Top 10 most expensive overseas players, IPL Auction 2025: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी दोन दिवसांच्या लिलावाची प्रक्रिया सोमवारी संपली. तब्बल १८२ खेळाडूंवर बोली लागली आणि ६३९.१५ कोटी रूपये खर्च करण्यात आले. प्रत्येक संघाला रिटेन केलेले आणि लिलावात विकत घेतलेले असे मिळून कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त २५ खेळाडू आपल्या संघात घ्यायचे होते. लिलावाअंती चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या तिघांनी आपला २५ खेळाडूंचा चमू पूर्ण केला. तर लखनौ सुपरजायंट्सकडे २४, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडे २३, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे २२, कोलकाता नाइट रायडर्सकडे २१ तर सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघाकडे २० खेळाडू समाविष्ट आहेत. यंदा भारतीय खेळाडूंवर मोठ्या बोली लागलेल्या पाहायला मिळाल्या. तसेच, काही परदेशी खेळाडूही (top 10 most expensive foreign players) मालामाल झाले. जाणून घेऊया, यंदाच्या लिलावातील, TOP 10 परदेशी खेळाडू...
IPL 2025 साठीच्या लिलावातील TOP 10 महागडे परदेशी खेळाडू -
- जॉस बटलर (इंग्लंड) - गुजरात टायटन्स - १५ कोटी ७५ लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) - मुंबई इंडियन्स - १२ कोटी ५० लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- जोफ्रा आर्चर (इंग्लंड) - राजस्थान रॉयल्स - १२ कोटी ५० लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- जोश हेजलवूड (ऑस्ट्रेलिया) - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - १२ कोटी ५० लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) - दिल्ली कॅपिटल्स - ११ कोटी ७५ लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- फिल सॉल्ट (इंग्लंड) - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - ११ कोटी ५० लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- मार्कस स्टॉयनीस (ऑस्ट्रेलिया) - पंजाब किंग्ज - ११ कोटी (मूळ किंमत - २ कोटी)
- कगिसो रबाडा (द. आफ्रिका) - गुजरात टायटन्स - १० कोटी ७५ लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- नूर अहमद (अफगाणिस्तान) - चेन्नई सुपर किंग्ज - १० कोटी (मूळ किंमत - २ कोटी)
- जेक फ्रेसर-मॅकगर्क (ऑस्ट्रेलिया) - दिल्ली कॅपिटल्स - ९ कोटी (मूळ किंमत - २ कोटी)
दरम्यान, २४ आणि २५ नोव्हेंबर या दोन दिवसात एकूण ५७७ खेळाडूंपैकी १८२ खेळाडूंना आपला संघ मिळाला. या दोन दिवसांत IPL च्या १० संघांनी मोठमोठ्या बोली लावत तब्बल ६३९.१५ कोटी रुपये खर्च केले. लखनौ सुपरजायंट्स संघाने यंदाच्याच नव्हे तर IPL इतिहासातील सर्वोच्च बोली लावून २७ कोटींना रिषभ पंतला विकत घेतले. श्रेयस अय्यर (२६.७५ कोटी) आणि वेंकटेश अय्यर (२३.७५ कोटी) हे TOP 3 महागडे खेळाडू ठरले.