Join us

IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

या खेळाडूला तर किंमत कमी करूनही मिळाला नाही भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:15 IST

Open in App

PL Auction 2025 Players  : सौदी अरेबियातील जेद्दाह शहरातील आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही अनसोल्ड खेळाडूनं झाली. न्यूझीलंडच्या ताफ्यातील केन विलियम्सन याचे बोलीसाठी पहिले नाव आले. त्याच नाव आल्यावर  सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात थोडी चर्चा झाली, पण ना त्यांनी ना अन्य कुणी त्याला भाव दिला.

CSK नं रिलीज केल्यावर अजिंक्य रहाणेवर आली अनसोल्ड राहण्याची वेळ  गत हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून दिसलेला भारतीय स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे हा देखील अनसोल्ड राहिला. अजिंक्य रहाणे यंदाच्या लिलावात १.५० कोटीसह आपले नाव नोंदवले होते. पण त्याला कुणीच भाव दिला नाही. किंमत कमी करूनही पृथ्वीला मिळाला नाही भावगेल्या काही हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून दिसलेल्या पृथ्वी शॉनं किंमत कमी केली. पण तरीही त्याने ठेवलेल्या ७५ लाख या मूळ किंमतीसहही त्याला कुणी आपल्यात घेण्याचं धाडस दाखवलं नाही.  या मुंबईकरालाही लागला अनसोल्डचा टॅगगत हंगामात चेन्नईच्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या शार्दुल ठाकुरलाही मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी अनसोल्डचा टॅग लागला. गत हंगामात ४ कोटी पॅकेजसह तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. याशिवाय तो कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातूनही खेळताना दिसला आहे.

दुसऱ्या दिवशी अनसोल्ड राहिलेले खेळाडू

केन विल्यमसनग्लेन फिलिप्सअजिंक्य रहाणेपृथ्वी शॉ शार्दुल ठाकूरमयंक अग्रवालडॅरिल मिचेल 

एलेक्स कॅरीकेएस भरतशाय होप

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२४अजिंक्य रहाणेपृथ्वी शॉशार्दुल ठाकूर