IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सुरु असलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सर्वाधिक डिमांड पाहायला मिळतेय. मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी २० कोटींचा टप्पा ओलांडला. ट्रॅव्हिस हेडही मालामाल झाला. त्यात c स्पेन्सर जॉन्सनला ( Spencer Johnson ) १० कोटी रुपयांत गुजरात टायटन्सने आपल्या ताफ्यात घेतले. जॉन्सनला ऑस्ट्रेलियात भविष्याचा मिचेल स्टार्क म्हटले जाते.
ऑस्ट्रेलियाच्या लेफ्ट आर्म जलदगती गोलंदाज जॉन्सनची मुळ किंमत ५० लाख होती. गुजरात टायटन्स व कोलकाता नाइट रायडर्स यांनी त्याच्यासाठी बोली लावली. ८५ लाखांपर्यंत बोली आल्यावर दिल्ली कॅपिटल्सने उडी घेतली. जॉन्सनची किंमत २ कोटी पर्यंत गेली. गुजरात व दिल्ली यांच्यातील चुरशीमुळे ती ६ कोटींच्या घरात गेली. दोन्ही संघाना काही करून तो आपल्याकडे हवा होता, परंतु गुजरातने १० कोटी बोली लावून ऑसी गोलंदाजाला आपलेसे केले.
कोण आहे स्पेन्सर जॉन्सन?दी हंड्रेड लीग गाजवणाऱ्या स्पेन्सर जॉन्ससने आपल्या भेदक माऱ्याने अनेकांना हतबल करून सोडले आहे. दी हंड्रेड लीगमध्ये पदार्पण करताना त्याने २० चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या आणि तेही केवळ १ धाव देऊन. ओव्हर इन्व्हिजिबल संघाकडून खेळणाऱ्या जॉन्सनने मँचेस्टर ओरिजिनल्सला धक्का दिला. त्याने १९ चेंडू निर्धाव फेकले.