Join us  

IPL Auction 2022 Live Updates: 'या' खेळाडूला विकत घेण्यासाठी संघांमध्ये होणार राडा! माजी क्रिकेटपटूने केली भविष्यवाणी; एका वेगळ्याच खेळाडूचं सुचवलं नाव

फारसा चर्चेत नसलेल्या स्टार खेळाडूचं घेतलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 11:54 AM

Open in App

IPL Auction 2022 Live Updates: यंदाच्या हंगामासाठी शनिवार आणि रविवारी (१२-१३ फेब्रुवारी) मेगा लिलाव होणार आहे. सर्व IPL संघ हंगामासाठी स्पर्धात्मक संघ तयार करण्याच्या त्यांच्या प्लॅनसह तयार आहेत. IPL लिलाव शनिवारी बंगळुरूमध्ये सुरू होईल आणि त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केलं जाणार आहे. या मेगा लिलावाकडे भारतीय आणि परदेशी खेळाडूंचं लक्ष असणार आहे. याचदरम्यान भारताच्या एका क्रिकेटपटूने फारसा चर्चेत नसलेल्या एका खेळाडूचं नाव घेत मोठी भविष्यवाणी केली आहे. (IPL Auction 2022 News in Marathi)

आयपीएल लिलावासाठी आतापर्यंत अनेकांनी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले आहेत. त्यातच भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने अशी आशा व्यक्त केली आहे की मेगालिलावात श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याच्यावर बोली लावण्यासाठी संघांमध्ये चढाओढ लागेल. त्याने गेल्या काही महिन्यात त्याच्या अष्टपैलू कामगिरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. त्यामुळे IPL 2022 च्या लिलावादरम्यान श्रीलंकेच्या हसरंगासाठी बोली-युद्ध होण्याची अपेक्षा आहे, असं आकाश चोप्राने ट्वीट केलं आहे. त्याशिवाय, हसरंगा हा राजस्थान रॉयल्स संघात जावा, अशी आशाही त्याने व्यक्त केली आहे. (IPL Auction 2022 Live Streaming)

वानिंदू हसरंगाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या हंगामात बदली खेळाडू म्हणून संघात घेतलं होतं. पण त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्यानंतर झालेल्या ICC T20 World Cup 2021 मध्ये मात्र त्याने आपली चमक दाखवून दिली. तसेच, भारताविरूद्घधच्या मालिकेतही त्याने आपला धडाका दाखवून दिला होता. त्यामुळे यंदा लिलावादरम्यान त्याच्यावर किती बोली लागते याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. (IPL 2022 Mega Auction)

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२राजस्थान रॉयल्स
Open in App