IPL Auction 2024: ऑस्ट्रेलियन खेळाडूंची बक्कळ कमाई! भारतीय युवा शिलेदारांचीही चांदी; जाणून घ्या सर्वकाही

LIVE

IPL Mini Auction 2024 Live : आज आयपीएल २०२४ साठी दुबईत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 12:40 PM2023-12-19T12:40:02+5:302023-12-19T12:48:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2024 Live Updates Mini Auction in Dubai, 332 players including 214 Indian to go under the hammer | IPL Auction 2024: ऑस्ट्रेलियन खेळाडूंची बक्कळ कमाई! भारतीय युवा शिलेदारांचीही चांदी; जाणून घ्या सर्वकाही

IPL Auction 2024: ऑस्ट्रेलियन खेळाडूंची बक्कळ कमाई! भारतीय युवा शिलेदारांचीही चांदी; जाणून घ्या सर्वकाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Mini Auction 2024 Live Updates In Marathi : आयपीएल २०२४ साठी मंगळवारी दुबईत खेळाडूंचा लिलाव पार पडला. लिलावाच्या रिंगणात एकूण ३३३ खेळाडू होते, ज्यातील काहींना आयपीएल २०२४ चा भाग होण्याची संधी मिळाली. तर, काही खेळाडू जगातील लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगपासून दूर राहिले. आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावात एकूण ५६ खेळाडूंची खरेदी झाली. ज्यामध्ये २३ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच १० फ्रँचायझींनी २,१२,६०,००,००० एवढी रक्कम खर्च केली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर ऐतिहासिक बोली लागली. खरं तर स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असून, त्याला केकेआरच्या फ्रँचायझीने २४.७५ कोटीत आपल्या ताफ्यात घेतले. 
 

 

LIVE

Get Latest Updates

08:07 PM

झारखंडचा रॉबिन मिन्झ गुजरातच्या ताफ्यात; ३.६० कोटींचा वर्षाव

देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडणाऱ्या झारखंडच्या रॉबिन मिन्झला यंदाच्या लिलावात लॉटरी लागल्याचे दिसते. कारण २० लाख रूपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरलेल्या मिन्झला ३.६० कोटी रूपये मिळाले. गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. 

 

 

08:03 PM

नमन धीर आणि अंशुल कंबोज मुंबईच्या संघात 

नमन धीर आणि अंशुल कंबोज हे युवा शिलेदार २० लाखांच्या मूळ किंमतीसह रिंगणात होते. मुंबईच्या फ्रँचायझीने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना आपल्या ताफ्यात घेतले.

 

08:01 PM

२० लाख ते १ कोटी! सुमित कुमार दिल्लीच्या ताफ्यात

युवा सुमित कुमार २० लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या रिंगणात होता. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने १ कोटींची रक्कम देऊन सुमितला आपल्या संघाचा भाग बनवले.

 

07:44 PM

झाय रिचर्डसनवर दिल्लीकडून ५ कोटींचा वर्षाव

झाय रिचर्डसनला दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीने ५ कोटींमध्ये खरेदी केले. झायची मूळ किंमत १.५० कोटी होती. 

07:44 PM

आला रे...! नुवान तुषार मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 

नुवान तुषारला खरेदी करण्यासाठी सुरूवातीला कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्सच्या फ्रँचायझीमध्ये चुरस झाली. ५० लाख रूपयांच्या मूळ किंमतीसह तो लिलावाच्या रिंगणात होता. केकेआर आणि पंजाब यांच्यातील चुरस संपताच मुंबईने यात उडी घेत पंजाबला आव्हान दिले. बराच वेळ मुंबई आणि पंजाब यांच्यात नुवानसाठी सामना झाला. अखेर मुंबईने ४ कोटी ८० लाखांत नुवानला आपल्या संघाचा भाग बनवले. 

