Join us  

IPL चा लिलाव म्हणजे क्रूरता, खेळाडूंची गुरा-ढोरांसारखी वरात काढतात

27 आणि 28 जानेवारीला आठ फ्रेंचायजींनी एकूण 169 खेळाडूंना विकत घेतले.  त्यासाठी संघ मालकांनी एकूण 431 कोटी रुपये मोजले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 2:04 PM

Open in App
ठळक मुद्देआयपीएलमध्ये खेळाडूंचा ज्या प्रकारे लिलाव होतो ती पद्धत अत्यंत क्रूर, अपमानास्पद आहे.आयपीएलच्या यंदाच्या सीझनसाठी एकूण 56 परदेशी खेळाडूंची खरेदी करण्यात आली असून त्यात सात न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आहेत.

ऑकलंड - बंगळुरुमध्ये मागच्या आठवडयात आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठीचा लिलाव पार पडला. या लिलावावर न्यूझीलंडमधील क्रिकेटपटूंच्या संघटनेने जोरदार टीका केली आहे. खेळाडूंची अशा प्रकारची लिलाव प्रक्रिया संपवण्याची मागणी त्यांनी केली आहे.  27 आणि 28 जानेवारीला आठ फ्रेंचायजींनी एकूण 169 खेळाडूंना विकत घेतले.  त्यासाठी संघ मालकांनी एकूण 431 कोटी रुपये मोजले. 

आयपीएलमध्ये खेळाडूंचा ज्या प्रकारे लिलाव होतो ती पद्धत अत्यंत क्रूर, अपमानास्पद आहे. खेळाडूंच्या उदरनिर्वाहाशी खेळणे नैतिकतेला धरुन नाही असे न्यूझीलंड क्रिकेटपटू संघटनेचे प्रमुख हीथ मिल्स यांनी म्हटले आहे. आयपीएलचा लिलाव म्हणजे संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी खेळाडूंची गुरा-ढोरांसारखी वरात काढली जाते. हा अपमानास्पद प्रकार आहे असे मिल्स यांनी सांगितले. 

आयपीएलच्या यंदाच्या सीझनसाठी एकूण 56 परदेशी खेळाडूंची खरेदी करण्यात आली असून त्यात सात न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आहेत. ब्रेनडन मॅक्क्युलम (चेन्नई सुपर किंग्ज), केन विल्यमसन (सन रायजर्स हैदराबाद), ट्रेंट बाऊल्ट (दिल्ली डेअरडेव्हील्स), कॉलीन डी ग्रँडहोमी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु), कॉलीन मुनरो (दिल्ली डेअरडेव्हील्स), टीम साऊदी (आरसीबी) आणि मिचेल सँटनेर (सीएसके) हे न्यूझीलंडचे सात क्रिकेटपटू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहेत.                                                  

                           

टॅग्स :आयपीएल लिलाव 2018