Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात सॅम कुरन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यानंतर कॅमेरून ग्रीन व बेन स्टोक्स यांच्यावर आज पैशांचा पाऊस पडला. निकोलस पूरन यालाही लखनौ सुपर जायंट्सने १६ कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतले. पण, सनरायझर्स हैदराबादने एका अनकॅप्ड खेळाडूला करोडपती बनवले.. २० लाख मुळ किंमत असलेल्या जम्मू-काश्मीरच्या ऑल राऊंडरला SRH ने २.६० कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. उम्रान मलिकनंतर हा खेळाडू टीम इंडियाचा फ्युचर स्टार असेल असे म्हटले जात आहे. हार्दिक पांड्याला तो भविष्यात सक्षम पर्याय ठरू शकतो.
सॅम कुरनला पंजाब किंग्सने १८.५० कोटींत कुरनला ताफ्यात घेतला आणि आयपीएल इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने विराट कोहली व लोकेश राहुल ( प्रत्येकी १७ कोटी) यांना मागे टाकले. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सनेने १७.५० कोटींची बोली लावली अन् तो दुसरा महागडा खेळाडू बनला. बेन स्टोक्स पटलावर येताच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांनी उडी मारली. ५ कोटींची बोली लावून RCB आघाडीवर राहिले. परंतु RR ने ६.७५ कोटींपर्यंत टक्कर दिली. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सची एन्ट्री झाली. काव्या मारनने इथेही खेळाडूची प्राईज वाढवली. १४ कोटींसह LSG आघाडीवर होते, पण सॅम कुरनची संधी हुकलेल्या CSK ने एन्ट्री घेताना १५.२५ कोटींची बोली लावली. धोनी व स्टोक्स यापूर्वी रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून एकत्र खेळले होते. चेन्नईने १६.२५ कोटींत त्याला आपल्या ताफ्यता घेतले.
विव्रांत शर्मासाठी हैदराबादने दहापट अधिक रक्कम मोजली ( Vivrant Sharma goes to SRH). जम्मू काश्मीरच्या २३ वर्षीय अष्टपैलू खेळाडूसाठी कोलकात नाईट रायडर्सही प्रयत्नशील होते. पण, SRH ने २.६० कोटींत बाजी मारली. सुरुवातीला उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या विव्रांतने १२ वर्षांचा असताना भावाला पाहून लेफ्टी बॅटींग सुरू केली. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे आणि म्हणूनच बरेच अनकॅप्ड खेळाडू अनसोल्ड गेले तरी याला मोठी रक्कम मिळाली. इरफान पठाणनेही त्याचे कौतुक केले.