07:42 PM

२ कोटी! मुस्तफिजुर रहमान चेन्नईच्या संघात

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला चेन्नईच्या फ्रँचायझीने त्याच्या मूळ किंमतीत खरेदी केले. तो २ कोटी रकमेसह लिलावाच्या रिंगणात होता.

 

 

07:27 PM

डेव्हिड विलीवर २ कोटींचा वर्षाव

डेव्हिड विलीला त्याच्या मूळ किंमतीत लखनौ सुपर जायंट्सने खरेदी केले. 

 

 

07:27 PM

५० लाख ते १० कोटी!

ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी मागील हंगामातील फायनलिस्ट गुजरात टायटन्सने मोठी रक्कम मोजली. स्पेन्सर जॉन्सनला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी गुजरातने तब्बल १० कोटी रूपये खर्च केले. जॉन्सन ५० लाखाच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या रिंगणात होता. 

२० चेंडू, १९ निर्धाव, ३ विकेट्स! भविष्याचा स्टार्क समजल्या जाणाऱ्या गोलंदाजाला मिळाले १० कोटी 

 

 

07:24 PM

टॉम करन आरसीबीमध्ये 

इंग्लंडचा खेळाडू टॉम करनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १.५०  कोटीत आपल्या ताफ्यात घेतले. 
 

07:22 PM

 ॲश्टन आगर लखनौमध्ये

श्टन आगरला लखनौच्या फ्रँचायझीने त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच एक कोटीत खरेदी केले.

07:20 PM

शेरफेन रदरफोर्ड केकेआरच्या ताफ्यात 

शेरफेन रदरफोर्डला कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने त्याच्या मूळ किंमतीत (१.५ कोटी) आपल्या ताफ्यात घेतले. 

07:19 PM

न्यूझीलंडचे दोन शिलेदार अनसोल्ड

न्यूझीलंडचा फिन अॅलेन ७५ लाख तर कॉलिन मुनरो १.५ कोटी रूपयांच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या रिंगणात होता. पण दोन्हीही खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. 
 

07:00 PM

ऐतिहासिक बोली लागल्यानंतर मिचेल स्टार्कची पहिली प्रतिक्रिया

कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल २४.७५ लाख मिचेल स्टार्कसाठी मोजले. या विक्रमी बोलीनंतर स्टार्कने आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला, "हा नक्कीच धक्का होता. माझी पत्नी अॅलिसा भारतातील महिला संघासोबत आहे त्यामुळे मी स्क्रीनवर जे पाहत होतो त्यापेक्षा तिला लवकर अपडेट मिळत होते. आश्चर्यचकित पण रोमांचित. आमच्या कसोटी संघाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये डिनरसाठी मागणी होतेय. बॉक्सिंग डे कसोटीच्या आधी काहीतरी करायचे आहे. पॅट कमिन्स व माझ्यासाठी ही रात्र खास आहे."

06:37 PM

आला रे...! श्रेयस गोपाल मुंबईच्या संघात

श्रेयस गोपालला मुंबई इंडियन्सने २० लाखात खरेदी केले. 

06:36 PM

एम. सिद्धार्थ लखनौच्या ताफ्यात

एम. सिद्धार्थला २.४० कोटी रूपयांत लखनौ सुपर जायंट्सच्या फ्रँचायझीने आपल्या ताफ्यात घेतले. 

06:25 PM

रसिक दार दिल्लीच्या संघात

रसिक दारला दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीने २० लाखात आपल्या संघात घेतले.

06:24 PM

सुशांत मिश्रावर २.२० कोटींचा वर्षाव

गुजरात टायटन्सने युवा सुशांत मिश्रासाठी २.२० कोटी रूपये मोजले. 

06:23 PM

कार्तिक त्यागी गुजरातच्या ताफ्यात

कार्तिक त्यागीला गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीने ६० लाखात आपल्या ताफ्यात घेतले. 

