Preity Zinta, IPL Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी शनिवारी व रविवारी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी पंजाब किंग्सला ( Punjab Kings) दोन धक्के बसले आहे. या मेगा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सची सह मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ( Preity Zinta) ही अनुपस्थिती राहणार आहे, तर दुसरा धक्का असा की वासिम जाफरने ( Wasim Jaffer ) पंजाब किंग्सच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
मागील नोव्हेंबर महिन्यात प्रीती आणि तिचा पती जेन गुडनॉफ यांनी त्यांच्या घरी जुळी बाळं जन्माला आल्याची आनंदाची बातमी दिली. त्यामुळे यंदा प्रीतीने आयपीएल ऑक्शनला हजर न राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिने ट्विट केले की,''माझ्या लहान बाळांना इथे सोडून मी भारतासाठी प्रवास करू शकत नाही आणि त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात मी सहभाग घेणार नाही. मागील काही दिवसांपासून ऑक्शन संदर्भात वारंवार आम्ही चर्चा केली.''
पंजाब किंग्सने आयपीएल २०२२ साठी संघात मयांक अग्रवाल ( १२ कोटी) व अर्षदीप सिंग ( ४ कोटी) यांना कायम राखले आहे आणि लिलावात सर्वाधिक ७२ कोटी रुपये त्यांच्याकडे शिल्लक आहेत.
दरम्यान, फलंदाजी प्रशिक्षक
वासिम जाफर यानेही त्याचे पद सोडले आहे. २०१९मध्ये त्याची पंजाब किंग्सचा फलंदाज प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती. २०२० व २०२१ या दोन पर्वांसाठी हा करार होता.
Web Title: IPL Auction 2022 Live Updates : Preity Zinta will not take part in IPL 2022 Mega Auction for PBKS due to personal reasons, Wasim Jaffer will no longer be the batting coach of Punjab Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.