IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या लिलावापूर्वी खूप मोठी घडामोड घडली. हार्दिक पांड्यानेगुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्सचा पुन्हा हात पकडला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने २०२२ मध्ये जेतेपद पटकावले, तर २०२३ मध्ये अंतिम फेरीत त्यांची हार झाली. हार्दिकची रिप्लेसमेंट म्हणून गुजरात टायटन्सने लिलावात युवा भारतीय शाहरूख खानला ( M Shahrukh Khan ) ७.४० कोटी रूपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
रिषभ असतानाही DCने यष्टिरक्षकासाठी मोजले ७.२० कोटी! १७व्या वर्षी ठोकलेले द्विशतक
शाहरूख खानला खरेदी करण्यासाठी पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चुरस पाहायला मिळाली. दोन्हीही फ्रँचायझी पाच-पाच लाखाची रक्कम वाढवून शाहरूखसाठी लढत होत्या. ४० लाखापासून सुरू झालेली बोली बघता बघता सात कोटीच्या पार गेली. अखेर प्रीती झिंटाने माघार घेतली अन् शाहरूख गुजरातच्या संघाचा भाग झाला. त्याला ७.४० कोटी रूपयांत गुजरातने खरेदी केले. शाहरुखने आयपीएलमध्ये ३३ सामन्यांत ४२६ धावा केल्या आहेत. हार्दिकची रिप्लेसमेंट म्हणून शाहरुखकडे पाहिले जात आहे आणि तोही या आव्हानासाठी सज्ज आहे.
तो म्हणाला, आमच्यासंघात चेन्नईची ४ खेळाडू आहेत आणि गेली २ वर्षे हा संघ ज्या प्रकारे खेळला त्यामुळे त्याचा भाग होण्यासाठी उत्सुक आहे. तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये मी गोलंदाजी केली आहे आणि आयपीएलमध्येही गोलंदाजी-फलंदाजीत योगदान देण्यासाठी १०० टक्के तयार आहे. मी या संघात ६ व्या किंवा ७ व्या क्रमांकावर खेळेन हे नक्की. मी या संघासाठी काहीही करायला तयार आहे. मी चेन्नईत चौथ्या क्रमांकावर खेळतो. गुजरात टायटन्स त्यांच्या खेळाडूंना कम्फर्ट वाटेल असे वातावरण ठेवतात आणि त्यामुळे मी आनंदी आहे.
डेव्हिड मिलरसोबत खेळण्याची संधी मिळण्यावर तो म्हणाला, गेल्या १० वर्षांपासून मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. तो असा माणूस आहे जो मोठ्या सामन्यांमध्ये दमदार खेळ करून जातो. त्याच्यासोबत खेळण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत आहे. दबावाखाली तो शांत राहून मॅच विनिंग खेळी करून जातो.