06:20 PM

यश दयाल आरसीबीच्या ताफ्यात; ५ कोटींचा वर्षाव

मागील आयपीएल हंगामात रिंकू सिंगने एकाच षटकात पाच षटकार ठोकलेल्या यश दयालची लिलावात मात्र चांदी झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने यश दयालला पाच कोटी रूपये देऊन आपल्या संघाचा भाग बनवले. 

06:16 PM

रिकी भुई २० लाखात दिल्ली कॅपिटल्सच्या संघात

युवा खेळाडू रिकी भुईला २० लाख रूपयांत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघाचा भाग बनवले. 

06:14 PM

कुमार कुशाग्र दिल्लीच्या ताफ्यात

कुमार कुशाग्रला दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीने ७.२० कोटी रूपयांत आपल्या ताफ्यात घेतले. 

06:12 PM

उर्विल पटेल आणि विष्णू सोलंकी अनसोल्ड

आयपीएल २०२४ चा मिनी लिलाव आता अंतिम टप्प्यात आला असून युवा खेळाडू उर्विल पटेल आणि विष्णू सोलंकी अनसोल्ड राहिले आहेत. 

05:45 PM

७.४० कोटी! शाहरूख खान गुजरात टायटन्सच्या ताफ्यात

शाहरूख खानला खरेदी करण्यासाठी पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चुरस पाहायला मिळाली. दोन्हीही फ्रँचायझी पाच-पाच लाखाची रक्कम वाढवून शाहरूखसाठी लढत होत्या. ४० लाखापासून सुरू झालेली बोली बघता बघता सात कोटीच्या पार गेली. अखेर प्रीती झिंटाने माघार घेतली अन् शाहरूख गुजरातच्या संघाचा भाग झाला. त्याला ७.४० कोटी रूपयांत गुजरातने खरेदी केले. 

राजस्थानने ७.१० पैकी ५.८० कोटी शुभम दुबेसाठी मोजले; विदर्भच्या पोट्ट्याने मैदान मारले

05:36 PM

अंगकृष्ण रघुवंशी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात

अंगकृष्ण रघुवंशीला २० लाखांत कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने खरेदी केले. 

05:32 PM

सर्फराज खान अनसोल्ड 

भारतीय खेळाडू सर्फराज खान अनसोल्ड राहिला असून त्याला खरेदी करण्यात कोणत्याच फ्रँचायझीने रस दाखवला नाही. 

05:29 PM

अंकुश रघुवंशी केकेआरच्या ताफ्यात

अंकुश रघुवंशीला खरेदी करण्यासाठी केकेआरच्या फ्रँचायझीशिवाय कोणीच रस दाखवला नाही. त्यामुळे तो २० लाख रूपयांत केकेरआच्या ताफ्यात गेला. 

05:28 PM

युवा समीर रिझवीवर ८.४० कोटींचा वर्षाव

समीर रिझवीला खरेदी करण्यासाठी मागील हंगामातील फायनलिस्ट गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी बोली लावली. नंतर गुजरातने माघार घेतली पण दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईच्या फ्रँचायझीला आव्हान दिले. अखेर चेन्नईच्या फ्रँचायझीने ८.४० कोटी मोजून समीरला आपल्या संघाचा भाग बनवले.

05:21 PM

प्रियांश आर्य अनसोल्ड

युवा खेळाडू प्रियांश आर्यवर देखील कोणत्याच फ्रँचायझीने विश्वास दाखवला नाही आणि तो अनसोल्ड राहिला. 

05:19 PM

रोहन कुन्नम्मल अनसोल्ड

२० लाख रूपयांच्या मूळ किंमतीसह आयपीएल लिलावाच्या रिंगणात असलेला केरळचा खेळाडू रोहन कुन्नम्मल अनसोल्ड राहिला.

