IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?

Ryan Rickelton Mumbai Indians, IPL Auction 2025 Players List: इशान किशनच्या जागी आलेल्या रायन रिकल्टनवर मुंबई इंडियन्सने किती लावली बोली? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 05:15 PM2024-11-25T17:15:11+5:302024-11-25T17:16:59+5:30

whatsapp join usJoin us
ipl auction 2025 player auction full list base price Ryan Rickelton sold to Mumbai Indians for Rs 1 crore replacement of Ishan Kishan | IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?

IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ryan Rickelton Mumbai Indians, IPL Auction 2025 Players List: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सध्या दोन दिवसीय लिलाव सुरु आहे. काल पहिल्या दिवशी ७२ खेळाडूंवर ४६७.९५ कोटींची बोली लावण्यात आली. आज लिलावाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशीही संघांंमध्ये तोच जोश पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सच्या संघानेही लिलावासाठी जोरदार तयारी केली असल्याचे सांगितले जात होते. या तयारीचा अंदाज कालच्या पहिल्या दिवसात फारसा आला नाही. पण दुसऱ्या दिवशी मुंबईने दमदार खेळी केली. लिलावाआधी करारमुक्त केलेल्या इशान किशनच्या जागी विकेट किपर म्हणून मुंबईने अवघ्या १ कोटी रुपयांचा एक खेळाडू संघात सामील करून घेतला. या खेळाडूचं नाव रायन रिकल्टन. जाणून घेऊया त्याच्याबद्दल...

कोण आहे रायन रिकल्टन?

  • रायन रिकल्टन हा दक्षिण आफ्रिकेचा २८ वर्षीय खेळाडू आहे.
  • तो डावखुरा फलंदाज आणि विकेटकिपर देखील आहे.
  • आफ्रिकेच्या संघासह त्याने SAT20 या आफ्रिकेच्या टी२० लीग मध्येही मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • तो MI Cape Town या संघाकडून खेळलेला असल्यानेच मुंबई इंडियन्स संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला.
  • त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीला ३१ मार्च २०२२ मध्ये सुरुवात झाली.
  • त्याने आतापर्यंत १२ आंतरराष्ट्रीय सामन्यात २६१ धावा केल्यात.
  • तसेच टी२० लीग मध्ये ३२ सामने खेळून १२०१ धावा केल्या आहेत.
  • टी२० लीग स्पर्धांमध्ये नाबाद १०३ धावा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे.
  • तसेच, MI Cape Town संघातून खेळताना ९८ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.


रायन रिकल्टनच्या खेळाची झलक -

मुंबई इंडियन्सचा संघ पाच खेळाडूंना कायम ठेवून लिलावात उतरला होता. त्यांनी जसप्रीत बुमराहला सर्वाधिक १८ कोटींना संघात रिटेन केले. सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्या या दोघांना प्रत्येकी १६ कोटी ३५ लाख रुपयांच्या रकमेसह संघात कायम ठेवले. रोहित शर्माला १६ कोटी ३० लाख रुपयांसह रिटेन केले. तर तिलक वर्माला ८ कोटींसह संघात कायम ठेवले.

Web Title: ipl auction 2025 player auction full list base price Ryan Rickelton sold to Mumbai Indians for Rs 1 crore replacement of Ishan Kishan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.