IPL Auction 2024 : चेन्नई सुपर किंग्स नेहमी त्यांच्या रणनीतीसाठी ओळखला जाणारा संघ आहे, मग ते डावपेच मैदानावरील असो किंवा मैदानाबाहेर.... आयपीएल ऑक्शनमध्ये सीईओ काशी विश्वनाथन नेहमी कानात हेडफोन घालून कोणाशी संवाद साधताना दिसतात आणि आजही तसेच पाहायला मिळाले.. CSK चा खरा मास्टर माईंड MS Dhoni आहे, हे उघड सत्य आहे.
पॅट कमिन्सनंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील स्टार खेळाडूसाठी कोट्यवधींची बोली लागली. न्यूझीलंडसाठी दमदार खेळी करणाऱ्या डॅरिल मिचेल ( Daryl Mitchell) साठी चांगली चुरस रंगलेली पाहायला मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने १ कोटींची बोली लावली आणि त्यानंतर पंजाब किंग्सनेही पॅडल वर उंचावला. ३ कोटींच्या पुढे ही बोली झटपट पुढे सरकली. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या माजी खेळाडूसाठी हे दोन्ही संघ रुपयांचा पाऊस पाडणार हे स्पष्ट होते. हळुहळू त्याच्यावरील बोलीचा आकडा ८ कोटींपर्यंत पोहोचला आणि ८.२० कोटींसाठी पंजाब किंग्सने पॅडल उचलल्यानंतर आता दिल्ली माघार घेतील असे वाटले होते. परंतु त्यांनी पंजाब किंग्सला ९.४० कोटींपर्यंत बोली लावण्यास भाग पाडले.
आजच्या पर्वातील मिचेल हा तिसरा कोट्याधीश ठरला. पंजाब किंग्सच्या मोठ्या बोलीनंतर दिल्ली कॅपिटल्सच्या टेबलवर चर्चा सुरू झाली आणि १० कोटींची बोली लागली. पंजाब माघार घेण्यास तयार नव्हते आणि दिल्ली-पंजाब मधील चुरस ११ कोटींच्या घरात गेली. दिल्लीने ११.५० कोटींपर्यंत बोली लावल्यानंतर पंजाबन त्यांच्याकडून ११.७५ कोटीचा शेवटचा प्रयत्न केला.
आतापर्यंत चित्रात नसलेल्या चेन्नई सुपर किंग्सने थेट १२ कोटींची बोली लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तरीही पंजाब शर्यतीत होते. मात्र, चेन्नईने १४ कोटी मोजून सर्वांना धोबीपछाड दिली. डॅरिल मिचेलच्या समावेशामुळे CSKच्या ताफ्यात डेव्हॉन कॉनवे, राचिन रवींद्र, मिचेल सँटनर असे चार किवी खेळाडू झाले आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज
- कायम ठेवलेले खेळाडू: महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगर्गेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश थीक्षाणा,