Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादने ( SunRisers Hyderabad ) आघाडी घेतल्याचे दिसले. इंग्लंडच्या हॅरी ब्रुकसाठी १३.२५ कोटी मोजल्यानंतर काव्या मारनने CSK ला धोबीपछाड देताना भारताचा मोठा फलंदाज आपल्या संघात घेतला. केन विलियम्सन हा बोली लावलेला पहिला खेळाडू ठरला अन् त्याच्यावर गुजरात टायटन्स या एकमेव संघाने बोली लावली. २ कोटी या मुळ किमतीत तो गतविजेत्यांच्या ताफ्यात दाखल झाला. केनने ७६ आयपीएल सामन्यात २१०१ धावा केल्या आहेत.
IPL Auction 2023 Live : काव्या मारनने डाव साधला; राजस्थान रॉयल्सची ऐपत ओळखून तगडा खेळाडू SRHच्या ताफ्यात घेतला
हॅरी ब्रुकने २० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात ३७२ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या या खेळाडूची मुळ किंत १.५ कोटी इतकी आहे आणि राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांनी सुरूवातीला त्यावर बोली लावली. RR ने २.६ कोटींची बोली लावून आघाडी घेतली. ४ कोटी होताच RCB ने माघारी घेतली. ५.२५ कोटींपर्यंत बोली गेल्यावर ब्रुक RR च्या ताफ्यात जाईल असे वाटत होते, परंतु सनरायझर्स हैदराबादने उडी मारली. काव्या मारनने प्राईज पॅडल उंचावत ब्रुकची किंमत ८ कोटींच्या वर नेली. ब्रुकने ११३ ट्वेंटी-२० सामन्यांत २५२३ धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर शतकही आहे. हैदराबादने १३.२५ कोटींत त्याला ताफ्यात घेतले. राजस्थानने १३ कोटींपर्यंत बोली लावली होती, परंतु हैदराबादच्या बटव्यात सर्वाधिक ४२ कोटी असल्याने त्यांनी बाजी मारली.
मयांक अग्रवालची मुळ किंमत १ कोटी होती आणि RCBने पहिली बोली लावली. पंजाब किंग्सने त्याला रिलीज केले होते, परंतु तेही शर्यतीत उतरले. RCB vs PBKS च्या लढाईत चेन्नई सुपर किंग्सने उडी घेतली अन् अग्रवालची किंमत ३ कोटींपर्यंत नेली. आता CSK vs PBKS यांच्यात ३.६ कोटींपर्यंत सामना रंगला अन् अचानक सनरायझर्स हैदराबादने एन्ट्री घेतली. ७.७५ कोटींपर्यंत CSK ने त्यांना फाईट दिली, परंतु अखेर SRH ने ८.२५ कोटींत त्याला आपल्या ताफ्यात घेतले.
अजिंक्य रहाणे ५० लाख या मुळ किमतीत चेन्नईच्या ताफ्यात गेला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL Auction 2023 Live : India batter Mayank Agarwal goes to SunRisers Hyderabad, CSK are back in the race. SRH back in the lead at 8.25 crore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.