Ishan Kishan, IPL Auction 2022 : ३५ लाखांपासून १५.२५ कोटींपर्यंत; युवराज सिंगनंतर इशान किशनच्या नावावर मोठा पराक्रम

Indian Premier League Players Mega Auction 2022 : मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) जे ठरवले तेच केले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 04:55 PM2022-02-12T16:55:04+5:302022-02-12T16:56:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2022 : Mumbai Indians spent 15.25cr for Ishan Kishan, become a Most expensive Indian buys at an IPL auction | Ishan Kishan, IPL Auction 2022 : ३५ लाखांपासून १५.२५ कोटींपर्यंत; युवराज सिंगनंतर इशान किशनच्या नावावर मोठा पराक्रम

Ishan Kishan, IPL Auction 2022 : ३५ लाखांपासून १५.२५ कोटींपर्यंत; युवराज सिंगनंतर इशान किशनच्या नावावर मोठा पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Players Mega Auction 2022 : मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) जे ठरवले तेच केले... आयपीएल मेगा ऑक्शनच्या पहिल्या सत्रात एकाही खेळाडूला करारबद्ध न करणाऱ्या मुंबईने इशान किशनसाठी ( Ishan Kishan) रक्कम वाचवून ठेवली होती आणि यष्टिरक्षक-फलंदाजाचे नाव येताच त्यांनी बोली लावण्यास सुरूवात केली. सकाळच्या सत्रात खेळाडूंचा भाव वाढवून माघार घेणाऱ्या मुंबई इंडियन्सची यावेळेस अन्य फ्रँचायझींनी कोंडी केली. काही करून इशान मुंबई इंडियन्सला हवाच आहे, हे जाणून असलेल्या अन्य फ्रँचायझींनी त्याचा भाव वाढवला. त्यामुळे मुंबई इंडियन्सनला १५.२५ कोटींत इशानला ताफ्यात घेण्यात यश आले. IPL Auction 2022 Live Updates

इशान किशनसाठी पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या फ्रँचायझींनी मुंबई इंडियन्सला टक्कर दिली. २ कोटी मुळ किंमत असलेल्या इशानला पंजाब किंग्सने १२ कोटीपर्यंत आणून सोडले आणि त्यानंतर हैदराबादने त्याचा भाव १५ कोटीपर्यंत आणून ठेवला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला युवा फलंदाजासाठी १५.२५ कोटी मोजावे लागले. २०११मध्ये रोहित शर्मासाठी मुंबई इंडियन्सने लिलावात ९.२ कोटी मोजले होते आणि मुंबईने लिलावात मोजलेली ही सर्वाधिक रक्कम होती. पण, इशानने हा विक्रम मोडला. IPL Auction 2022, IPL Auction 2022 Live Today


२०१८मध्ये मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी ६.२ कोटी रुपये मोजले होते. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या ६१ सामन्यांत १४५२ धावा केल्या आहेत. २०२० च्या पर्वात मुंबईसाठी त्याने १४ सामन्यांत ५१६ धावा कुटल्या होत्या. २०१६ मध्ये ३५ लाखांत गुजरात लायन्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या इशानने आज रिकॉर्डतोड भाव घेताना १५.२५ कोटी कमावले. आयपीएल ऑक्शनमध्ये इशान चौथा महागडा खेळाडू ठरला. ख्रिस मॉरिस ( 16.25cr), युवराज सिंग ( 16.00cr), पॅट कमिन्स ( 15.50cr)  हे आघाडीवर आहेत. २०१५मध्ये युवराज सिंगसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्सने १६ कोटी मोजले होते आणि त्यानंतर इशान हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. IPL Auction Live,IPL auction,IPL 2022 Mega Auction,आयपीएल लिलाव,आयपीएल 2022 ऑक्शन

Web Title: IPL Auction 2022 : Mumbai Indians spent 15.25cr for Ishan Kishan, become a Most expensive Indian buys at an IPL auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.