Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या आज झालेल्या मिनी लिलावात सॅम कुरन ( Sam Curran) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स व निकोलस पूरन यांच्यावरही पैशांचा पाऊस पडला. काही अनकॅप्ड खेळाडूही करोडपती झाले. झिम्बाब्वेचा सिकंदर रजा, नामिबियाचा डेव्हिड विसे आणि आयर्लंडचा जोशुआ लिटल यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. आजच्या आयपीएल लिलावात २९ परदेशी खेळाडूंसह ८० जणांना करारबद्ध केले गेले आणि त्यासाठी १६७ कोटी रुपये मोजले गेले.
बेन स्टोक्ससाठी पैसा ओतला, पण चेन्नई सुपर किंग्सने तगडा संघ तयार केला; पाहा संपूर्ण यादी
सॅम कुरनला पंजाब किंग्सने १८.५० कोटींत कुरनला ताफ्यात घेतला आणि आयपीएल इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने विराट कोहली व लोकेश राहुल ( प्रत्येकी १७ कोटी) यांना मागे टाकले. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सनेने १७.५० कोटींची बोली लावली अन् तो दुसरा महागडा खेळाडू बनला. बेन स्टोक्सला. चेन्नई सुपर किंग्सने १६.२५ कोटींत त्याला आपल्या ताफ्यता घेतले आणि तो भविष्यातील कर्णधार ठरू शकतो. मागील पर्वात १०.७५ कोटींत सनरायझर्स हैदराबादने खरेदी केलेला निकोलस पूरन यंदा १६ कोटींत लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात दाखल झाला.
यंदाच्या पर्वातील टॉप महागडे खेळाडू...
- पंजाब किंग्स - सॅम कुरन ( १८.५० कोटी)
- मुंबई इंडियन्स - कॅमेरून ग्रीन ( १७.५० कोटी)
- चेन्नई सुपर किंग्स - बेन स्टोक्स ( १६.२५ कोटी)
- लखनौ सुपर जायंट्स - निकोलस पूरन ( १६ कोटी)
- सनरायझर्स हैदराबाद- हॅरी ब्रूक ( १३.२५ कोटी)
- सनरायझर्स हैदराबाद- मयांक अग्रवाल ( ८.२५ कोटी)
- गुजरात टायटन्स - शिवम मावी ( ६ कोटी)
- राजस्थान रॉयल्स - जेसन होल्डर ( ५.७५ कोटी)
- दिल्ली कॅपिटल्स - मुकेश कुमार ( ५.५० कोटी)
- सनरायझर्स हैदराबाद - हेनरीच क्लासेन ( ५.२५ कोटी)
जम्मू काश्मीरच्या विव्रांत शर्मासाठी हैदराबादने दहापट अधिक रक्कम मोजली. हैदराबादने ५.५० कोटींत त्याला संघात घेतले. ४० वर्षीय अमित मिश्रा ५० लाख मुळ किमतीत लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात. पियुष चावला ५० लाख मुळ किमतीत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला. न्यूझीलंडचा गोलंदाज कायले जेमिन्सन हा १ कोटींत CSK च्या संघात आला आणि नामिबिया आणि सेंट ल्युसिया किंग्सचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विसे याची १ कोटींत KKR ने निवड केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा आयर्लंडचा जोश लिटल याला गुजरात टायटन्सने ४.४ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. आयपीएल खेळणारा तो आयर्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. लखनौ सुपर जायंट्स व चेन्नई सुपर किंग्स यांनीही बोली लावली होती.