IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सुरु असलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सर्वाधिक डिमांड पाहायला मिळतेय. मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी २० कोटींचा टप्पा ओलांडला. ट्रॅव्हिस हेडही मालामाल झाला. त्यात ऑस्ट्रेलियाकडून एकही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेल्या स्पेन्सर जॉन्सनला ( Spencer Johnson ) १० कोटी रुपयांत गुजरात टायटन्सने आपल्या ताफ्यात घेतले. समीर रिझवी, शुभम दुबे यांच्या पंक्तित कुमार कुशाग्रा ( Kumar Kushagra) हे अनकॅप खेळाडूही मालामाल झाले.
IPL 2024 Auction मधील महागडे खेळाडू
- मिचेल स्टार्क ( कोलकाता नाइट रायडर्स ) - २४.७५ कोटी
- पॅट कमिन्स ( सनरायझर्स हैदराबाद ) - २०.५० कोटी
- डॅरिल मिचेल ( चेन्नई सुपर किंग्स ) - १४ कोटी
- हर्षल पटेल ( पंजाब किंग्स ) - ११.७५ कोटी
- अल्झारी जोसेफ ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ) - ११.५० कोटी
- समीर रिझवी ( चेन्नई सुपर किंग्स) - ८.४० कोटी
- रायली रूसो ( पंजाब किंग्स ) - ८ कोटी
- शाहरुख खान ( गुजरात टायटन्स) - ७.४० कोटी
- रोव्हमन पॉवेल ( राजस्थान रॉयल्स) - ७.४० कोटी
- कुमार कुशाग्र ( दिल्ली कॅपिटल्स) - ७.२० कोटी
- ट्रॅव्हिस हेड ( सनरायझर्स हैदराबाद ) - ६.८० कोटी
- अनसोल्ड खेळाडू - स्टीव्ह स्मिथ, जोश इंग्लिस, ल्युकी फर्ग्युसन, जोश हेझलवूड, मुजीब रहमान, आदील राशीद, फिल सॉल्ट, इश सोढी, करुण नायर, मनीष पांडे, कुशल मेंडिस, अकिल होसैन, तब्रेझ शम्सी, कुसल मेंडिस, विष्णू सोलंकी, इशान पोरेल, उर्विल पटेल, ऋतिक शोकिन
लिलावाच्या अखेरच्या टप्प्यात अनसोल्ड खेळाडूंवर पुन्हा बोली लावली गेली. भारताचा करूण नायर अनसोल्ड राहिला, तर मनिष पांडे ५० लाखांच्या मुळ किमतीत कोलकाता नाइट रायडर्सकडे गेला. ल्युकी फर्ग्युसन ( २ कोटी मुळ किंमत) RCB च्या ताफ्यात दाखल झाला. स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड राहिला. पण, दक्षिण आफ्रिकेचा रिली रोसू ( Rileee Rossouw ) २ कोटींच्या मुळ किंमतीत पुन्हा लिलावात दाखल झाला. त्याच्यासाठी पंजाब किंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांनी बोली लावली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३१२ सामन्यांत ७९३३ धावा आहेत. पंजाब किंग्सने त्याला ८ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले.