IPL Auction 2023 Live : वीरेंद्र सेहवागचा 'भाचा' काव्या मारनच्या संघातून खेळणार; Yo Yo टेस्टमध्ये मिळवलेत सर्वाधिक गुण

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या आज झालेल्या मिनी लिलावात  सॅम कुरन ( Sam Curran) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 07:23 PM2022-12-23T19:23:43+5:302022-12-23T19:24:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2023 Live : Mayank Dagar goes to Sunrisers Hyderabad for 1.8 crore, he is virender sehwag's nephew | IPL Auction 2023 Live : वीरेंद्र सेहवागचा 'भाचा' काव्या मारनच्या संघातून खेळणार; Yo Yo टेस्टमध्ये मिळवलेत सर्वाधिक गुण

IPL Auction 2023 Live : वीरेंद्र सेहवागचा 'भाचा' काव्या मारनच्या संघातून खेळणार; Yo Yo टेस्टमध्ये मिळवलेत सर्वाधिक गुण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या आज झालेल्या मिनी लिलावात  सॅम कुरन ( Sam Curran) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स व निकोलस पूरन यांच्यावरही पैशांचा पाऊस पडला. काही अनक‌ॅप्ड खेळाडूही करोडपती झाले. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याचा भाजा मयांक डागर ( Mayank Dagar) हा आयपीएल २०२३ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे. 

IPL Auction 2023 Live : ४००-५०० रुपयांसाठी क्रिकेट खेळणारा मुकेश कुमार करोडपती झाला; प्रेरणादायी आहे त्याचा संघर्षमयी प्रवास 

सॅम कुरनला पंजाब किंग्सने १८.५० कोटींत  कुरनला ताफ्यात घेतला आणि आयपीएल इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने विराट कोहली व लोकेश राहुल ( प्रत्येकी १७ कोटी) यांना मागे टाकले. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सनेने १७.५० कोटींची बोली लावली अन् तो दुसरा महागडा खेळाडू बनला.  बेन स्टोक्सला. चेन्नई सुपर किंग्सने १६.२५ कोटींत त्याला आपल्या ताफ्यता घेतले आणि तो भविष्यातील कर्णधार ठरू शकतो. मागील पर्वात १०.७५ कोटींत सनरायझर्स हैदराबादने खरेदी केलेला निकोलस पूरन यंदा १६ कोटींत लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात दाकल झाला.   

विव्रांत शर्मासाठी हैदराबादने दहापट अधिक रक्कम मोजली ( Vivrant Sharma goes to SRH). जम्मू काश्मीरच्या २३ वर्षीय अष्टपैलू खेळाडूसाठी कोलकात नाईट रायडर्सही प्रयत्नशील होते.  पण, SRH ने २.६० कोटींत बाजी मारली. बंगालचा गोलंदाज मुकेश कुमार याची मुळ किंमत २० लाख इतकी होती. चेन्नई व दिल्ली यांच्यात १ कोटीपर्यंत बोली लागली आणि त्यानंतर पंजाबने एन्ट्री घेतली. पण, दिल्लीने अखेरपर्यंत मागे न हटता ५.५० कोटींत त्याला संघात घेतले.   


- ४० वर्षीय अमित मिश्रा ५० लाख मुळ किमतीत लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात
- पियुष चावला ५० लाख मुळ किमतीत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात
- न्यूझीलंडचा गोलंदाज कायले जेमिन्सन हा १ कोटींत CSK च्या संघात
- संदीप शर्मा, तस्कीन अहमद, जिनी निशॅम हे अनसोल्ड राहिले.

मयांक डागरसाठी २० लाखाचे १.८० कोटी सनरायझर्स हैदराबादने मोजले. राजस्थान रॉयल्सनेही ७५ लाखांपर्यंत मयांकवर बोली लावली, काव्या मारनने त्याला करोडपती केले. सनरायझर्स हैदराबादला जे सुचिथनंतर लेफ्ट आर्म फिरकीपटू हवा होता आणि डागरच्या रुपाने त्यांनी ही जागा भरून काढली.  दिल्लीत जन्मलेला मयांकचे शिक्षण शिमला येथील बिशॉप कॉटन स्कूलमध्ये पूर्ण जाले. आशियातील ही सर्वात जुनी बोर्डिंग शाळा आहे.  त्याचे वडील जितेंदर हेही युनिव्हर्सिटी लेव्हलचे क्रिकेटपटू आहेत. ते दिल्ली पालिकेत  काँट्र‌‌ॅक्टर आहेत. मयांकची आई ही वीरूची चुलत बहिण आहे. 


स्थानिक क्रिकेटमध्ये तो हिमाचल प्रदेशकडून खेळतो.  2016च्या भारताच्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप संघाचा सदस्य होता. 2018मध्ये पंजाब किंग्सने त्याला करारबद्ध केले. योयो टोस्टमध्ये त्याने 19.3 गुण कमावताना मनिष पांडेचा 19.2 गुणांचा विक्रम मोडला.  

 

Web Title: IPL Auction 2023 Live : Mayank Dagar goes to Sunrisers Hyderabad for 1.8 crore, he is virender sehwag's nephew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.