IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ

Arjun Tendulkar Unsold, Mumbai Indians, IPL Auction 2025 Players List: मुंबई इंडियन्स संघाने अर्जुन तेंडुलकरला पहिल्या हंगामापासून संघात घेतले होते, पण यावेळी मात्र त्याला विकत घेतले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 09:54 PM2024-11-25T21:54:05+5:302024-11-25T22:08:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2025 Sachin Tendulkar son Arjun Tendulkar remains unsold in IPL mega auction mumbai indians | IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ

IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Arjun Tendulkar Unsold, Sachin Tendulkar Mumbai Indians, IPL Auction 2025 Players List: आयपीएलच्या मेगालिलावात मुंबई इंडियन्सच्या संघमालकांनी दुसऱ्या दिवशी दमदार शॉपिंग केल्याचे दिसून आले. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सध्या दोन दिवसीय लिलाव सुरु आहे. मुंबई इंडियन्सच्या संघानेही लिलावासाठी जोरदार तयारी केली असल्याचे सांगितले जात होते. या तयारीचा अंदाज कालच्या पहिल्या दिवसात फारसा आला नाही. पहिल्या दिवशी त्यांनी अवघे ४ खेळाडू खरेदी केले. दुसऱ्या दिवशी मात्र मुंबईने चांगलं शॉपिंग केलं. काही बडे तर काही युवा खेळाडू मुंबईने खरेदी केले. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्याबाबतीत धक्कादायक बाब घडली. पहिल्या हंगामापासून मुंबई इंडियन्सकडे असलेला अर्जुन यावेळी Unsold राहिला.

लिलावाआधी मुंबईने त्याला रिलीज केले होते. लिलावात त्याला विकत घेतले जाईल अशी अपेक्षा होती. ३० लाखांच्या मूळ बोलीवर तो लिलावात उतरला होता. पण एकाही संघाने त्याला घेण्यात रस दाखवला नाही. अखेर यंदाच्या हंगामासाठी तो विकला गेला नाही.

अर्जुन तेंडुलकरचा आतापर्यंतचा IPL प्रवास

अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज तर आहेच. पण त्यासोबतच तो फलंदाजीतही झटपट धावा करण्याची क्षमता राखतो. म्हणूनच २०२२ च्या हंगामासाठी त्याला २० लाखांच्या मूळ किमतीत मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. त्यानंतर त्याला तीन वर्षे मुंबईच्या संघाने आपल्या ताफ्यात कायम ठेवले. पण दुखापतीमुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली. २०२३ च्या हंगामासाठी त्याला मुंबईने पुन्हा एकदा ३० लाखांच्या बोलीसह संघात घेतले. त्या हंगामात त्याने ४ सामन्यात ३ बळी घेतले आणि १३ धावा केल्या. त्यानंतर २०२४च्या हंगामात त्याला केवळ एकच सामना खेळायला मिळाला. त्यात त्याला फलंदाजी मिळाली नाही. आणि गोलंदाजीतही एकही बळी घेता आला नाही.

Web Title: IPL Auction 2025 Sachin Tendulkar son Arjun Tendulkar remains unsold in IPL mega auction mumbai indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.