05:18 PM

शुभम दुबे राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात

भारतीय खेळाडू शुभम दुबेला खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस झाली. दोन्हीही फ्रँचायझी या फलंदाजाला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मोठी रक्कम मोजण्यास तयार होत्या. अखेर २९ वर्षीय खेळाडूला ५ कोटी ८० लाखात राजस्थानच्या फ्रँचायझीने खरेदी केले. 

05:04 PM

अनसोल्ड राहिलेले खेळाडू - 

स्टीव्ह स्मिथ
करूण नायर
मनीष पांडे
रीली रॉसो
जोश इंग्लिस
फिल सॉल्ट 
कुसल मेंडिस 

04:46 PM

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे भारतीय खेळाडू -

युवराज सिंग (१६ कोटी)
इशान किशन (१५.२५ कोटी)
गौतम गंभीर (१४.९० कोटी)
दीपक चहर (१४ कोटी)
दिनेश कार्तिक (१२.५० कोटी)
हर्षल पटेल (११.७५ कोटी)

04:29 PM

मिनी लिलाव २०२३ मधील महागडे खेळाडू -

मिचेल स्टार्क - कोलकाता नाईट रायडर्स (२४.७५ कोटी)
डॅरिल मिचेल - चेन्नई सुपर किंग्स (१४ कोटी)
हर्षल पटेल - पंजाब किंग्स (११.७५ कोटी)
पॅट कमिन्स - सनरायझर्स हैदराबाद (२०.५० कोटी)
ट्रॅव्हिस हेड - सनरायझर्स हैदराबाद (६.८० कोटी)
हॅरी ब्रूक - दिल्ली कॅपिटल्स (४ कोटी)
रोवमन पॉवेल - राजस्थान रॉयल्स (७.४० कोटी)

शिवम मावी ( लखनौ सुपर जायंट्स ) - ६.४० कोटी
उमेश यादव ( गुजरात टायटन्स) - ५.८० कोटी
गेराल्ड कोएत्झी ( मुंबई इंडियन्स ) - ५ कोटी
 

04:06 PM

अनसोल्ड राहिलेले कॅप्ड फिरकीपटू 

अकेल हौसेन - अनसोल्ड 
मुजीब रहमान - अनसोल्ड 
आदिल राशिद - अनसोल्ड
मोहम्मद वकार सलामखेल - अनसोल्ड
तबरेझ शम्सी - अनसोल्ड 
ईश सोधी - अनसोल्ड 

04:04 PM

जयदेव उनाडकट सनरायझर्स हैदराबादच्या संघात

सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने जयदेव उनाडकटकला १.६० कोटीत खरेदी केले. 

04:03 PM

दिलशान मदुशंका मुंबईच्या ताफ्यात

मुंबई इंडियन्सने श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाला ४.६० कोटी रूपयांत आपल्या संघात घेतले. 

03:55 PM

ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवुड अनसोल्ड

एकिकडे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्यावर विक्रमी बोली लागली. तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड अनसोल्ड राहिला. तो २ कोटी रूपयांच्या मूळ किंमतीस लिलावाच्या रिंगणात होता. 

03:48 PM

ऐतिहासिक! तब्बल २४.७५ कोटी; स्टार्कसाठी कायपण, KKRने 'गड' जिंकला 

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क कोणत्या संघात जाणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले होते. स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठी चुरस झाली. यॉर्कर किंगला आपल्या संघाचा भाग बनवण्यासाठी दोन्हीही फ्रँचायझींनी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दाखवली. दिल्लीने माघार घेतल्यानंतर केकेआरने यात उडी घेतली. मग गुजरात टायटन्सने देखील स्टार्कला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. केकेआर आणि गुजरातच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजण्याची तयारी कायम ठेवली अन् १४ कोटींवर बोली गेली तरी स्टार्क लिलावाच्या रिंगणात कायम राहिला. आकडा २० कोटीवर गेला तरी बोली चालू होती. केकेआरने अखेर तब्बल २४.७५ कोटीत स्टार्कला आपल्या संघाचा भाग बनवले. यासह स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 

 

03:32 PM

शिवम मावीवर तब्बल ६.८० कोटींचा वर्षाव

भारताचा युवा खेळाडू शिवम मावीला लखनौ सुपर जायंट्सच्या फ्रँचायझीने ६.८० कोटी रूपयांत आपल्या ताफ्यात घेतले.

