोठी चुरस रंगेल. 

08:22 AM

मेगा ऑक्शनमध्ये प्रती झिंटा सहभागी होणार नाही

यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सची सह मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ( Preity Zinta) ही अनुपस्थिती राहणार आहे, तर दुसरा धक्का असा की वासिम जाफरने ( Wasim Jaffer ) पंजाब किंग्सच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.  

08:00 AM

20 कोटीपर्यंत लागू शकेल बोली

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांच्या समावेशानंतर दहा फ्रेंचाइजी मिळून येत्या दोन दिवसांमध्ये ६०० क्रिकेटपटूंसाठी बोली लावतील. यामध्ये २२७ विदेशी खेळाडूंचाही समावेश असेल. अनेक खेळाडू यंदा २० कोटींची विक्रमी किंमत मिळवतील, असे सांगितले जात आहे.

07:53 AM

20 लाख मूळ किंमत घेऊन हे 10 खेळाडू

बीसीसीआयनं नव्याने सहभागी केलेल्या खेळाडूंची नावे  ( २० लाख मुळ किंमत) - अग्विवेश अयाची, रोहन राणा , नितिश रेड्डी, हार्दिक तामोरे, मिहिर हिरवानी, साईराज पाटील, मोनू सिंग, निवेदन राधाकृष्णन, लान्स मॉरिस, आरोन हार्डी ( ऑस्ट्रेलियाचे) 

11:09 PM

नव्या १० खेळाडूंची भर

५९० खेळाडूंनी आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत. त्यात २०३ गोलंदाज, १०२ फलंदाज, २२७ अष्टपैलू आणि ५८ यष्टिरक्षकांचा समावेश आहे. पण, यापैकी पहिल्या दिवशी केवळ १६१ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे आणि तुम्हाला माहित्येक का कोणत्या खेळाडूंपासून लिलावाला सुरुवात होणार आहे.  पण, यामध्ये आता १० नवीन खेळाडूंची भर पडली आहे. BCCIने अखेरच्या क्षणाला या १० खेळाडूंची एन्ट्री स्वीकारली आहे आणि त्यामुळे आता एकूण ६०० खेळाडूंवर बोली लागणार आहे.

10:55 PM

मेगा लिलाव कुठे पाहता येईल?

आयपीएलच्या मेगा लिलावाचा कार्यक्रम शनिवारी आणि रविवारी असा दोन दिवस चालणार असून बंगळुरू येथे पार पडणार आहे. सकाळी १२ वाजल्यापासून लिलावाला सुरुवात होणार आहे. स्टार नेटवर्कवर आयपीएलच्या लिलावाचं थेट प्रेक्षपण पाहता येणार आहे. तसंच लाइव्ह स्ट्रिमिंग डिज्नी हॉटस्टारवरही पाहता येईल.

10:52 PM

आयपीएलच्या १५ व्या सीझनसाठीच्या लिलावाची उत्सुकता शिगेला

आयपीएलचं यंदा १५ वं सीझन मेगा सीझन म्हणून ओळखलं जाणार आहे. कारण यंदाच्या सीझनपासून नव्या दोन संघांची भर आयपीएलच्या स्पर्धेत पडली आहे. त्यामुळे आता एकूण १० संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. यावेळीच्या लिलावात प्रत्येक संघासाठी केवळ चार खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी होती. त्यामुळे यंदाचा लिलाव खूप मोठा आणि महत्त्वपूर्ण आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून आता अवघ्या काही तासांवर लिलाव सोहळा येऊन ठेपला आहे. 

Web Title: ipl auction 2022 live updates ipl auction news 2022 live streaming marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.