Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२३ ) हे नशिबाला कलाटणी देणारं आहे, हे उगाच म्हटलं जात नाही. येथे प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचं व्यवस्थित मुल्यमापन केलं जातं अन् त्यानुसार त्याची किंमत वधारते. आजच्या दुसऱ्या बोली इंग्लंडच्या खेळाडूसाठी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जोरदार चुरस रंगली. राजस्थानच्या खात्यात १३.२० कोटीच शिल्लक असूनही त्यांनी या खेळाडूसाठी १३ कोटीपर्यंत बोली लावली अन् SRH च्या काव्या मारनने हिच संधी साधली
केन विलियम्सन हा बोली लावलेला पहिला खेळाडू ठरला अन् त्याच्यावर गुजरात टायटन्स या एकमेव संघाने बोली लावली. २ कोटी या मुळ किमतीत तो गतविजेत्यांच्या ताफ्यात दाखल झाला. केनने ७६ आयपीएल सामन्यात २१०१ धावा केल्या आहेत. हॅरी ब्रुकने २० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात ३७२ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या या खेळाडूची मुळ किंत १.५ कोटी इतकी आहे आणि राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांनी सुरूवातीला त्यावर बोली लावली. RR ने २.६ कोटींची बोली लावून आघाडी घेतली. ४ कोटी होताच RCB ने माघारी घेतली. ५.२५ कोटींपर्यंत बोली गेल्यावर ब्रुक RR च्या ताफ्यात जाईल असे वाटत होते, परंतु सनरायझर्स हैदराबादने उडी मारली. काव्या मारनने प्राईज पॅडल उंचावत ब्रुकची किंमत ८ कोटींच्या वर नेली. ब्रुकने ११३ ट्वेंटी-२० सामन्यांत २५२३ धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर शतकही आहे. हैदराबादने १३.२५ कोटींत त्याला ताफ्यात घेतले. राजस्थानने १३ कोटींपर्यंत बोली लावली होती, परंतु हैदराबादच्या बटव्यात सर्वाधिक ४२ कोटी असल्याने त्यांनी बाजी