03:31 PM

उमेश यादववर गुजरात टायटन्सकडून ५.८० कोटींचा वर्षाव

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला गुजरात टायटन्सच्या फ्रँँचायझीने खरेदी केले. गुजरातने ५.८० कोटी रूपये देऊन त्याला आपल्या संघाचा भाग बनवले. 

03:24 PM

 अल्झारी जोसेफवर आरसीबीकडून ११.५० कोटींचा वर्षाव

वेस्ट इंडिजच्या खेळाडूला खरेदी करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजली. चेन्नई आणि दिल्लीच्या फ्रँचायझींनी जोसेफवर बोली लावली पण बंगळुरूने बाजी मारली. जोसेफला आरसीबीने ११.५० कोटी रूपयांत आपल्या ताफ्यात घेतले. 

03:21 PM

लॉकी फर्ग्युसन अनसोल्ड

न्यूझीलंडचा स्टार खेळाडू लॉकी फर्ग्युसन अनसोल्ड राहिला आहे. 

03:20 PM

चेतन सकारिया केकेआरच्या संघात

कोलकाता नाईट रायडर्सच्या एकमेव फ्रँचायझीने चेतन सकारियावर बोली लावली आणि त्याला त्याच्या मूळ किंमतीसह (५० लाख) आपल्या संघाचा भाग बनवले. 

 

 

03:17 PM

केएस भरत कोलकाताच्या ताफ्यात

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला ५० लाखात कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने आपल्या ताफ्यात घेतले.
 

03:15 PM

जोश इंग्लिस आणि कुसल मेंडिस अनसोल्ड

श्रीलंकेचा कुसल मेंडिस आणि इंग्लंडचा जोश इंग्लिस हे दोघे अनसोल्ड राहिले आहेत.

03:12 PM

आतापर्यंतच्या मोठ्या अपडेट्स

  • पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू (२०.५० कोटी), सनरायझर्स हैदराबाद 
  • ट्रॅव्हिस हेड - ६.८० कोटी, सनरायझर्स हैदराबाद
  • हॅरी ब्रूक - ४ कोटी, दिल्ली कॅपिटल्स
  • रोवमन पॉवेल, ७.४० कोटी, राजस्थान रॉयल्स

03:04 PM

पहिल्या सेटमधील आराखडा - 

रोवमन पॉवेल - ७.४० - राजस्थान रॉयल्स
Rilee Rossouw - अनसोल्ड 
हॅरी ब्रूक - ४ कोटी - दिल्ली कॅपिटल्स
ट्रॅव्हिस हेड - ६.८० कोटी - सनरायझर्स हैदराबाद
करूण नायर - अनसोल्ड 
स्टीव्ह स्मिथ - अनसोल्ड 
मनीष पांडे - अनसोल्ड 

03:04 PM

दुसऱ्या सेटमधील आराखडा - 

वानिंदू हसरंगा - १.५० कोटी, सनरायझर्स हैदराबाद  कोटी ते SRH
रचिन रवींद्र - १.८० कोटी, चेन्नई सुपर किंग्स
शार्दुल ठाकूर - ४ कोटी, चेन्नई सुपर किंग्स
अजमतुल्लाह ओमरझाई - ५० लाख, गुजरात टायटन्स
पॅट कमिन्स - २०. ५० कोटी, सनरायझर्स हैदराबाद 
कोएत्झी - ५ कोटी, मुंबई इंडियन्स
हर्षल पटेल - ११.७५ कोटी, पंजाब किंग्स
डॅरिल मिचेल - १४ कोटी, मुंबई इंडियन्स 
ख्रिस वोक्स - ४.२० कोटी, पंजाब किंग्स 

02:58 PM

ख्रिस वोक्स पंजाबच्या संघात

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सला खरेदी करण्यासाठी पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीमध्ये चुरस झाली. अखेर अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात घेण्यात पंजाबला यश आले. वोक्सला पंजाबच्या फ्रँचायझीने ४.२० कोटी रूपये देऊन खरेदी केले. 
 

