Join us  

Hugh Edmeades, IPL Auction 2022: ऑक्शन दरम्यान जमिनीवर कोसळलेले ह्युज एडमेड्स कोण आहेत? त्यांना नक्की काय झालं होतं?

लिलाव सुरू असताना अचानक ह्युज एडमेड्स जमिनीवर कोसळले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 4:18 PM

Open in App

Hugh Edmeades, IPL Auction 2022: प्रसिद्ध IPL ऑक्शनर ह्युज एडमेड्स यांच्या बाबतीत महालिलावाचा कार्यक्रम सुरू असतानाच एक विचित्र घटना घडली. IPL 2022 साठी वनिंदू हसरंगा या श्रीलंकन खेळाडूवर बोली लावली जात असताना ह्युज एडमेड्स अचानक खाली कोसळले. बंगळुरूच्या हॉटेल आयटीसी गार्डनिया येथे हा प्रकार घडला. ख्यातनाम ऑक्शनर एडमेड्सने माक्यू सेटमधील पहिला खेळाडू म्हणून शिखर धवनच्या बोलीने लिलावाची सुरूवात केली होती. त्यानंतर सुमारे दोन तासांचा कालावधी लोटल्यानंतर एका खेळाडूच्या लिलावादरम्यान ते जमिनीवर कोसळले.

ह्युज एडमेड्स यांना नक्की काय झालं?

ह्युज एडमेड्स हे अचानक जमिनीवर कोसळले. काही वेळाने IPL व्यवस्थापनाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं. त्यांना नक्की काय झालं होतं असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. त्यांना Postural Hypotension चा त्रास झाल्याचं IPL कडून स्पष्ट केलं. पाहा ट्वीट-

दरम्यान, प्रथमोपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे IPL व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. जाणून घेऊया ह्युज एडमेड्स यांच्याबद्दल अधिक माहिती...

- मूळचे ब्रिटनचे असलेले ह्युज एडमेड्स हे प्रसिद्ध ऑक्शनर आहेत.

- कलाकुसरीच्या अमूल्य वस्तू, आलिशान विंटेज कार आणि चॅरिटी अशा विविध गोष्टींसदर्भातील लिलाव प्रक्रिया खुबीने पार पाडण्यात त्यांचा हातखंडा आहे.

- त्यांनी आतापर्यंत २.७ अब्ज पौंडांपेक्षा अधिकच्या रकमेचे ऑक्शन प्रक्रिया पार पाडली आहे.

- एडमेड्स यांनी एरिक क्लॅप्टनच्या ८८ गिटारचा लिलाव केला होता. त्या लिलावात एकूण ७२ लाख ३८ हजार ६२४ जमा करण्यात आले होते.

- एडमेड्स यांनी २०१६ मध्ये जेम्स बाँडच्या स्पेक्टर चित्रपटातील डॅनियल क्रेगच्या अॅस्टन मार्टिन DB10 चा £ २४ लाख ३४ हजार ५०० मध्ये लिलाव केला होता.

- सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, एडमेड्स हे लंडनमधील नेल्सन मंडेला यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या वेळी झालेल्या लिलाव सोहळ्यातही ऑक्शनर होते.

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२शिखर धवन
Open in App