Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात सॅम कुरन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यानंतर कॅमेरून ग्रीन व बेन स्टोक्स यांच्यावर आज पैशांचा पाऊस पडला. निकोलस पूरन यालाही लखनौ सुपर जायंट्सने १६ कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतले. पण, सनरायझर्स हैदराबादने एका अनकॅप्ड खेळाडूला करोडपती बनवले.. २० लाख मुळ किंमत असलेल्या जम्मू-काश्मीरच्या ऑल राऊंडरला SRH ने २.६० कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. उम्रान मलिकनंतर हा खेळाडू टीम इंडियाचा फ्युचर स्टार असेल असे म्हटले जात आहे. हार्दिक पांड्याला तो भविष्यात सक्षम पर्याय ठरू शकतो.
सॅम कुरनला पंजाब किंग्सने १८.५० कोटींत कुरनला ताफ्यात घेतला आणि आयपीएल इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने विराट कोहली व लोकेश राहुल ( प्रत्येकी १७ कोटी) यांना मागे टाकले. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सनेने १७.५० कोटींची बोली लावली अन् तो दुसरा महागडा खेळाडू बनला. बेन स्टोक्सला. चेन्नई सुपर किंग्सने १६.२५ कोटींत त्याला आपल्या ताफ्यता घेतले आणि तो भविष्यातील कर्णधार ठरू शकतो. मागील पर्वात १०.७५ कोटींत सनरायझर्स हैदराबादने खरेदी केलेला निकोलस पूरन यंदा १६ कोटींत लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात दाकल झाला.
२० लाख ते थेट ५.५० कोटीबंगालचा गोलंदाज मुकेश कुमार याची मुळ किंमत २० लाख इतकी होती. चेन्नई व दिल्ली यांच्यात १ कोटीपर्यंत बोली लागली आणि त्यानंतर पंजाबने एन्ट्री घेतली. पण, दिल्लीने अखेरपर्यंत मागे न हटता ५.५० कोटींत त्याला संघात घेतले.
कोण आहे मुकेश कुमार?बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारची संघर्षमय कहाणी आहे. त्याचे वडील कोलकात्यात टॅक्सी चालवायचे. खरं तर मुकेशच्या वडिलांना क्रिकेटचा तिरस्कार होता आणि या खेळात नाव कमावण्यासाठी मुकेशकडे फक्त एक वर्ष होते. २००८-०९ मध्ये बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात 'प्रतिभा की खोज' नावाचा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. इथेच मुकेश कुमारच्या प्रयत्नाची सुरुवात झाली होती. २५-२५ षटकांच्या सामन्यात मुकेश कुमारने सात सामन्यांत ३४ बळी घेतले. एका वर्षानंतर त्याने बीसीसीआयने आयोजित केलेल्या असोसिएट स्पर्धेत बिहार अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व केले.
स्थानिक गोपालगंज जिल्हा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अमित सिंग याने मुकेश कुमारची प्रतिभा प्रथमच पाहिली होती. अमित सिंगने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, तो रोज 30 किलोमीटर सायकलिंग करून क्रिकेट खेळायचा. मुकेशचे गाव गोपालगंजपासून 15 किलोमीटर दूर असल्याचे अमितने सांगितले होते. तो त्याच्या पायाचे स्नायू मजबूत करण्यासाठी खूप धावायचा. सैन्यात भरती होण्यासाठी देखील तो प्रयत्न करत होता.
मुकेश कुमार 2012 मध्ये कोलकाता येथे वडिलांना त्यांच्या टॅक्सी व्यवसायात मदत करण्यासाठी गेला. कोलकात्यातही मुकेशने वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन दुसऱ्या लीगमध्ये 400-500 रुपयांत स्थानिक सामने खेळायला सुरुवात केली. 2014 मध्ये मुकेश आणखी एका कसोटी सामन्यात सामील झाला, ज्याने त्याचे आयुष्य बदलले. बंगालच्या बुची बाबू स्पर्धेसाठी मुकेश कुमारची निवड झाली तेव्हा त्याच्याकडे क्रिकेट किट देखील नव्हते. तेव्हा मनोज तिवारी यांनी त्याला बॅट, पॅड आणि हातमोजे दिले होते.