02:42 PM

डॅरी मिचेल CSK च्या ताफ्यात; १४ कोटींचा वर्षाव

न्यूझीलंडचा स्टार खेळाडू डॅरी मिचेलला चेन्नई सुपर किंग्सच्या फ्रँचायझीने १४ कोटी रूपयांत आपल्या ताफ्यात घेतले. 

02:28 PM

भारताचा हर्षल पटेल ११.७५ कोटीत पंजाबच्या संघात

भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलवर पैशांचा वर्षाव झाला. त्याला पंजाब किंग्सने ११.७५ कोटी देऊन आपल्या ताफ्यात घेतले. 

02:25 PM

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी मुंबईच्या ताफ्यात 

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीला ५ कोटी रूपयांत मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने आपल्या संघाचा भाग बनवले. त्याला खरेदी करण्यासाठी चेन्नई आणि लखनौच्या फ्रँचायझीने रस दाखवला पण मुंबईने बाजी मारली. 
 

02:16 PM

कमिन्ससाठी ४ फ्रँचायझी भिडल्या; पण हैदराबादने बाजी मारली 

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चुरस झाली. त्यानंतर यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने उडी घेतली. मुंबईने माघार घेतल्यानंतर चेन्नई आणि आरसीबी यांच्यात चुरस झाली. अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी कोणतीच फ्रँचायझी कसर सोडू इच्छित नव्हती. पण, पर्स खाली होत असल्याने आणि रक्कम जास्त झाल्याने चेन्नईने माघार घेतली. मग सनरायझर्स हैदराबादने बोली लावण्यास सुरूवात केली. बंगळुरू आणि हैदराबाद यांची फ्रँचायझी कमिन्सला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रणनीती आखत होती. अखेर बंगळुरू आणि आरसीबी यांनी मोठी पर्स मोजण्याचा इरादा कायम ठेवला. लक्षणीय बाब म्हणजे सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजत कमिन्सला २०.५० कोटीत आपल्या संघात घेतले. 

 

 

02:07 PM

अझमतुल्लाह ओमरझाई ५० लाखांत गुजरात टायटन्सच्या ताफ्यात

गुजरात टायटन्सने ५० लाखांत अफगाणिस्तानच्या Azmatullah Omarzaiला आपल्या संघाचा भाग केले. 
 

02:05 PM

मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला ४ कोटी; चेन्नईच्या फ्रँचायझीची बाजी 

चेन्नई आणि हैदराबादने शार्दुल ठाकूरला २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह खरेदी करण्यात रस दाखवला. अखेर चेन्नईच्या फ्रँचायझीने ४ कोटी देऊन शार्दुलला आपल्या ताफ्यात घेतले. 
 

02:02 PM

न्यूझीलंडचा रचिन रवींद्र CSK च्या ताफ्यात; १.८ कोटींचा वर्षाव

न्यूझीलंडकडून विश्वचषक गाजवणारा रचिन रवींद्र ५० लाख रूपयांच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या रिंगणात होता. त्याला चेन्नई सुपर किंग्सच्या फ्रँचायझीने १.८ कोटी रूपयांत आपल्या ताफ्यात घेतले. 
 

01:57 PM

श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा हैदराबादच्या ताफ्यात

श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा १.५ कोटींच्या मूळ किंमतीसह रिंगणात होता. सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने हसरंगाला मूळ किंमतीत आपल्या ताफ्यात घेतले. हसरंगावर इतर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. 
 

