IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?

Jofra Archer Mumbai Indian to Rajasthan Royals, IPL Auction 2025 Players List and Base Prices- Sold Prices: दुखापतीमुळे कायम चर्चेत असणारा जोफ्रा आर्चर अखेर पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स संघात दाखल झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 08:48 PM2024-11-24T20:48:24+5:302024-11-24T20:51:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2025 live updates Jofra Archer bought by Rajasthan Royals at 12 crores 50 Lakh whom relased by Mumbai Indians | IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?

IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Jofra Archer Mumbai Indian to Rajasthan Royals, IPL Auction 2025 Players Live : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी देश-विदेशातील एकूण १५७४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. यातील फक्त ५७७ खेळाडूंना अंतिम यादीत स्थान देण्यात आले. अनेक स्टार क्रिकेटर्सची नावे यात समाविष्ट केली होती. त्यापैकीच एक नाव असलेल्या इंग्लंडचा जोफ्रा आर्चर याला लिलावात चांगली किंमत मिळाली. गेल्या वेळी लिलावात मुंबई इंडियन्सने जोफ्राला विकत घेतले होते पण दुखापतीमुळे तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे अखेर मुंबईने त्याला रिलीज केले. या लिलावात तो २ कोटींच्या मूळ किंमतीसह मैदानात उतरला. लिलाव सुरु होऊन तब्बल ५ तास होऊनही एकही खेळाडू न खरेदी केलेल्या राजस्थान यावेळी डाव साधला. RR ने जोफ्रा आर्चरला १२ कोटी ५० लाखांना आपल्या ताफ्यात घेतले.

जोफ्राने सुरुवातीला आयपीएलसाठी नाव नोंदणी केली होती. पण मेगा लिलावाची जी अंतिम यादी जाहीर करण्यात आली त्यातून त्याचे नाव गायब झाल्याचे पाहायला मिळाले होते. अंतिम यादीत नाव नसेल तर हा खेळाडू लिलावातून बाद झाला असेच मानले जात होते. पण जोफ्रा आर्चरच्या बाबातीत मात्र वेगळाच सीन क्रिएट झाला आहे. आयत्या वेळी त्याची लिलावात एन्ट्री झाली आणि त्याने तगडी रक्कम मिळवली.

राजस्थान रॉयल्स संघ लिलावात ६ खेळाडूंसह पोहोचला त्यांनी संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीला प्रत्येकी १८-१८ कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवले. ध्रुव जुरेल आणि रियान पराग या दोघांना प्रत्येकी १४-१४ कोटी रुपये देऊन रिटेन केले. वेस्टइंडीजच्या शिमरॉन हेटमायरला ११ कोटी रुपयांसह संघात कायम ठेवले. तर संदीप शर्मा याला चार कोटींसह रिटेन केले.

Web Title: IPL Auction 2025 live updates Jofra Archer bought by Rajasthan Royals at 12 crores 50 Lakh whom relased by Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.