Indian Premier League Players Mega Auction 2022 : मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) जे ठरवले तेच केले... आयपीएल मेगा ऑक्शनच्या पहिल्या सत्रात एकाही खेळाडूला करारबद्ध न करणाऱ्या मुंबईने इशान किशनसाठी ( Ishan Kishan) रक्कम वाचवून ठेवली होती आणि यष्टिरक्षक-फलंदाजाचे नाव येताच त्यांनी बोली लावण्यास सुरूवात केली. सकाळच्या सत्रात खेळाडूंचा भाव वाढवून माघार घेणाऱ्या मुंबई इंडियन्सची यावेळेस अन्य फ्रँचायझींनी कोंडी केली. काही करून इशान मुंबई इंडियन्सला हवाच आहे, हे जाणून असलेल्या अन्य फ्रँचायझींनी त्याचा भाव वाढवला. त्यामुळे मुंबई इंडियन्सनला १५.२५ कोटींत इशानला ताफ्यात घेण्यात यश आले. IPL Auction 2022 Live Updates
इशान किशनसाठी पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या फ्रँचायझींनी मुंबई इंडियन्सला टक्कर दिली. २ कोटी मुळ किंमत असलेल्या इशानला पंजाब किंग्सने १२ कोटीपर्यंत आणून सोडले आणि त्यानंतर हैदराबादने त्याचा भाव १५ कोटीपर्यंत आणून ठेवला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला युवा फलंदाजासाठी १५.२५ कोटी मोजावे लागले. २०११मध्ये रोहित शर्मासाठी मुंबई इंडियन्सने लिलावात ९.२ कोटी मोजले होते आणि मुंबईने लिलावात मोजलेली ही सर्वाधिक रक्कम होती. पण, इशानने हा विक्रम मोडला. IPL Auction 2022, IPL Auction 2022 Live Today