IPL Auction 2023 Live : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील हॅटट्रिकने चमकवलं नशीब; हार्दिक पांड्याच्या संघाने शोधला हिरा! 

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या आज झालेल्या मिनी लिलावात सॅम कुरन ( Sam Curran) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 07:52 PM2022-12-23T19:52:38+5:302022-12-23T19:53:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2023 Live : Joshua Little becomes the first player to play the IPL while representing Ireland in international cricket, Joshua Little is SOLD to Gujarat Titans for INR 4.4 Crore  | IPL Auction 2023 Live : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील हॅटट्रिकने चमकवलं नशीब; हार्दिक पांड्याच्या संघाने शोधला हिरा! 

IPL Auction 2023 Live : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील हॅटट्रिकने चमकवलं नशीब; हार्दिक पांड्याच्या संघाने शोधला हिरा! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या आज झालेल्या मिनी लिलावात सॅम कुरन ( Sam Curran) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स व निकोलस पूरन यांच्यावरही पैशांचा पाऊस पडला. काही अनक‌ॅप्ड खेळाडूही करोडपती झाले. झिम्बाब्वेचा सिकंदर रजा, नामिबियाचा डेव्हिड विसे आणि आयर्लंडचा जोशुआ लिटल यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले.  

IPL Auction 2023 Live : वीरेंद्र सेहवागचा 'भाचा' काव्या मारनच्या संघातून खेळणार; Yo Yo टेस्टमध्ये मिळवलेत सर्वाधिक गुण


सॅम कुरनला पंजाब किंग्सने १८.५० कोटींत  कुरनला ताफ्यात घेतला आणि आयपीएल इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने विराट कोहली व लोकेश राहुल ( प्रत्येकी १७ कोटी) यांना मागे टाकले. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सनेने १७.५० कोटींची बोली लावली अन् तो दुसरा महागडा खेळाडू बनला.  बेन स्टोक्सला. चेन्नई सुपर किंग्सने १६.२५ कोटींत त्याला आपल्या ताफ्यता घेतले आणि तो भविष्यातील कर्णधार ठरू शकतो. मागील पर्वात १०.७५ कोटींत सनरायझर्स हैदराबादने खरेदी केलेला निकोलस पूरन यंदा १६ कोटींत लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात दाकल झाला.   

- विव्रांत शर्मासाठी हैदराबादने दहापट अधिक रक्कम मोजली. हैदराबादने  ५.५० कोटींत त्याला संघात घेतले. 
- ४० वर्षीय अमित मिश्रा ५० लाख मुळ किमतीत लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात
- पियुष चावला ५० लाख मुळ किमतीत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात
- न्यूझीलंडचा गोलंदाज कायले जेमिन्सन हा १ कोटींत CSK च्या संघात
- संदीप शर्मा, तस्कीन अहमद, जिनी निशॅम हे अनसोल्ड राहिले.
- नामिबिया आणि सेंट ल्युसिया किंग्सचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विसे याची  १ कोटींत KKR ने निवड केली.  
 - मयांक डागरसाठी २० लाखाचे १.५० कोटी सनरायझर्स हैदराबादने मोजले. तो भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याचा भाचा आहे. मयांकची आई ही वीरूची चुलत बहिण आहे. 
- ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा आयर्लंडचा जोश  लिटल याला गुजरात टायटन्सने ४.४ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. आयपीएल खेळणारा तो आयर्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. लखनौ सुपर जायंट्स व चेन्नई सुपर किंग्सा यांनीही बोली लावली होती.


आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोश लिटलने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली. त्याने केन विल्यमसन, जीमी नीशम आणि मिचेल सँटनरचे यांना बॅक टू बॅक माघारी पाठवले होते. जोश हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. लिटलने वर्ल्ड कप स्पर्धेत सात सामन्यांत ११ विकेट घेतल्या.
 

Web Title: IPL Auction 2023 Live : Joshua Little becomes the first player to play the IPL while representing Ireland in international cricket, Joshua Little is SOLD to Gujarat Titans for INR 4.4 Crore 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.