01:44 PM

पहिल्या सेटमध्ये चार खेळाडू अनसोल्ड

स्टीव्ह स्मिथ, करूण नायर, राइली रूसो आणि मनिष पांडे हे चार  खेळाडू पहिल्या सेटमध्ये अनसोल्ड राहिले आहेत. 
 

01:43 PM

स्टीव्ह स्मिथला खरेदीदार नाहीच; ऑस्ट्रेलियन स्टार अनसोल्ड

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड राहिला. दोन कोटी रूपयांच्या मूळ किंमतीसह स्मिथ आपले नशीब आजमावत आहे. 

 

01:41 PM

भारताचा करूण नायर अनसोल्ड

आतापर्यंत आयपीएलच्या मिनी लिलावात परदेशी खेळाडूंवर मोठी लागली. पण एकाही भारतीय खेळाडूवर अद्याप मोठी बोली लागली नाही. अशातच करुण नायर देखील अनसोल्ड राहिला असून तो ५० लाख रूपयांच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या रिंगणात आहे. 

01:36 PM

६.८० कोटी! चेन्नईचा डाव पण काव्या मारनने चालवले 'हेड', ऑस्ट्रेलियन स्टार SRH मध्ये

ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला आपल्या संघात घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सच्या फ्रँचायझीने खूप प्रयत्न केला. वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या हेडला लिलावात चांगलाच फायदा झाला. अखेर हैदराबादच्या फ्रँचायझीने बाजी मारत विश्वचषकाच्या फायनलमधील हिरो ट्रॅव्हिस हेडला ६.८० कोटीमध्ये आपल्या संघात घेतले. 

01:29 PM

इंग्लंडचा हॅरी ब्रूक दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात; ४ कोटींचा वर्षाव

इंग्लंडच्या हॅरी ब्रूकसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान यांच्यात लढत झाली. ब्रूकची २ कोटी रुपये मूळ किंमत असून अखेर दिल्लीने त्याला ४ कोटी रुपयांत आपल्या संघात घेतले. 

01:26 PM

राइली रूसो अनसोल्ड

Riley Rousseau ला कोणत्याही संघाने खरेदी केले नसून तो पहिल्या सेटमध्ये अनसोल्ड राहिला. तो २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या रिंगणात आहे.
 

01:22 PM

रोवमन पॉवेल राजस्थानच्या ताफ्यात; केकेआरची अखेर माघार

वेस्ट इंडिजच्या रोवमन पॉवेलला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीमध्ये चांगलीच चुरस झाली. केकेआरकडून गौतम गंभीर तर राजस्थानकडून कुमार संगकारा रणनीती आखत होते. रक्कम ६.२० कोटीवर पोहचल्यानंतर केकेआरच्या फ्रँचायझीने थोडा विचार केला पण पॉवेलला आपल्या संघात घेण्यासाठी बोली कायम ठेवली. अखेर कोलकाताच्या   फ्रँचायझीने हार मानली अन् राजस्थान रॉयल्सने रोवमन पॉवेलला ७.४० कोटी रूपयांत आपल्या संघात घेतले. खरं तर पॉवेलची मूळ किंमत केवळ १ कोटी एवढी होती.

 

01:09 PM

बहुप्रतिक्षित लिलावाला सुरूवात

आयपीएल लिलावाला सुरूवात झाली असून १० फ्रँचायझी ३३३ खेळाडूंवर बोली लावतील. 

मोठी बातमी : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठीची विंडो ठरली, वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय

01:07 PM

आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी कोका कोला एरिना सज्ज

दुबईतील कोका कोला एरिना येथे खेळाडूंच्या लिलावाची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व फ्रँचायझींचे प्रतिनिधी लिलावाच्या ठिकाणी पोहोचले असून लवकरच लिलाव सुरू होईल. 

Web Title: IPL Auction 2024 Live Updates Mini Auction in Dubai, 332 players including 214 Indian to go under the hammer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.