मुंबई : पुढील आठवड्यात होणाऱ्या आयपीएल लिलावाकडे (मेगा ऑक्शन) संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन ही लिलाव प्रक्रिया विनाअडथळा पार पडण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कंबर कसली असून लिलाव प्रक्रियेसाठी सर्व दहा फ्रँचाइजींसाठी कठोर नियमावली तयार केली आहे. अहमदाबाद आणि लखनौ या दोन नव्या फ्रँचाइजींच्या समावेशानंतर ‘मेगा ऑक्शन’ पार पडणार आहे. आयपीएलचा हा लिलाव सोहळा १२ व १३ फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये होईल. २०२० चे आयपीएल सत्र कोरोनामुळे यूएईमध्ये झाले. यानंतरचे सत्र भारतात प्रेक्षकांविना आयोजित झाले. मात्र, कठोर बायो-बबल असतानाही कोरोनाचा शिरकाव झाला आणि स्पर्धा मे महिन्यात स्थगित करण्यात आली. यानंतर उर्वरित सत्र पुन्हा यूएईमध्ये खेळविण्यात आले. त्यामुळे यंदा होत असलेल्या मोठ्या लिलाव प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा न येण्यासाठी बीसीसीआयने काही कठोर नियम जाहीर केले आहेत. यंदाच्या लिलावात एकूण १२१४ खेळाडूंनी नोंदणी केली. त्यातून ५९० खेळाडूंचा अंतिम यादीत समावेश झाला. या यादीमध्ये ३७० भारतीय आणि २२० विदेशी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
मध्यरात्री होणार कोरोना चाचणी, प्रत्येक प्रतिनिधीवर असणार बारीक लक्षnआयपीएल २०२२ लिलाव प्रक्रिया पूर्णपणे बायो-बबलमध्ये पार पडेल.nलिलाव प्रक्रियेत सहभागी होणारा फ्रँचाइजीचा प्रत्येक प्रतिनिधी कोरोना निगेटिव्ह असायला हवा. ९ ते ११ फेब्रुवारी रोजी प्रत्येक प्रतिनिधी आरटी-पीसीआर चाचणीत निगेटिव्ह यायला हवा.nयंदा लिलावात राईट टू मॅच (आरटीएम) पर्याय नसेल.nमुदत संपल्यावर कोणताही संघ जुन्या खेळाडूला रिटेन करू शकत नाही. याचा सर्वाधिक फटका मुंबई, दिल्ली, चेन्नई या संघांना बसलेला पाहण्यास मिळत आहे.nप्रत्येक फ्रँचाईजीला खर्च करण्यासाठी ९० कोटी रुपयांचे बजेट दिले असून, त्यापैकी ८० कोटी खेळाडूंवर खर्च करावेत.nगेल्या १५ दिवसांत विदेश दौरा करून आयपीएलसाठी आलेल्या खेळाडूंना ७ दिवस सक्तीच्या विलगीकरणात रहावे लागेल.nयादरम्यान दोनवेळा त्यांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह यायला हवा.nलिलाव प्रक्रियेतील प्रत्येक व्यक्तीवर बीसीसीआयचे बारीक लक्ष असेल.nकोरोना चाचणी मध्यरात्री १२ ते सकाळी ७ दरम्यान होईल. जेणेकरून लिलावामध्ये अडथळा येणार नाही. रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत त्या सदस्याला रूममध्येच रहावे लागेल.nकोरोना निगेटिव्ह आणि नियमांचे पालन करणाऱ्यांनाच लिलावात प्रवेश असेल.nप्रत्येक सदस्याला कोरोना लसीकरणाची माहिती देणे बंधनकारक असून, मास्क लावणे अनिवार्य आहे.
ऑसी-इंग्लंडचे खेळाडू किती खेळणार?बीसीसीआयने लिलावासाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे ४७, तर इंग्लंडचे २४ क्रिकेटपटू आहेत. मात्र, आयपीएलमधील त्यांच्या उपलब्धतेविषयी शंका उपस्थित होत आहे. इंग्लंड संघातील खेळाडू मे महिन्याच्या अखेरीस माघार घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे प्ले ऑफ लढतीत ते खेळणार की नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहे. ऑस्ट्रेलिया संघ २९ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना प्रमुख ऑसी खेळाडू मुकणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे यंदा इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू किती सामने खेळणार, याकडे लक्ष लागले आहे.