Join us  

IPL Auction 2023 Live : पाकिस्तानची वाट लावली अन् १८ वर्षीय खेळाडूला लॉटरी लागली; ऑक्शनपूर्वीच ३० लाखांनी किंमत वाढली

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२३ ) हे नशिबाला कलाटणी देणारं आहे, हे उगाच म्हटलं जात नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 2:20 PM

Open in App

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२३ ) हे नशिबाला कलाटणी देणारं आहे, हे उगाच म्हटलं जात नाही. येथे प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचं व्यवस्थित मुल्यमापन केलं जातं अन् त्यानुसार त्याची किंमत वधारते... आता १५ मिनिटांत आयपीएल २०२३ च्या मिनी ऑक्शनला सुरुवात होईल, परंतु त्याआधीच इंग्लंडच्या १८ वर्षीय गोलंदाज रेहान अहमद (  Rehan Ahmed ) याला लॉटरी लागली आहे. रेहानने नुकत्याच झालेल्या कराची कसोटी पाकिस्तानची वाट लावली होती आणि पदार्पणाच्या सामन्यात अनेक विक्रम केले. त्याची पोचपावती म्हणून लिलावापूर्वीच त्याची किंमत ३० लाखांनी वाढली. 

IPL Auction 2023 Live : 'Tie-break' नियम हंगामा माजवणार! फ्रँयाचझीचा फायदा, पण खेळाडूंचा तोटा करणार

- २७३ भारतीय व १३२ परदेशी खेळाडूंचा समावेश - ११९ खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळलेले आणि २८२ पदार्पणाची संधी मिळालेले खेळाडू - ४०५  खेळाडूंपैकी केवळ ८७ खेळाडूंनाच संधी मिळणार - आयपीएल फ्रँचायझींनी आतापर्यंत ७४३.५ कोटी रुपये लिलावात खर्च केले आहेत - आज २०६.५ कोटी ८६ खेळाडूंसाठी खर्च होणे अपेक्षित आहेत. 

रेहान हा इंग्लंडकडून कसोटी पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. १८ वर्षी वे १२६ दिवसांत अहमदने महान इंग्लिश कर्णधार ब्रायन क्लोज यांना मागे टाकले. त्यांनी १९४९ मध्ये १८ वर्षे आणि १४९ दिवसांचे असताना कसोटीत पदार्पण केले होते. इंग्लंडमधील सर्वात तरुण कसोटी पदार्पण करणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूचा मान होली कोल्विनच्या नावावर आहे. तिने २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले तेव्हा ती अवघ्या १५ वर्षे आणि ३३६ दिवसांची होती. रेहानने पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ४८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. जॅक लिचने तीन विकेट्स घेतल्या. पदार्पणात डावात पाच विकेट्स घेणारा तो युवा गोलंदाज ठरला. 

इंग्लंडकडून पदार्पण केल्यामुळे आता रेहान अनकॅप्ड खेळाडूंमधून कॅप्ड ( राष्ट्रीय संघाकडून खेळणारा) खेळाडूंमध्ये स्थान   पटकावले. त्यामुळे आधी २० लाख  मुळ किंमत असलेल्या रेहानवर आता ५० लाख मुळ किमतीपासून बोली लागणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२इंग्लंडपाकिस्तान
Open in App