Join us  

IPL Auction 2023 Live : इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूसाठी मोजले 18.50 कोटी, ठरला आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू 

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादने ( SunRisers Hyderabad )  आघाडी घेतल्याचे दिसले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 3:30 PM

Open in App

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादने ( SunRisers Hyderabad )  आघाडी घेतल्याचे दिसले. इंग्लंडच्या हॅरी ब्रुकसाठी १३.२५ कोटी मोजल्यानंतर काव्या मारनने CSK ला धोबीपछाड देताना भारताचा मोठा फलंदाज आपल्या संघात घेतला. केन विलियम्सन हा बोली लावलेला पहिला खेळाडू ठरला अन् त्याच्यावर गुजरात टायटन्स या एकमेव  संघाने बोली लावली. २ कोटी या मुळ किमतीत तो गतविजेत्यांच्या ताफ्यात दाखल झाला. केनने ७६ आयपीएल सामन्यात २१०१ धावा केल्या आहेत. जो रूट, अजिंक्य रहाणे ५० लाख या मुळ किमतीत चेन्नईच्या ताफ्यात गेला. 

चेन्नई सुपर किंग्स इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला आपल्या ताफ्यात घेईल असे वाटत  होतेच. सॅम कुरन ३२ सामन्यात ३३७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त त्याच्या नावावर ४५ विकेट्स आहेत. 2 कोटी मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स व RCB ने बोली लावली. 6 कोटींपर्यंत दोन्ही शर्यतीत होते आणि अचानक CSK ची एन्ट्री झाली.  मुंबईनेही 9.75 कोटीपर्यंत जोर लावला अन् RR  ने 10 कोटींचा पॅडल उचलला.  11.5 कोटींपर्यंत RR शर्यतीत राहिले आणि CSK ने 11.75 कोटींची बोली लावली. लखनौ सुपर जायंट्सनेही 15.75 कोटींपर्यंत शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न केला. पण, पंजाब किंग्सने 18.50 कोटींत  कुरनला ताफ्यात घेतला.  

आयपीएलमध्ये सर्वाधिक रक्कम मिळालेले खेळाडू... विराट कोहली - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - १७ कोटी ( २०१८-२०२१)लोकेश राहुल - लखौन सुपर जायंट्स - १७ कोटी ( २०२२)ख्रिस मॉरिस - राजस्थान रॉयल्स- १६.२५ कोटी ( २०२१)युवराज सिंग - दिल्ली डेअरडेव्हिल्स - १६ कोटी ( २०१५) रोहित शर्मा - मुंबई इंडियन्स - १६ कोटी ( २०२२) रिषभ पंत - दिल्ली कॅपिटल्स - १६ कोटी ( २०२२) रवींद्र जडेजा - चेन्नई सुपर किंग्स - १६ कोटी ( २०२२)पॅट कमिन्स - कोलकाता नाईट रायडर्स - १५.५ कोटी ( २०२०)इशान किशन - मुंबई इंडियन्स - १५.२५ कोटी ( २०२२)राशिद खान - गुजरात टायटन्स - १५ कोटी ( २०२२)

हॅरी ब्रुकने २० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात ३७२ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या या खेळाडूची मुळ किंत १.५ कोटी इतकी आहे आणि राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स  चॅलेंजर्स बंगळुरू यांनी सुरूवातीला त्यावर बोली लावली. RR ने २.६ कोटींची बोली लावून आघाडी घेतली. ४ कोटी होताच RCB ने माघारी घेतली. ५.२५ कोटींपर्यंत बोली गेल्यावर ब्रुक RR च्या ताफ्यात जाईल असे वाटत होते, परंतु सनरायझर्स हैदराबादने उडी मारली. काव्या मारनने प्राईज पॅडल उंचावत ब्रुकची किंमत ८ कोटींच्या वर नेली. ब्रुकने ११३ ट्वेंटी-२० सामन्यांत २५२३ धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर शतकही आहे. हैदराबादने १३.२५ कोटींत त्याला ताफ्यात घेतले. राजस्थानने १३ कोटींपर्यंत बोली लावली होती, परंतु हैदराबादच्या बटव्यात सर्वाधिक  ४२ कोटी असल्याने त्यांनी बाजी मारली.

मयांक अग्रवालची मुळ किंमत १ कोटी होती आणि RCBने पहिली बोली लावली. पंजाब किंग्सने त्याला रिलीज केले होते, परंतु तेही शर्यतीत उतरले. RCB vs PBKS च्या  लढाईत चेन्नई सुपर किंग्सने उडी घेतली अन् अग्रवालची किंमत ३ कोटींपर्यंत नेली. आता CSK vs PBKS यांच्यात ३.६ कोटींपर्यंत सामना रंगला अन् अचानक सनरायझर्स हैदराबादने एन्ट्री घेतली.  ७.७५ कोटींपर्यंत CSK ने त्यांना फाईट दिली, परंतु अखेर SRH ने ८.२५ कोटींत त्याला आपल्या ताफ्यात घेतले.  

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२पंजाब किंग्समुंबई इंडियन्स
Open in App