Join us

IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी

All Players sold list, IPL Auction 2025 Day 1: आजच्या दिवसात एकूण ४६७.९५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. जाणून घ्या पहिल्या दिवशी लिलाव झालेले सर्व खेळाडू आणि त्यांची किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 00:43 IST

Open in App

All Players sold list, IPL Auction 2025 Day 1 Live: जगातील सर्वात भव्यदिव्य अशी टी२० लीग स्पर्धा म्हणून नावलौकिक असलेल्या IPL च्या आगामी हंगामासाठी २४ आणि २५ नोव्हेंबरला लिलाव सुरु आहे. पहिल्या दिवसाच्या लिलावात एकूण ८४ खेळाडूंना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. त्यापैकी ७२ खेळाडूंना विकत घेतले गेले तर १२ खेळाडूंना कुणीही खरेदी केले नाही. ७२ खेळाडूंच्या यादीत भारताच्या रिषभ पंतने इतिहासातील सर्वाधिक बोली कमावत २७ कोटींसह विक्रम रचला. त्याला लखनौ सुपरजायंट्स संघाने खरेदी केले. त्याखालोखाल श्रेयस अय्यरला २६ कोटी ७५ लाखांच्या बोलीवर पंजाब किंग्जने संघात घेतले. आजच्या दिवसात एकूण ४६७.९५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. जाणून घ्या पहिल्या दिवशी लिलाव झालेले सर्व खेळाडू आणि त्यांची किंमत  

