IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सुरू असलेल्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने ऑसी कर्णधार पॅट कमिन्ससाठी २०.५० कोटी रुपये मोजले आणि मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाइट रायडर्सने २४.७५ कोटी रुपये मोजले. चेन्नई सुपर किंग्स नेहमी त्यांच्या रणनीतीसाठी ओळखला जाणारा संघ आहे, मग ते डावपेच मैदानावरील असो किंवा मैदानाबाहेर.... आयपीएल ऑक्शनमध्ये सीईओ काशी विश्वनाथन नेहमी कानात हेडफोन घालून कोणाशी संवाद साधताना दिसतात आणि आजही तसेच पाहायला मिळाले.. CSK चा खरा मास्टर माईंड MS Dhoni आहे, हे उघड सत्य आहे. आज त्यांनी २० वर्षीय खेळाडूसाठी कोट्यवधींची बोली लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
चेन्नई सुपर किंग्सच्या पर्समध्ये ११.६० कोटी शिल्लक होते आणि त्यापैकी ८.४० कोटी CSK ने समीर रिझवीसाठी ( Sameer Rizvi goes to CSK for 8.40 crore) मोजले. २० कोटी मुळ किंमत असलेल्या समीरसाठी गुजरात टायन्स व चेन्नई सुपर किंग्स यांनी बोली लावली. या दोघांनी बोली एवढी वर नेली की ती ८ कोटीपर्यंत पोहोचली. या दोघांव्यतिरिक्त अन्य संघांनी फार रस दाखवला नाही. ७.६० कोटीनंतर गुजरातने माघार घेतली आणि दिल्ली कॅपिटल्सची एन्ट्री झाली. चेन्नईने ८.४० कोटींत ही डिल पक्की केली.
IPL 2024 Auction मधील महागडे खेळाडू
- मिचेल स्टार्क ( कोलकाता नाइट रायडर्स ) - २४.७५ कोटी
- पॅट कमिन्स ( सनरायझर्स हैदराबाद ) - २०.५० कोटी
- डॅरिल मिचेल ( चेन्नई सुपर किंग्स ) - १४ कोटी
- हर्षल पटेल ( पंजाब किंग्स ) - ११.७५ कोटी
- अल्झारी जोसेफ ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ) - ११.५० कोटी
- समीर रिझवी ( चेन्नई सुपर किंग्स) - ८.४० कोटी
- शाहरुख खान ( गुजरात टायटन्स) - ७.४० कोटी
- रोव्हमन पॉवेल ( राजस्थान रॉयल्स) - ७.४० कोटी
- ट्रॅव्हिस हेड ( सनरायझर्स हैदराबाद ) - ६.८० कोटी
- शिवम मावी ( लखनौ सुपर जायंट्स ) - ६.४० कोटी
कोण आहे समीर रिझवी? २० वर्षीय समीर रिझवीने उत्तर प्रदेश ट्वेंटी-२० लीगमध्ये कानपूर सुपरस्टार्स संघातून खेळतो. त्याने या स्पर्धेत ९ डावांत २ शतकांसह ४५५ धावा चोपल्या. पंजाब किंग्ससह त्याला आयपीएलमधील तीन फ्रँचायझींनी ट्रायलसाठी बोलावले. उत्तर प्रदेशच्या २३ वर्षांखालील संघासाठीच्या ट्रायलमध्ये त्याला जाता आले नाही, परंतु त्याने राजस्थानविरुद्धच्या २३ वर्षांखालील वन