Join us  

IPL 2025 : ...म्हणून मी IPL च्या लिलावात उतरण्याचा निर्णय घेतला; ४२ वर्षीय अँडरसनचं मोठं विधान

जेम्स अँडरसनने आयपीएलच्या मेगा लिलावात भाग घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 3:09 PM

Open in App

james anderson ipl 2025 : इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. ४२ वर्षीय खेळाडूने आयपीएलच्या मेगा लिलावात नोंदणी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खासकरुन कसोटी क्रिकेट गाजवणाऱ्या अँडरसनला आयपीएलचे तिकीट मिळणार का हे पाहण्याजोगे असेल. मात्र, त्याने लिलावात नोंदणी का केली असावी हा महत्त्वाचा प्रश्न. ४२ वर्षीय आणि परदेशी खेळाडूने नोंदणी केल्याने अनेकांना त्याचे कुतूहल वाटते. १.२५ कोटी या मूळ किंमतीसह अँडरसन लिलावाच्या रिंगणात आहे. 

एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा असल्याचे म्हटले. तो म्हणाला की, मी अद्याप खेळू शकतो असे मला वाटते. त्यामुळेच मी आयपीएलच्या लिलावात उतरण्याचा निर्णय घेतला. काही कारणांमुळे मी आयपीएलमध्ये खेळू शकलो नाही. पण, एक खेळाडू म्हणून आणखी काही देऊ शकतो याची मला खात्री आहे. मागील काही कालावधीपासून प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. केवळ नवीन काहीतरी करण्याच्या हेतूने मी आयपीएलकडे वळलो. 

खरे तर चेन्नई सुपर किंग्जशिवाय आरसीबी, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या फ्रँँचायझी जेम्स अँडरसनसारख्या अनुभवी गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेऊ इच्छितात. पंजाबच्या संघाच्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा असल्यामुळे मनात आणले तर ही फ्रँचायझी इंग्लंडच्या या गोलंदाजासाठी तगडी बोली लावण्यात आघाडीवर राहू शकते.

दरम्यान, यंदाचा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला होणार आहे. हा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाह या शहरात होणार आहे. जेद्दाहच्या अबादी अल जोहर एरिनामध्ये हा लिलाव ठेवण्यात आला आहे. हॉटेल शांग्री-लामध्ये खेळाडू आणि इतर लोकांसाठी राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे आयपीएल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आयपीएल २०२५ साठी एकूण १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यापैकी ११६५ खेळाडू भारतीय तर ४०९ खेळाडू हे परदेशी आहेत. एकूण खेळाडूंपैकी एकूण ३२० खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे आहेत.  मेगा लिलावापूर्वी सर्व १० फ्रँचायझींनी मिळून एकूण ५५८.५० कोटी रुपये खर्च करून ४६ खेळाडूंना कायम ठेवले. यामध्ये ३६ खेळाडू भारतीय तर १० विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ३६ भारतीयांमध्ये १० अनकॅप्ड खेळाडू देखील आहेत. दहा फ्रँचायझींकडे २०४ खेळाडूंना खरेदी करण्यासाठी ६४१.५कोटी रुपये आहेत. या २०४ ठिकाणांपैकी ७० जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत. 

टॅग्स :जेम्स अँडरसनआयपीएल लिलावआयपीएल २०२४इंग्लंड