  • चेन्नई सुपर किंग्ज
  1. नूर अहमद (अफगाणिस्तान) - १० कोटी
  2. रविचंद्रन अश्विन (भारत) - ९ कोटी ७५ लाख
  3. डेवॉन कॉनवे (न्यूझीलंड) - ६ कोटी २५ लाख
  4. खलील अहमद (भारत) - ४ कोटी ८० लाख
  5. रचिन रविंद्र (न्यूझीलंड) - ४ कोटी
  6. राहुल त्रिपाठी (भारत) - ३ कोटी ४० लाख
  7. विजय शंकर (भारत) - १ कोटी २० लाख 
  • दिल्ली कॅपिटल्स
  1. केएल राहुल (भारत) - १४ कोटी
  2. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) - ११ कोटी ७५ लाख
  3. टी नटराजन (भारत) - १० कोटी ७५ लाख
  4. जेक फ्रेसर-मकगर्क (ऑस्ट्रेलिया) - ९ कोटी
  5. हॅरी ब्रूक (इंग्लंड) - ६ कोटी २५ लाख
  6. आशुतोष शर्मा (भारत) - ३ कोटी ८० लाख
  7. मोहित शर्मा (भारत) - २ कोटी २० लाख
  8. समीर रिझवी (भारत) - ९५ लाख
  9. करूण नायर (भारत) - ५० लाख 
  • गुजरात टायटन्स
  1. जोस बटलर (इंग्लंड) - १५ कोटी ७५ लाख
  2. मोहम्मद सिराज (भारत) - १२ कोटी २५ लाख
  3. कगिसो रबाडा (द. आफ्रिका) - १० कोटी ७५ लाख
  4. प्रसिध कृष्णा (भारत) - ९ कोटी ५० लाख
  5. महिपाल लोमरोर (भारत) - १ कोटी ७० लाख
  6. कुमार कुशाग्र (भारत) - ६५ लाख
  7. मानव सुतार - ३० लाख
  8. अनुज रावत - ३० लाख
  9. निशांत सिंधू (भारत) - ३० लाख 
  • कोलकाता नाइट रायडर्स
  1. वेंकटेश अय्यर (भारत) - २३ कोटी ७५ लाख
  2. ऑनरिक नॉर्खिया (द. आफ्रिका) - ६ कोटी ५० लाख
  3. क्विंटन डी कॉक (द. आफ्रिका) - ३ कोटी ६० लाख
  4. अंगक्रिश रघुवंशी (भारत) - ३ कोटी
  5. रहमानुल्लाह गुरबाज ( अफगाणिस्तान) - २ कोटी
  6. वैभव अरोरा (भारत) - १ कोटी ८० लाख
  7. मयंक मार्कंडे (भारत) - ३० लाख 
  • लखनौ सुपर जायंट्स
  1. रिषभ पंत (भारत) - २७ कोटी
  2. आवेश खान (भारत) - ९ कोटी ७५ लाख
  3. डेव्हिड मिलर (द. आफ्रिका) - ७ कोटी ५० लाख
  4. अब्दुल समद (भारत) - ४ कोटी २० लाख
  5. मिचेल मार्श - (ऑस्ट्रेलिया) - ३ कोटी ४० लाख
  6. एडन मार्करम (द. आफ्रिका) - २ कोटी
  7. आर्यन जुयाल (भारत) - ३० लाख 
  • मुंबई इंडियन्स
  1. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) - १२ कोटी ५० लाख
  2. नमन धीर (भारत) - ५ कोटी २५ लाख
  3. रॉबिन मीन्झ (भारत) - ६५ लाख
  4. कर्ण शर्मा (भारत) - ५० लाख 
  • पंजाब किंग्ज
  1. श्रेयस अय्यर (भारत) - २६ कोटी ७५ लाख
  2. युजवेंद्र चहल (भारत) - १८ कोटी
  3. अर्शदीप सिंग (भारत) - १८ कोटी
  4. मार्कस स्टॉयनीस (ऑस्ट्रेलिया) - ११ कोटी
  5. नेहाल वढेरा (भारत) - ४ कोटी २० लाख
  6. ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) - ४ कोटी २० लाख
  7. वैशाख विजयकुमार (भारत) - १ कोटी ८० लाख
  8. यश ठाकूर (भारत) - १ कोटी ६० लाख
  9. हरुप्रीत ब्रार (भारत) - १ कोटी ५० लाख
  10. विष्णु विनोद (भारत) - ९५ लाख 
  • राजस्थान रॉयल्स
  1. जोफ्रा आर्चर (इंग्लंड) - १२ कोटी ५० लाख
  2. वानिंदू हसरंगा (श्रीलंका) - ५ कोटी २५ लाख
  3. महिशा तिक्षणा (श्रीलंका) - ४ कोटी ४० लाख
  4. आकाश मढवाल (भारत) - १ कोटी २० लाख
  5. कुमार कार्तिकेय (भारत) - ३० लाख 
  • रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
  1. जोश हेजलवूड (ऑस्ट्रेलिया) - १२ कोटी ५० लाख
  2. फिल सॉल्ट (इंग्लंड) - ११ कोटी ५० लाख
  3. जितेश शर्मा (भारत) - ११ कोटी
  4. लियम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड) - ८ कोटी ७५ लाख
  5. रसिख दार (भारत) - ६ कोटी
  6. सुयश शर्मा (भारत) - २ कोटी ६० लाख 
  • सनरायजर्स हैदराबाद
  1. इशान किशन (भारत) - ११ कोटी २५ लाख
  2. मोहम्मद शमी (भारत) - १० कोटी
  3. हर्षल पटेल (भारत) - ८ कोटी
  4. अभिनव मनोहर (भारत) - ३ कोटी २० लाख
  5. राहुल चहर (भारत) - ३ कोटी २० लाख
  6. अँडम झम्पा (ऑस्ट्रेलिया) - २ कोटी ४० लाख
  7. सिमरजीत सिंग (भारत) - १ कोटी ५० लाख
  8. अथर्व तायडे (भारत) - ३० लाख 
टॅग्स :आयपीएल २०२४आयपीएल लिलावरिषभ पंतअर्शदीप सिंगयुजवेंद्र चहलवेंकटेश अय्यरश्रेयस अय्यरपंजाब किंग्स