Join us

IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?

Arjun Tendulkar Mumbai Indians, IPL Auction 2025: सुरुवातीच्या सत्रात विकल्या न गेलेल्या अर्जुन तेंडुलकरला अखेर शेवटच्या ५ मिनिटांत मुंबई इंडियन्सने आपल्या संघात समाविष्ट केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 22:59 IST

Open in App

Arjun Tendulkar sold to Mumbai Indians, IPL Auction 2025 Players List: आयपीएलच्या मेगालिलावात मुंबई इंडियन्सच्या संघमालकांनी दुसऱ्या दिवशी दमदार शॉपिंग केल्याचे दिसून आले. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी दोन दिवसीय लिलाव झाला. त्यातील दुसऱ्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर विक्रीसाठी उपलब्ध झाला. अर्जुन पहिल्या हंगामापासून मुंबई इंडियन्सच्या संघात असल्याने तोच संघ त्याच्यावर बोली लावेल, अशी आशा होती. पण कुणीही त्याच्यावर बोली लावली नाही. त्यामुळे तो आधी UNSOLD राहिला. पण त्यानंतर अगदी शेवटच्या सत्रात संघांनी काही निवडक खेळाडूंची नावे सांगण्याची विनंती करण्यात आली. त्यात मुंबई इंडियन्स संघाने अर्जुन तेंडुलकरला ३० लाखांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

अर्जुन तेंडुलकरचा आतापर्यंतचा IPL प्रवास

अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज तर आहेच. पण त्यासोबतच तो फलंदाजीतही झटपट धावा करण्याची क्षमता राखतो. म्हणूनच २०२२ च्या हंगामासाठी त्याला २० लाखांच्या मूळ किमतीत मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. त्यानंतर त्याला तीन वर्षे मुंबईच्या संघाने आपल्या ताफ्यात कायम ठेवले. पण दुखापतीमुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली. २०२३ च्या हंगामासाठी त्याला मुंबईने पुन्हा एकदा ३० लाखांच्या बोलीसह संघात घेतले. त्या हंगामात त्याने ४ सामन्यात ३ बळी घेतले आणि १३ धावा केल्या. त्यानंतर २०२४च्या हंगामात त्याला केवळ एकच सामना खेळायला मिळाला. त्यात त्याला फलंदाजी मिळाली नाही. आणि गोलंदाजीतही एकही बळी घेता आला नाही.

टॅग्स :आयपीएल २०२४आयपीएल लिलावमुंबई इंडियन्सअर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकर