नवी दिल्ली : आयपीएल लिलावात खेळाडू जणू एखाद्या वस्तूप्रमाणे भासतात आणि या वस्तूंची खरेदी-विक्री सुरू असल्यासारखे वाटते, असे विधान रॉबिन उथप्पाने केले आहे. आयपीएल लिलावात उथप्पाचादेखील समावेश होता.
चेन्नई सुपरकिंग्जने त्याला २ कोटींच्या बेस प्राइजमध्ये संघात दाखल करून घेतले. आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावाबाबत बोलताना तो म्हणाला, "लिलावात असं वाटतं की तुम्ही खूप आधी एक परीक्षा दिली आहे आणि त्याचा निकाल आता लागणार आहे. तुम्ही एखाद्या पाळीव प्राण्यासारखे दिसता. मला ते पाहून खरंच चांगलं वाटत नाही. एखाद्या खेळाडूच्या कामगिरीबाबत मत असणं वेगळी गोष्ट आहे. पण कोणता खेळाडू किती रुपयाला विकला जाणार यावर चर्चा होणं खूप वेगळी गोष्ट आहे."
"जे खेळाडू अनसोल्ड ठरतात त्यांची मानसिक स्थिती काय असते याचा तुम्ही विचारदेखील करू शकत नाही. खूप वाईट वाटतं. सर्वांचं भलं व्हावं यासाठी एक ड्राफ्ट व्यवस्था असायला हवी. जेणेकरून प्रत्येक खेळाडूचा सन्मान राखला जाईल," असंदेखील तो म्हणाला.