आयपीएल 2023 साठी कोची येथे खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, या लिलावात टीम इंडियाचा एक क्रिकेटर आयपीएल करिअर संपण्यापासून थोडक्यात वाचला आहे. या क्रिकेटरची फार स्वस्तात डील झाली. हा लिलाव सुरू होण्यापूर्वी, या खेळाडूचे आयपीएल करिअर संपेल आणि त्याला कोणताही संघ किंमतही देणार नाही, असे मानले जात होते, परंतु तसे काहीही झाले नाही.
संपता-संपता वाचलं या क्रिकेटरचं IPL करिअर -आता हा क्रिकेटर आयपीएल 2023 च्या सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल. मधल्या फळीतील फलंदाज असलेला अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियापासून दूर आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल 2023 च्या सीझनसाठी 50 लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केले आहे. आता तो महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसेल.
फारच स्वस्तात लागली बोली -अजिंक्य रहाणेला IPL 2022 सिझनसाठी कोलकाता नाइट राइडर्ससंघाने 1 कोटी रुपयांत विकत घेतले होते. मात्र, आयपीएल 2022 च्या 7 सामन्यांत त्याला केवळ 133 धावाच करता आल्या होत्या. आयपीएल 2022 मध्ये खराब प्रदर्शन केल्याने यावर्षी कोलकाता नाईट राइडर्सने त्याला रिलीज केले होते. आता आयपीएल 2023 सीझनच्या लिलावात रहाणेला चेन्नई सुपर किंग्सने 50 लाखात विकत घेत घेऊन त्याचे संपनारे आयपीएल करीअर वाचवले आहे.