IPL Auction 2023 Live : मुंबई इंडियन्सने २०.५५ कोटींपैकी १७.५० कोटी एकाच खेळाडूवर उडवले; दिल्ली कॅपिटल्सने केला MI चा गेम 

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात दमदार बोली लागलेली पाहायला मिळतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 03:44 PM2022-12-23T15:44:47+5:302022-12-23T15:45:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2023 Live : Cameron Green sold to Mumbai Indians for Rs. 17.50 crores. He is the second most expensive player in IPL history. | IPL Auction 2023 Live : मुंबई इंडियन्सने २०.५५ कोटींपैकी १७.५० कोटी एकाच खेळाडूवर उडवले; दिल्ली कॅपिटल्सने केला MI चा गेम 

IPL Auction 2023 Live : मुंबई इंडियन्सने २०.५५ कोटींपैकी १७.५० कोटी एकाच खेळाडूवर उडवले; दिल्ली कॅपिटल्सने केला MI चा गेम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात दमदार बोली लागलेली पाहायला मिळतेय. सनरायझर्स हैदराबादने ( SunRisers Hyderabad ) धमाकेदार सुरुवात केल्यानंतर पंजाब किंग्सने विक्रमी बोली लावली आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सने पैशांचा पाऊस पाडला. सॅम कुरनसाठीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर मुंबई इंडियन्सने मोर्चा ऑस्ट्रेलियन खेळाडूकडे वळवला अन् आयपीएल इतिहासातील तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरेपर्यंत त्याच्यावर बोली लावली. पण, हे करत असताना MI ने बटव्यातील २०.५५ कोटींमधील १७.५० कोटी त्या एकाच खेळाडूसाठी उडवले. 

 इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूसाठी मोजले 18.50 कोटी, ठरला आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू 

कोणाच्या बटव्यात किती रक्कम (  Purse Remaining)  - सनरायझर्स हैदराबाद (४२.२५ कोटी), पंजाब किंग्स ( ३२.२ कोटी), लखनौ सुपर जायंट्स  ( २३. ३५ कोटी), मुंबई इंडियन्स ( २०.५५ कोटी), चेन्नई  सुपर किंग्स ( २०.४५ कोटी), दिल्ली कॅपिटल्स ( १९.४५ कोटी), गुजरात टायटन्स (१९.२५ कोटी), राजस्थान रॉयल्स (१३.२ कोटी) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( ८.७५ कोटी), कोलकाता नाईट रायडर्स ( ७.०५ कोटी) 

चेन्नई सुपर किंग्स इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला आपल्या ताफ्यात घेईल असे वाटत  होतेच. सॅम कुरन ३२ सामन्यात ३३७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त त्याच्या नावावर ४५ विकेट्स आहेत. 2 कोटी मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स व RCB ने बोली लावली. 6 कोटींपर्यंत दोन्ही शर्यतीत होते आणि अचानक CSK ची एन्ट्री झाली.  मुंबईनेही 9.75 कोटीपर्यंत जोर लावला अन् RR  ने 10 कोटींचा पॅडल उचलला.  11.5 कोटींपर्यंत RR शर्यतीत राहिले आणि CSK ने 11.75 कोटींची बोली लावली. लखनौ सुपर जायंट्सनेही 15.75 कोटींपर्यंत शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न केला. पण, पंजाब किंग्सने 18.50 कोटींत  कुरनला ताफ्यात घेतला.  

 
आयपीएलमध्ये सर्वाधिक रक्कम मिळालेले खेळाडू... 
विराट कोहली - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - १७ कोटी ( २०१८-२०२१)
लोकेश राहुल - लखौन सुपर जायंट्स - १७ कोटी ( २०२२)
ख्रिस मॉरिस - राजस्थान रॉयल्स- १६.२५ कोटी ( २०२१)
युवराज सिंग - दिल्ली डेअरडेव्हिल्स - १६ कोटी ( २०१५) 
रोहित शर्मा - मुंबई इंडियन्स - १६ कोटी ( २०२२) 
रिषभ पंत - दिल्ली कॅपिटल्स - १६ कोटी ( २०२२) 
रवींद्र जडेजा - चेन्नई सुपर किंग्स - १६ कोटी ( २०२२)
पॅट कमिन्स - कोलकाता नाईट रायडर्स - १५.५ कोटी ( २०२०)
इशान किशन - मुंबई इंडियन्स - १५.२५ कोटी ( २०२२)
राशिद खान - गुजरात टायटन्स - १५ कोटी ( २०२२)

ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर कॅमेरून ग्रीन मालामाल...
ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनची मुळ किंमत २ कोटी होती आणि मुंबई इंडियन्सने सुरूवातीपासूनच त्यांच्यावर बोली लावली. ७ कोटींपर्यंत ग्रीनची बोली गेली आणि त्याला दिल्ली कॅपिटल्स जबाबदार ठरले. MI vs DC यांच्यात चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला. १६.५० कोटीं पर्यंत दिल्ली शर्यतीत होती, परंतु मुंबईने  बोली १७ कोटींच्या वर नेली अन्  त्यांना माघार घ्यावी लागली  

 

Web Title: IPL Auction 2023 Live : Cameron Green sold to Mumbai Indians for Rs. 17.50 crores. He is the second most expensive player in IPL history.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.