इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या मिनी लिलावात सॅम कुरन ( Sam Curran) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स व निकोलस पूरन यांच्यावरही पैशांचा पाऊस पडला. काही अनकॅप्ड खेळाडूही करोडपती झाले. झिम्बाब्वेचा सिकंदर रजा, नामिबियाचा डेव्हिड विसे आणि आयर्लंडचा जोशुआ लिटल यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. आजच्या आयपीएल लिलावात २९ परदेशी खेळाडूंसह ८० जणांना करारबद्ध केले गेले आणि त्यासाठी १६७ कोटी रुपये मोजले गेले. त्यामध्ये, एका बसचालकाच्या मुलालाही संधी मिळाली असून संजू सॅमसनच्या खांद्याला खांदा लावून आता अब्दुल बसीथ मैदानात उतरणार आहे.
केरळ परिवहन महामंडळाच्या बसमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेल्या बसचालकाचा मुलगा संजू सॅमसनच्या खांद्याला खांदा लावून आता मैदानात दिग्गजांना भिडणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या यंदाच्या लिलावत काही विशेषत: दिसून आली नाही. मात्र, अब्दुल समीथला मिळालेली संधी जरा विशेष वाटते. आरआरने यापूर्वी २००८ मध्ये आयपीएल चॅम्पियनची ट्रॉफी उंचावली होती. आता, लक्ष्य २०२३ चे आहे. संघासाठी विकत घेण्यात आलेले ९ पैकी ३ खेळाडू हे विदेशी आहेत. जेसन होल्डर हा अष्टपैलू क्रिकेटर असून संघाने दोन विकेटकीपर फलंदाजांनाही संघात घेतले आहे. त्यात, दक्षिण अफ्रीकेचा विकेटकीपर फलंदाज डोनोवन फरेरा आणि भारताचा कुणाल सिंह राठोड यांचा समावेस आहे. अब्दुल बसिथ या नवीन चेहऱ्याला संधी मिळाली आहे.
अब्दुल बसिथचे वडिल केरळ परिवहन विभागात बसचालक आहेत. अब्दुलला आरआर संघाने २० लाख रुपयांत खरेदी केले असून तो अष्टपैलू क्रिकेटर आहे. एर्नाकुलम या लहानशा गावातून अब्दुलने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. आयपीएल लिलावत अब्दुलला राजस्थान रॉयल्स संघाने विकत घेतले, तो क्षण त्याच्या आई-वडिलांनी घरी टीव्हीसमोर बसून पाहिला. त्यावेळी, अब्दुल घरात नव्हता. त्यामुळे, वडिलांनी अब्दुल घरात येण्यापूर्वीच केक आणून ठेवला होता. अब्दुल घरी येताच त्याचे स्वागत करुन केक कापण्यात आला. अब्दुलने केरळ संघाकडून विजय हजारे ट्रॉफीत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अब्दुलचा स्ट्राईक रेट १४९.३१ राहिला आहे, त्यामुळेच संजू सॅमसने एका गेमचेंजर खेळाडूला संधी दिल्याचं बोललं जात आहे.