Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात दमदार बोली लागलेली पाहायला मिळतेय. सनरायझर्स हैदराबादने ( SunRisers Hyderabad ) धमाकेदार सुरुवात केल्यानंतर पंजाब किंग्सने विक्रमी बोली लावली आणि त्यानंतर मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्सने पैशांचा पाऊस पाडला. सॅम कुरन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यानंतर कॅमेरून ग्रीन व बेन स्टोक्स यांच्यावर आज पैशांचा पाऊस पडला.
सॅम कुरन ३२ सामन्यात ३३७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त त्याच्या नावावर ४५ विकेट्स आहेत. 2 कोटी मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स व RCB ने बोली लावली. 6 कोटींपर्यंत दोन्ही शर्यतीत होते आणि अचानक CSK ची एन्ट्री झाली. मुंबईनेही 9.75 कोटीपर्यंत जोर लावला अन् RR ने 10 कोटींचा पॅडल उचलला. 11.5 कोटींपर्यंत RR शर्यतीत राहिले आणि CSK ने 11.75 कोटींची बोली लावली. लखनौ सुपर जायंट्सनेही 15.75 कोटींपर्यंत शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न केला. पण, पंजाब किंग्सने 18.50 कोटींत कुरनला ताफ्यात घेतला.
ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनची मुळ किंमत २ कोटी होती आणि मुंबई इंडियन्सने सुरूवातीपासूनच त्यांच्यावर बोली लावली. ७ कोटींपर्यंत ग्रीनची बोली गेली आणि त्याला दिल्ली कॅपिटल्स जबाबदार ठरले. MI vs DC यांच्यात चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला. १६.५० कोटीं पर्यंत दिल्ली शर्यतीत होती, परंतु मुंबईने बोली १७ कोटींच्या वर नेली अन् त्यांना माघार घ्यावी लागली
बेन स्टोक्स पटलावर येताच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांनी उडी मारली. ५ कोटींची बोली लावून RCB आघाडीवर राहिले. परंतु RR ने ६.७५ कोटींपर्यंत टक्कर दिली. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सची एन्ट्री झाली. काव्या मारनने इथेही खेळाडूची प्राईज वाढवली. १४ कोटींसह LSG आघाडीवर होते, पण सॅम कुरनची संधी हुकलेल्या CSK ने एन्ट्री घेताना १५.२५ कोटींची बोली लावली. धोनी व स्टोक्स यापूर्वी रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून एकत्र खेळले होते. चेन्नईने १६.२५ कोटींत त्याला आपल्या ताफ्यता घेतलेय
मागील पर्वात १०.७५ कोटींत सनरायझर्स हैदराबादने खरेदी केलेला निकोलस पूरन यंदा पुन्हा तुफान डिमांडमध्ये आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी बोली लावण्यास सुरुवात केली. ३.२ कोटींपर्यंत फक्त दोनच संघ वेस्ट इंडिजच्या हिटरसाठी शर्यतीत होते. RR ने ३.४० कोटींची बोली लावताच, दिल्ली कॅपिटल्सने उडी मारली अन् ३.६० कोटींची बोली लावली. ७ कोटींपर्यंत यांच्यात चुरस रंगली अन् अचानक लखनौ सुपर जायंट्सने ७.५ कोटींची बोली लावली. १५ कोटींच्या वर बोली जाताच दिल्लीने माघार घेतली आणि LSG ने १६ कोटींत पूरनला ताफ्यात घेतले.